Hottest Month March 2022 : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिली आहे. मार्च महिना भारताच्या 121 वर्षांतील सर्वात उष्ण मार्च महिना होता. मार्चमध्ये नोंद झालेल्या तापमानाने मार्च 2010 च्या सरासरी कमाल तापमानाला मागे टाकले. मार्च 2010 मध्ये भारतातील सरासरी मासिक दिवसाचे तापमान 33.09 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते. मार्चमध्ये देशातील अनेक भागात 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली.


गेल्या महिन्यात (मार्च 2022) सरासरी मासिक दिवसाच्या तापमानाचा पारा 33.1 अंशांवर नोंदवला गेला. हे 1901 सालानंतरची महिन्यातील सर्वात उष्ण तापमान ठरले आहे. दिल्लीत 20 मार्च रोजी पितमपुरा मॉनिटरिंग स्टेशनवर कमाल तापमान 39.9 अंश सेल्सिअस होते, तो वर्षातील सर्वात उष्ण दिवस होता. एप्रिलच्या पहिल्या 15 दिवसात देखील वातावरण उष्णच राहण्याचा अंदाज आहे 


मार्चमध्ये तापमान वाढ हे काही नवीन नाही. याआधी 2020 आणि 2021 मध्येही मार्चमधील तापमानाने अनेक विक्रम मोडले होते. हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब आणि राजस्थानच्या बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा 4.5 अंशांनी जास्त होते. IMD नुसार, मासिक सरासरी कमाल तापमानाच्या बाबतीत मार्च 2021 मधील तापमानाची नोंद 121 वर्षांतील तिसरा सर्वात उष्ण महिना म्हणून केली गेली आहे.


IMD ने म्हटले आहे की, यावर्षी मार्चमध्ये संपूर्ण देशातील कमाल तापमान सामान्यपेक्षा 1.86 अंश सेल्सिअस जास्त आहे. 1981 ते 2019 च्या कालावधीत मार्च 2022 मध्ये संपूर्ण देशासाठी सरासरी कमाल, किमान आणि सरासरी तापमान अनुक्रमे 33.10°C, 20.24°C आणि 26.67°C होते, जे सामान्य 31.24°C, 18.87°C आणि 25.06°C होते. 


मार्च महिन्यात दोन उष्णतेच्या लाटा, पावसाचा अभाव, चक्रीवादळाच्या स्थितीमुळे तयार झालेले कमी दबावाचे क्षेत्र ज्यामुळे उत्तर आणि मध्य भारतात उष्ण तापमान होते. जागतिक तापमान वाढ हे देखील एक प्रमुख कारण आणि उन्हाळ्यात laNina इव्हेंट ॲक्टिव्ह असल्याकारणाने देखील उच्च तापमानाची नोंद बघायला मिळत असते. 


तापमान वाढीचं कारण काय?
मार्चमध्ये वाढणारा पारा हा केवळ भारतापुरते मर्यादित नसून जागतिक पातळीवर याची झळ बसत आहे. तज्ज्ञांनी सांगितले आहे की, 'जागतिक स्तरावरही, गेल्या दोन दशकांतील यंदाचे वर्ष सर्वात उष्ण वर्षे आहे. हवामान बदलामुळे हवामानाच्या तीव्रतेवर आणि कालावधीवर परिणाम होत आहे. उष्णतेच्या लाटा, चक्रीवादळाची तीव्रता किंवा अतिवृष्टी या परिणाम तापमानावर होत आहे.'


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha