India Pakistan War Situation LIVE Updates: पाकिस्तानने युद्धबंदीचा केला भंग, श्रीनगरमध्ये स्फोटाची माहिती; जम्मू-काश्मीर अन् गुजरातमध्ये दिसले अनेक ड्रोन
India Pakistan War Situation LIVE Updates: LOC वर पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार. प्रत्युत्तरादाखल भारतानं केलेल्या कारवाईत पाकिस्तानी चौक्या होरपळल्या. पाकव्याप्त काश्मीरमध्येही भारताची जोरदार कारवाई.
पार्श्वभूमी
India Pakistan War Situation LIVE Updates: सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला (India Pakistan War) केला. शुक्रवारी रात्री पाकिस्तानने गुजरात, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि पंजाब या...More
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. भारताने स्वतःच्या अटींवर युद्धबंदी लागू केली आहे. यासाठी पाकिस्तानातून फोन आला. त्याच वेळी, संरक्षण मंत्रालयाने 'ऑपरेशन सिंदूर' बाबत पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, आम्ही पाकिस्तानचे मोठे नुकसान केले आहे. पाकिस्तानकडून ब्राह्मोस तळाचे नुकसान झाल्याचे वृत्त पूर्णपणे खोटे आहे. आम्ही पाकिस्तानची संरक्षण व्यवस्था नष्ट केली आहे. भारतीय सैन्य सुरक्षा प्रदान करण्यास सक्षम आहे. आम्ही कोणत्याही धार्मिक स्थळाचे नुकसान केलेले नाही. पाकिस्तानच्या अनेक एअरबसचे नुकसान झाले आहे.
सोलापूर पुणे हायवे वरती हैदराबाद कडून मुंबईकडे निघालेली लक्झरी बस अचानक पेटून जळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बेस्ट एक्सप्रेस नावाची लक्झरी बस नं .NL 01 B 1824 ही हैदराबाद कडून मुंबईकडे जात असताना चालू वाहनाने अचानक पेट घेतला. यावेळी स्थानिक व पोलिसांनी सतर्कता दाखवत गाडीतील प्रवाशांना तातडीने खाली उतरवले आणि अग्निशामक बोलवून आग विझवण्यास सुरुवात केली. दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग विझली मात्र तोपर्यंत ही लक्झरी बस संपूर्णपणे जळून गेली होती.
यात प्रवाशांचे प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आले असले तरी गाडीच्या डीकी मधील बॅगा , मोबाईल ,लॅपटॉप ,आंबे ,खाण्याचे साहित्य, मसाल्याचे वस्तू कपडे इत्यादी साहित्य मात्र पूर्णपणे जळून गेले आहे.
ही बस हैदराबादची असून पोलीस या बसचा चालक अब्दुल इम्तियाज याच्याकडे चौकशी करीत आहेत.
पाकिस्तानचे लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (DGMO) यांनी आज दुपारी ३:३५ वाजता भारतीय DGMO यांच्याशी फोनवर संपर्क साधला.
दोन्ही देशांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून जमीन, हवा आणि समुद्र मार्गाने होणारा सर्व प्रकारचा गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतला.
या सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही बाजूंनी सैन्याला सूचना दिल्या आहेत.
दोन्ही देशांचे DGMO १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करतील.
विदेश मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी म्हणाले, पाकिस्तानच्या डीजीएमओंचा भारताच्या डीजीएमओंना 15.35 वाजता फोन आला. दोन्ही बाजूंकडून फायरिंग, लष्करी कारवाया, हवाई आणि सागरावरुन होणाऱ्या कारवाया आज 5 वाजल्यापासून थांबवल्या जातील. डीजीएमओ 12 मे रोजी 12 वाजता पुन्हा चर्चा करतील.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तान यांनी तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दोन्ही देशांमधील दीर्घ चर्चेनंतर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे.
"अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या दीर्घ चर्चेनंतर, मी आनंदाने जाहीर करतो की भारत आणि पाकिस्तानने तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांचा सामंजस्यपणा आणि प्रसंगावधानासाठी अभिनंदन! या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या दाव्याला दोन्ही देशांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तथापि, आंतरराष्ट्रीय स्तरावर या घडामोडीकडे सकारात्मक पावले म्हणून पाहिले जात आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरात उद्या तिरंगा रॅली
- ‘ॲापरेशन शिंदूर’च्या समर्थनार्थ उद्या तिरंगा रॅली
- तिरंगा रॅलीत मोठ्या प्रमाणात नागपूरकर सहभागी होणार
- लॅा कॅालेज चौक ते शंकर नगर चौक दरम्यान तिरंगा रॅलीचं आयोजन
- तिरंगा रॅलीत उद्या सकाळी ८ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः चालत सहभागी होणार
- राज्यभरात ठिकठिकाणी उद्या तिरंगा रॅलीचं आयोजन
सुरक्षा दलांच्या बॉम्ब निकामी पथकाने आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांनी (एनएसजी) पाकिस्तानकडून डागण्यात आलेल्या ड्रोनचा माग काढला आणि तो नष्ट केला.
भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने अडवल्यानंतर हे ड्रोन जम्मूजवळील एका गावात पडले.
उल्हासनगर महापालिकेचे वेबसाईट देखील हॅक करण्याचा प्रयत्न केला होता मात्र महापालिकेच्या आय टी टीमकडून तो प्रयत्न हाणून पाडला आहे.
उल्हासनगर महापालिका वेबसाईट पुन्हा सुरू करण्यात आली आहे
उल्हासनगर महापालिकेचे वेबसाईट देखील हॅक करण्याचा प्रयत्न केला होता मात्र महापालिकेच्या आय टी टीमकडून तो प्रयत्न हाणून पाडला आहे. तरी शहरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता किंवा आपल्या मोबाईल किंवा संगणकामध्ये कोणतेही अनधिकृत लिंक ओपन न करता सायबर हल्ल्यापासून सावध राहण्याचा सतर्कतेचा इशारा उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा ओव्हाळे यांनी दिला आहे.
भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी करत शहरात फटाके फोडण्यास मनाई केली आहे.
पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, फटाक्यांचा जोरदार आवाज ऐकून कुणालाही कोणताही गैरसमज होऊ नये, म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे.
फटाक्यांचा आवाज कुणी चुकीचा समजून घेऊ नये आणि त्याचा शहरातील शांततेवर परिणाम होऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा आदेश लागू करण्यात आला आहे.
India Pakistan War : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, "ओसामा बिन लादेनला एका लष्करी क्षेत्रात आश्रय घेतलेले आढळले होते आणि पाकिस्तानच्या लष्करी संस्थांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला होता. पश्चिमी देशांनी आता हे ओळखले पाहिजे की पाकिस्तान हा एक अपयशी राष्ट्र आहे, आणि हाच तो योग्य काळ आहे जेव्हा सर्व जबाबदार राष्ट्रांनी एकत्र येऊन हे सुनिश्चित केले पाहिजे की, पाकिस्तानकडे असलेले अण्वस्त्र निष्प्रभ केले जातील. ही अण्वस्त्रे संपूर्ण मानवतेसाठी एक मोठा धोका आहेत. पाकिस्तान भारताला अस्थिर करण्यासाठी दहशतवादाचा वापर करत आहे," असे त्यांनी म्हटले आहे.
India Pakistan War : भारतीय लष्कराने पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या आणखी एका हल्ल्याचा प्रयत्न यशस्वीपणे हाणून पाडला आहे. लष्कराने नौशेरा भागात एक ड्रोन पाडला आहे.
India Pakistan War : भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणाले, "ही अत्यंत दु:खद गोष्ट आहे की जे लोक या देशाला तोडून निघून गेले, त्यांनी गेल्या 75 वर्षांपासून भारताला कमकुवत करण्याचा, हिंदू-मुस्लिमांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा आणि देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांकडे फाळणीबद्दल बोलण्यासाठी खूप काही आहे, पण माझा विश्वास आहे की जे नापाक होते ते येथून निघून गेले आणि जे प्रिय होते ते इथेच राहिले, असे त्यांनी म्हटले आहे.
भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानचा आणखी हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे, सैन्यानं नौशेरामध्ये ड्रोन पाडला आहे.
India Pakistan War : पाकिस्तानसोबतच्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील जैसलमेरमधील रेल्वे स्टेशन बंद करण्यात आले आहे. नागरिकांना त्यांच्या घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
India Pakistan War : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान एकीकडे म्हणतो की तो युद्ध नको आहे, पण दुसरीकडे आमच्यावर हल्ले करतो. पाकिस्तानचे हे दुटप्पी धोरण आता चालणार नाही. पंजाबने नेहमीच आघाडीवर राहून लढाई लढली आहे आणि आता देखील आघाडीवर राहून लढाई लढेल. घाबरण्याची कोणालाही गरज नाही. पंजाबकडे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. सध्या सर्व धर्मीय लोक एकत्र आहेत आणि सर्व राजकीय पक्षही एकत्र आले आहेत. आज संध्याकाळी चार वाजता सर्व धर्मांच्या प्रतिनिधींसोबत बैठक बोलावण्यात आली आहे. पाच वाजता सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारने पाकिस्तानच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सामान्य नागरिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
"जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या अलीकडील गोळीबारामुळे अनेक निर्दोष नागरिकांचा बळी गेला आहे. या दु:खद घटनेवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून शोक व्यक्त करण्यात आला असून, मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची सानुग्रह (ex-gratia) मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “निर्दोष नागरिकांचे प्राण गेल्याने आम्हाला अत्यंत दु:ख झाले आहे. माझे सरकार आपल्या जनतेची हानी कमी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे.”
“कोणतीही भरपाई कधीच एखाद्या प्रिय व्यक्तीची जागा घेऊ शकत नाही किंवा कुटुंबावर झालेली मानसिक आघात भरून काढू शकत नाही. मात्र सहानुभूती आणि एकजुटीचा भाव म्हणून मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल,” असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे", असं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं
रताकडून आता केवळ पाकिस्तानच्या (Pakistan) हल्ल्यांपासून फक्त संरक्षणाची रणनीती न अवलंबता नुकसान होईल, असे मोठे प्रतिहल्ले करण्यास सुरुवात झली आहे. त्यामुळे आता पाकिस्तान नरमताना दिसत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी यासंर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आम्हाला युद्ध नको शांती हवी, असे वक्तव्य इशाक दार (Ishaq Dar) यांनी केले आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
India Pakistan War : पाकिस्तानविरोधात भारताने केलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर तसेच पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांच्याशी फोनवर चर्चा केली. न्यूज एजन्सी IANS ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, फैसल बिन फरहान यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी आणि सुरू असलेल्या सैन्य संघर्षाचा शांततामय मार्गाने शेवट करण्याच्या उद्देशाने राजनैतिक प्रयत्नांवर चर्चा केली.
India Pakistan War : होशियारपूर जिल्ह्यातील टांडा परिसरातील सीकरी या दूरस्थ गावातून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका शेतात ड्रोन अपघातग्रस्त स्थितीत आढळून आले. स्थानिक नागरिकांनी याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले आणि त्यांनी हे ड्रोन पोलिसांच्या ताब्यात दिले.
India Pakistan War : पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तराच्या पार्श्वभूमीवर तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. पंतप्रधान निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीस संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि सीडीएस अनिल चौहानही उपस्थित आहेत. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबतही बैठक घेतलेली आहे.
पाकिस्तानकडून सुरु असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांची बैठक सुरु.
SEAD मिशन नंतर, आज भारताने DEAD मिशन म्हणजेच डिस्ट्रक्शन ऑफ एनिमी एयर डिफेन्स केले.. सिंदूर-२ मध्ये, भारतीय हवाई दलाने SEAD: म्हणजे सप्रेशन ऑफ एनिमी एयर डिफेन्स केलं होतं.
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा भारतीय सैन्यदल रोज पुराव्यासह टराटरा फाडत आहे. फोटो आणि व्हिडीओ दाखवून भारताने पाकिस्तान सरकार आणि मीडियाच्या फेकन्यूज उघड्या पाडल्या आहेत. भारतीय हवाई दलाच्या महिला पायलटला पकडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. मात्र भारताच्या पीआयबीने (Press Information Bureau) हे वृत्त फेक असल्याचं सिद्ध केलं आहे. भारतीय महिला हवाई दलाच्या पायलट स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंग (Shivani Singh) यांना पकडल्याचा दावा पाकिस्तानी समर्थक सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आला होता. मात्र कोणत्याही भारतीय महिला हवाई दलाच्या पायलटला किंवा कोणत्याही सैनिकाला पकडण्यात आलेले नाही, असं पीआयबीने म्हटलं आहे.
श्रीनगरमध्ये तीन मोठे स्फोट झाल्याचं वृत्त
श्रीनगरच्या विमानतळ परिसरात संशयास्पद ड्रोन आढळले
ड्रोनविरोधी क्षेपणास्त्रांचा संशयास्पद ड्रोनवर मारा
विमानतळ परिसरातली वीज घालवली
जम्मू व काश्मीर मधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील धार्मिक स्थळे ही हाय अलर्टवर असून श्री सिध्दिविनायक मंदिरास धोका असल्याबाबतचे इनपुट प्राप्त झाल्याचे सुरक्षायंत्रणांनी मंदिरास अवगत केले आहे.
या पार्श्वभूमीवर मंदिराच्या सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासंदर्भात न्यासाचे मा. अध्यक्ष, श्री. सदानंद सरवणकर, राज्यमंत्री दर्जा यांच्या अध्यक्षतेखाली दि. ८ मे, २०२५ रोजी आयोजित केलेल्या न्यास व्यवस्थापन समितीच्या बैठकीत मंदिर परिसरात नारळ आणण्यास मनाई करण्याचा तसेच रविवार, दि. ११ मे, २०२५ पासून श्रीं ना फुले, हार, मिठाई इ. अर्पण करण्यास तात्पुरत्या स्वरूपात मनाई करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आलेला आहे. तथापि दूर्वांची जुडी, जास्वंदीच फूल आणण्यास प्रत्यवाह नाही. त्यास अनुसरून याबाबत सहकार्य करण्याचे भाविकांना आवाहन करण्यात येत आहे.
तसेच मंदिर परिसरातील फुलविक्रेत्या संघटनेच्या प्रतिनिधीशी चर्चा करण्यात आली. त्यांनी देखील देशाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी म्हटले की, पाकिस्तानकडून भारताच्या पश्चिमी सीमेवर ड्रोन, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं, लॉटरिंग मिशन ड्रोन आणि लढाऊ विमानांच्या साहाय्याने भारताच्या लष्करी तळांना आणि नागरी वस्त्यांना लक्ष्य केले जात आहे. सीमारेषेवरही पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरु आहे. नियंत्रण रेषेवर 26 ठिकाणी पाकिस्तानने हवाई घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. मात्र, भारताने जवळपास सर्व हल्ले निष्प्रभ केले आहेत. तरीही उधमपूर, पठाणकोट, भूज, आदमपूर , भटिंडा येथे लष्करी तळावर काहीप्रमाणात हानी झाली आहे. पाकिस्तानने शुक्रवारी पहाटे 1 वाजून 40 मिनिटांनी पंजाबमधील लष्करी तळावर हल्ला करण्यात आला. यावेळी श्रीनगर, अवंतीपूर आणि उधमपूर येथील हवाई तळ आणि एका शाळेला लक्ष्य करण्यात आले.
पाकिस्तानच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या टेक्निकल इन्स्टॉलेशन, कमांड सेंटर, रडार साईट आणि शस्त्रांच्या गोदामाला लक्ष्य केले. पाकिस्तानच्या रफिकी, मुरीद, चकलाला, रहिम यार, सुकूर या हवाई तळांवर हल्ले करण्यात आले. या पाच ठिकाणी भारतीय वायूदलाच्या फायटर जेटनी हल्ला केला. यामध्ये कुसूर येथील रडार आणि सियालकोट येथील लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानकडून लाहोरवरुन नागरी हवाई उड्डाणासाठी वापरण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय मार्गाचा दुरुपयोग केला जात आहे. पाकिस्तानी विमानांच्या हालचाली गुप्त ठेवण्यासाठी हे सुरु आहे. तसेच पाकिस्तानकडून भारताविरोधात अपप्रचार केला जात आहे, असे कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या सरगोधा हवाई तळावरही जोरदार स्फोट
सरगोधा हवाईतळाचं स्फोटात मोठं नुकसान झाल्याची माहिती
याआधी पाकिस्तानचे पाच हवाईतळांवर भारताने केले होते बेचिराख
हरियाणातल्या सिरसा इथे पाकिस्तानी फतह-1चा भारताच्या बराककडून वेध
भारताच्या सरफेस टू एअर मिसाईल बराकची धमाकेदार कामगिरी
फतह-1 चं लक्ष्य होतं भारताची राजधानी दिल्ली
दिल्लीत पोहोचण्याआधीच भारताच्या बराकने घेतला फतहचा वेध
पाकिस्तानच्या गाजावाजा झालेल्या फतह-1 चा फ्लॉप शो
पाकिस्तानी फतह-1 झालं बराकसमोर चारीमुंडया चीत
मुंबई : भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान (India VS Pakistan) मुंबईतील मजूर बापाचा लेक जवान मुरली नाईक (Murali Naik) हे शहीद (martyr) झाले आहेत. उरी सेक्टरमध्ये पाकड्यांशी लढताना नाईक यांना वीरमरण आले आहे. ही बातमी गावी येताच कुटुंबीयांवर दु:खांचा डोंगर कोसळला असून सऱ्यांनी एकच टाहो फोडला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
मुंबई : भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान (India VS Pakistan) मुंबईतील मजूर बापाचा लेक जवान मुरली नाईक (Murali Naik) हे शहीद (martyr) झाले आहेत. उरी सेक्टरमध्ये पाकड्यांशी लढताना नाईक यांना वीरमरण आले आहे. ही बातमी गावी येताच कुटुंबीयांवर दु:खांचा डोंगर कोसळला असून सऱ्यांनी एकच टाहो फोडला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
9 मे 2025 रोजी भारतीय सीमा सुरक्षा दलाने (BSF) जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत 7 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. आता या पाठोपाठ भारतीय सैन्याकडून 28 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
पाकिस्तानच्या एअरबेसवर भारताचा तुफान मारा
पाकिस्तानचा रहीम यार एअरबेस भारताने करून टाकला बरबाद
रहीम यार एअर बेसवर भारताचा तुफानी क्षेपणास्त्र हल्ला
रहीम यार एअरबेसची धावपट्टी पूर्णपणे बेचिराख
रहीम यार एअरबेसची धावपट्टी उद्ध्वस्त
रहीम यार एअर बेसवर पडलं प्रचंड मोठं भगदाड
पाकिस्तानकडून ड्रोन आणि हलक्या विमानांद्वारे हल्ले सुरूच
भारताच्या लष्करानं निवेदन प्रसिद्ध करुन दिली माहिती
अमृतसरच्या खासा कँटोनमेंटवर अनेक ड्रोनद्वारे हल्ला
पहाटे पाच वाजता पाकचे अमृतसरवर ड्रोन हल्ले
भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी पाकचे ड्रोन हवेतच उडवले
भारताची सार्वभौमता आणि नागरिकांवरचे हल्ले खपवून घेणार नाही
पाकिस्तानचा भारताच्या संघर्षात अफगाणिस्तानला ओढण्याचा प्रयत्न
भारतानं अफगाणिस्तावरही हल्ले केल्याचा पाकचा कांगावा
पाकचे ले. जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी केला दावा
भारताच्या एअरबेसवरच्या हल्ल्यांना दिली पुष्टी
भारत युद्ध लादत असल्याच्या ले.जन.चौधरींच्या उलट्या बोंबा
पाकच्या पंतप्रधानांनी बोलावली महत्वाची बैठक
नॅशनल कमांड अथॉरिटीची बोलावली बैठक
भारताच्या हवाई हल्ल्यानंतर शाहबाज शरीफनी बोलावली बैठक
जम्मू परिसरात भारतीय सैन्याने पाकिस्तानची चेक पोस्ट उद्ध्वस्त केली. दहशतवादी तळही उद्ध्वस्त केला.
भारत आणि पाकिस्तानच्या (India vs Pakistan War) तणावादरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हरियाणातल्या सिरसामध्येच पाकिस्तानचे क्षेपणास्त्र पाडण्यात आले. पहाटेपासून भारत-पाकमध्ये जोरदार हवाई हल्ले सुरू आहे. सविस्तर बातमी वाचा
पाकच्या गोळीबारामध्ये अति.जिल्हा विकास आयुक्तांचा मृत्यु
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दिली माहिती
राजौरीमध्ये आयुक्त राज कुमार थापांचा मृत्यु
मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत झाले होते सहभागी
पाकिस्तानकडून भारतावर क्षेपणास्त्र हल्ल्याचे प्रयत्न सुरूच
फतेह-१ क्षेपणास्त्राद्वारे पाकिस्तानचा भारतावर मारा
पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात भारताच्या हवाई तळांना लक्ष्य
जम्मू,उधमपूर,पठाणकोट,श्रीनगर, व्यास हवाई तळांवर हल्ले
श्रीनगर आणि पूँछमध्ये मोठ्या स्फोटांचं वृत्त
अखनूर आणि उधमपूरमध्येही मोठ्या स्फोटांचे आवाज
भारतीय वायूदलाच्या विमानांनी पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ला केला आहे. रावळपिंडीलगतच्या नूर खान हवाई तळावर हल्ला. भारताचा मोठा हल्ला
शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. शुक्रवारी रात्री पाकिस्तानने गुजरात, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि पंजाब या ४ राज्यांमधील २६ शहरांवर ड्रोन हल्ले केले. श्रीनगर विमानतळावरही हल्ला झाला. उत्तरेत जम्मूमधील बारामुल्ला ते पश्चिमेत गुजरातमध्ये भुज दरम्यान पाकिस्तानने 26 शहरांना लक्ष्य केलं. नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले करत पाकिस्तानने भारतीय लष्कराला डिवचण्याचं काम केलं. मात्र काही वेळातच भारतीय लष्कराने पाकला जशास तसं उत्तर दिलं. पाकिस्तानमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी तणाव कमी करावा अशी भूमिका अमेरिकेनं घेतली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या संपर्कात असल्याचं व्हाइट हाऊसनं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सुरु असलेली बैठक संपली आहे. राजनाथ सिंह, अजित डोवाल, सीडीएस अनिल चौहान यांच्यासह तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.
पाकिस्ताननं काल केलेल्या हल्ल्यांचं भारतानं प्रत्युत्तर दिलं
पाकिस्तानचे जे दावे आहेत की त्यांनी धार्मिक ठिकाणांवर हल्ले केलेले नाहीत, ते चुकीचे आहेत. कालचं ते दाखवून दिलं आहे.
पुंछमधील गुरुद्वारावर पाकिस्ताननं हल्ला केला. स्थानिक व्यक्तीचा मृत्यू झाला.
भारतानं स्वत:च्या शहरांवर हल्ले केल्याची पाकिस्तानची थापेबाजी सुरु
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातून पाकिस्तानचा भारताच्या एकात्मतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न
कर्तारपूर साहीब कॉरिडारसंदर्भातील पुढील आदेशापर्यंत सर्व गोष्टी स्थगित करण्यात आलेत.
पुंछमध्ये पाकिस्तानी शेलच्या हल्ल्यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
पाकिस्तानी सैन्याकडून गुरुद्वारा, कॉन्वेंट स्कूल आणि मंदिरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न
भारतानं पाकिस्तानात चार केंद्रांवर ड्रोन हल्ले केले. यामध्ये एका ड्रोनला पाकिस्तानची एडी ड्रोन यंत्रणा उद्धवस्त करण्यात यश आलं.पाकिस्तानकडून नागरी विमान सेवेचा ढाल म्हणून वापर केला जातोय. लाहोर ते कराची दरम्यान विमान वाहतूक सुरु असताना पाकिस्तानकडून ड्रोन हवाई हल्ले सुरु होते : व्योमिका सिंग
कर्नल सोफिया कुरेशी
8 ते 9 मे दरम्यान पाकिस्ताननं भारतीय हवाई सीमेचं उल्लंघन
नियंत्रण रेषेवर पाकिस्तान सैन्याची गोळीबारी
आंतरराष्ट्रीय सीमा रेषा आणि नियंत्रण रेषेवर 300 ते 400 ड्रोनचा वापर, भारतानं यातील काही ड्रोन पाडले
मोठ्या प्रमाणावर हवाई घुसखोरीचा प्रयत्न, एअर डिफेन्स यंत्रणेची माहिती गोळा करणे, गोपनीय माहिती गोळी करणे
ड्रोनच्या अवशेषांवरुन समजतं की तुर्की बनावटीचे ड्रोन आहेत.
