Coronavirus Cases in India : भारतातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव घटताना दिसत आहे. देशात आज 163 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. शनिवारी ही संख्या 214 होती त्यामुळे आज रुग्ण संख्येत 51 रुग्णांची घट झाली आहे. देशात सध्या ओमायक्रॉनच्या XBB व्हेरियंटचे सात, BF.7 व्हेरियंटचे पाच आणि BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण आहेत. देशात कोरोनाचा संसर्ग घटताना दिसत आहे मात्र धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटमुळे अमेरिका आणि चीनमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले असले, तरी येथील परिस्थिती दिलासादायक आहे. देशातील संसर्ग दिवसेंदिवस कमी होत आहे. 


भारतात कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरियंटचे रुग्ण किती?


देशात सध्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या XBB सब-व्हेरियंट, BF.7 व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. याशिवाय BQ.1.1 व्हेरियंटचाही देशात शिरकाव झाला आहे. देशात BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण आहेत. सध्या ओमायक्रॉनच्या XBB व्हेरियंटचे सात, BF.7 व्हेरियंटचे पाच रुग्ण आहेत.






कोरोनाची लक्षणे बदलली


रिपोर्टनुसार, कोरोना रुग्णांमध्ये मागील काही महिन्यामध्ये आढळलेल्या खालील प्रमाणे लक्षणे दिसून आली. यामध्ये काही लक्षणे पूर्वीप्रमाणे सारखीच होती, तर काही लक्षणे नवीन असल्याचे दिसून येत आहे. घसा खवखवणे, डोकेदुखी, पाठदुखी, कंबर दुखी, अंगदुखी, नाक वाहणे, थकवा येणे, शिंका येणे, रात्री घाम येणे ही नवीन लक्षणे आढळली आहेत.


मेंदू, डोळ्यांसह किडनीतही कोरोना विषाणूचा शिरकाव


एका नव्या संशोधनानुसार, कोरोना विषाणूचा मानवाच्या फुफ्फुसातच नाही तर, डोळे आणि किडनीमध्येही शिरकाव होतो, असे समोर आले आहे. शास्त्रज्ञांना मानवाच्या शरीरात 84 वेगवेगळ्या ठिकाणी आढळला कोरोना विषाणू आढळला. अमेरिकेतील मॅरीलँड युनिव्हर्सिटीने कोरोना विषाणू संदर्भात नवीन संशोधन केले आहे. मॅरीलँड विद्यापीठाने कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर संशोधन केले. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर लगेचच त्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो, याची माहिती जाणून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Superbug : चिंता वाढली! कोरोनानंतरचा दुसरा सर्वात मोठा धोका बनणार 'सुपरबग', एक कोटी मृत्यू होण्याची शक्यता