लंडन : जगभरात गेल्यावर्षी सर्वात जास्त भारतात इंटरनेट बंद झाल्याचा प्रकार घडला आहे. जगभरात 155 पैकी 109 वेळी भारतात इंटरनेट बंद झाल्याची माहिती आहे. हे सलग तिसरे वर्ष असून भारत या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या संदर्भातील माहिती डिजीटल राइट्स अॅन्ड प्रायव्हसी ऑर्गनायझेशन अॅक्सेसच्या नवीन रिपोर्टनुसार ही माहिती मिळाली आहे.


भारतात इंटरनेट बंद झाल्यानंतर लाखो लोकांचा खोळंबा झाला आहे. गेल्या वर्षी देशात अनेक हिंसक आंदोलन झाली, ज्यामुळे सरकारला इंटरनेट सेवा बंद करावी लागली. भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर यमन हा देश आहे. यमनमध्ये सहा वेळा इंटरनेट शटडाऊन करण्यात आले. इथियोपिया येथे चारवेळा आणि जॉर्डन येथे तीन वेळा इंटरनेटची सेवा बंद करणयात आली होती.


29 देशांना फटका


डिजीटल राइट्स अॅन्ड प्रायव्हसी ऑर्गनायझेशन अॅक्सेसच्या माहितीनुसार, 2020 साली इंटरनेट बंद झाल्यामुळे 29 देशांना फटका बसला आहे. 155 वेळा इंटरनेट बंद झाले होते. रिपोर्टच्या माहितीनुसार, 28 वेळा इंटरनेट पूर्णपणे ब्लॅकआऊट झाले होते. याचा फटका अनेक शहरांना बसला आहे. इंटरनेट बंद झाल्याच्या सर्वाधिक घटना आफ्रिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशियामध्ये झाल्या आहेत. म्यानमारमधील राखिन आणि चीन या दोन राज्यात तब्बल 19 महिने मोबाईल नेटवर्क बंद होते.


जगातील विविध देशांवर होणाऱ्या सायबर हल्ल्यांच्या बाबतीत आयबीएमने एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात आशिया-प्रशांत म्हणजेच इंडो- पॅसिफिक प्रदेशात सर्वाधिक सायबर हल्ले हे जपानवर झाले असून त्यानंतर भारताचा क्रमांक लागतोय असं सांगितलं आहे.


भारतावर होणारे सायबर हल्ले हे प्रामुख्याने पाकिस्तान आणि चीनमधील हॅकर्सकडून केले जातात असं समोर आलंय. कोरोना काळात वर्क फ्रॉम होममुळे या हॅकर्सना सायबर हल्ले करायला सोपं गेल्याचं समोर आलंय. गेल्या काही काळात अमेरिकेवरही मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले झाल्याचं दिसून आलंय. हे सायबर हल्ले प्रामुख्याने रशिया आणि चीन या देशांतून करण्यात येत असल्याचं समोर आलंय.


संबंधित बातम्या :