चेन्नई : तामिळनाडू राज्यातून मोठी बोतमी आली आहे. तामिळनाडू निवडणुकीपूर्वी व्ही.के. शशिकला यांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली आहे. तामिळनाडूमध्ये सहा एप्रिलला विधानसभेच्या सर्व जागांवर मतदान होणार आहे. एमके स्टालिन यांचा पक्ष द्रमुक (DMK) सत्तेत येऊ नये याची काळजी घ्यावी असे त्यांनी आवाहन केलं आहे.


तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता (दिवंगत) यांच्या निकटवर्ती असलेल्या शशिकला यांनी 'राजकीय शत्रू' द्रमुक सत्तेत येऊ नये याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.


एमके स्टालिन यांचा पक्ष डीएमके सत्ताधारी एआयएडीएमके-भाजप युतीच्या विरोधात लढत आहे. निवडणुकीत डीएमकेने काँग्रेस व इतर पक्षांशी युती केली आहे.


शशिकला यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, "जया (माजी मुख्यमंत्री जे जयललिता) जिवंत असतानाही मी कधीही सत्ता किंवा पदावर नव्हते. तिच्या मृत्यूनंतरही मी तसे करणार नाही. राजकारण सोडत असले तरी त्यांचा पक्ष विजयी झाला पाहिजे आणि त्यांचा वारसा पुढे जाईल अशी मी प्रार्थना करते.''


त्या म्हणाल्या, की "मला कधीही सत्ता, अधिकार किंवा संपत्तीची इच्छा नव्हती. अम्मा (जयललिता) आणि तमिळनाडूच्या जनतेचे मी नेहमी कृतज्ञ आहे.''


एआयएडीएमकेचे निष्कासित नेत्या व्ही. के. शशिकला 28 जानेवारी रोजी एका बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात चार वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर बाहेर आल्या आहेत. तेव्हापासून अशी अटकळ होती की सत्तारूढ एआयएडीएमके आणि विरोधी पक्ष डीएमकेला यावेळच्या विधानसभा निवडणुकीत आव्हान देतील. अद्याप तरी त्यांनी आपले पत्ते खोलले नाही.


जे जयललिता यांचे डिसेंबर 2016 मध्ये निधन झाले. यानंतर एआयएडीएमकेमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली. अन्नाद्रमुकच्या पन्नेरसेल्वम गटाने शशिकला यांना पक्षातून काढून टाकले.