Go First Air Flight Incident : विमान प्रवासातील गैरवर्तानाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गो फर्स्ट एअरलाइनच्या (Go First Airline) विमानात प्रवाशाने एअर होस्टेससोबत गैरवर्तन केल्याची घठना घडली आहे. प्रवाशाने एअर होस्टेसशी अश्लील भाषेत संवाद साधत तिच्याकडे अश्लील मागणी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका परदेशी प्रवाशाने एअर होस्टेसला जवळ बसण्यास सांगितले होते आणि दुसऱ्या एका प्रवाशाने एअर होस्टेसशी बोलताना अश्लील भाषा वापरली. एअर फर्स्टचे विमान दिल्लीहून गोव्याला जात होते. एअर इंडियाच्या विमानात महिला प्रवाशावर लघवी केल्याची घटना ताजी असताना ही नवीन घटना समोर आली आहे.
गो फर्स्ट विमानात एअर होस्टेससोबत घाणेरडे कृत्य
गो एअर फर्स्टच्या विमानात 5 जानेवारी रोजी ही घटना घडली आहे. महिला फ्लाइट क्रूने याबाबत सीआयएसएफकडे तक्रार केली आहे. यासोबतच एअरलाइनने या घटनेची संपूर्ण माहिती डीजीसीएला (DGCA) दिली आहे. अलीकडे प्रवासी आणि एअर होस्टेस यांच्याशी गैरवर्तनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीही अशा काही घटनो समोर आल्या होत्या.
दोन परदेशी प्रवाशांना विमानातून उतरवले
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन परदेशी पर्यटकांना महिला केबिन क्रूशी गैरवर्तन केले आणि अश्लिल भाषा वापरली. यानंतर विमान प्रशासनाने या परदेशी प्रवाशांना विमानातून खाली उतरवले. गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या गो फर्स्टच्या फ्लाइटमध्ये ही घटना घडली. टेकऑफपूर्वी दोघांना गोव्यात उतरवण्यात आले.
एअर इंडियाने माफी मागितली
याआधी एअर इंडियाच्या विमानात महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याची घटना घडली होती. हा प्रवासी मद्यधुंद अवस्थेत होता. महिलेने एअर इंडियाला दिलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी 4 जानेवारीला आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. एअर इंडियाने या घटनेबद्दल महिला प्रवाशाची माफी मागितली. तपास पूर्ण होईपर्यंत चार क्रू मेंबर्स आणि एका पायलटला ड्युटीवरून काढून टाकण्यात आले आहे. विमानात अल्कोहोल सर्व्ह करण्याबाबत विमान कंपनी आपल्या धोरणाचे पुनरावलोकन करत आहे.
इंडिगोच्या एअर होस्टेससोबत गैरवर्तन
याशिवाय नुकताच एक व्हिडीओही व्हायरल झाला होता ज्यामध्ये प्रवाशाने इंडिगोच्या एअर होस्टेससोबत गैरवर्तन केले होते. जेवणावरून प्रवासी आणि इंडिगो फ्लाइट अटेंडंट यांच्यात वाद झाला. जेवणासाठी योग्य पर्याय न मिळाल्याने प्रवासी भडकला होता.या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या