Petrol-Diesel Price Today 8th January 2023: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil) आज कोणताही बदल झालेला नाही. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 78.57 डॉलरवर व्यापार करत आहे. तसेच, WTI प्रति बॅरल 73.77 डॉलर दरानं विकलं जात आहे. दररोज प्रमाणे आजही सरकारी तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आजही देशात इंधन दरांत कोणताही बदल झालेला नाही. 


मे महिन्यापासून आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil Price) किमतीत विक्रमी घसरण होत असताना सर्वांच्या नजरा देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीकडे लागल्या होत्या. पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) किमतींत घट होणार का? याकडे सर्वसामान्यांचंही लक्ष लागलं होतं. पण आजही भारतील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 


Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर



  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 

  • मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 

  • चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर


Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 



  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 

  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 

  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर

  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर


Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).