पाकिस्तानच्या सशस्त्र UAV नं भंटिडा सैन्य स्टेशनला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, तो निष्क्रीय करण्यात आला
पाकिस्तानमध्ये चार हवाई रक्षण यंत्रणांवर हल्ले करण्यात आले, त्यात एक यंत्रणा उद्धवस्त करण्यात आली.
उरी, पुंछ, राजौरी, उधमपूर यासह इतर ठिकाणी ड्रोन आणि गोळीबारी करण्याचा प्रयत्न
यामुळं भारतीय सैन्याचे काही जवान जखमी झाले.
पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरात त्यांचं नुकसान झालं.
पाकिस्तान साडे आठ वाजता ड्रोन आणि मिसाईल हल्ला केल्यानंतर नागरी हवाई क्षेत्र बंद केलं नाही. नागरी विमानांना ते ढाल म्हणून वापर करत आहेत.
Ind Pak Tension LIVE Updates: सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट पाठोपाठ आता शिर्डी देवस्थानही अलर्ट मोडवर आहे. मंदीरात वाहिली जाणारी फुलं आणि हारही स्कॅनिंग करायला सुरुवात झाली आहे. मंदिरात मोबाईलसह इलेक्ट्रीकल उपकरणांना आता सक्तीची बंदी घालण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून गर्दी वरती बारकाईनं लक्ष ठेवयाला सुरुवात करण्यात आली आहे.
India Pakistan War LIVE: सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील यंत्रणा ॲलर्ट मोडवर आहे. संवेदनशील भागात पेट्रोलिंगमध्ये वाढ करण्यात आली असल्याची गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याची माहिती. पोलीस,आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, नागरी संरक्षण दल,एनसीसी,एनएसएस आदी सर्व यंत्रणांची प्रात्यक्षिके तसेच पूर्वतयारी करून घेण्यात आलीय. सुरक्षेच्या दृष्टीनं संवेदनशील ठिकाणांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तारापूर, बीएआरसी, महत्वाची धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळं, लोकांची वर्दळ असते, अशा ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सोबतच पेट्रोलिंगही वाढवण्यात आली आहे.
Ind Pak tension LIVE Updates: भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, देशातील विमानतळांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज, गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली, देशभरातील विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यासाठी उचललेल्या पावलांचाही आढावा घेण्यात आला.
Ind Pak tension LIVE: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय
पंजाब मंत्रिमंडळाने घेतला निर्णय
सीमेवर 9 अँटी-ड्रोन सिस्टीम तैनात केल्या जातील
हाय-टेक सिस्टमद्वारे सीमेवर लक्ष ठेवले जाईल
पंजाब सीमेवर पहिल्यांदाच अँटी-ड्रोन यंत्रणा तैनात केली जाईल
India Pakistan War LIVE: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी
एअर इंडियानं प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या
प्रवाशांनी नियोजित वेळेच्या 3 तास आधी विमानतळावर पोहोचावे : एअर इंडिया
फ्लाइटच्या 75 मिनिटं आधी चेक-इन बंद होईल - एअर इंडिया
India Pakistan War LIVE: भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारची महत्त्वपूर्ण बैठक
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर थोड्याच वेळात होणार बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त व इतर महत्त्वाचे अधिकारी हजर राहणार
RSS on India Pakistan War LIVE: सरसंघचालक मोहन भागवतांकडून लष्कर आणि पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करण्यात आलं आहे. देश आणि पीडितांना 'ऑपरेशन सिंदूर'मुळं न्याय मिळाला, असं मोहन भागवत म्हणाले आहेत. भारताच्या लष्करी कारवाईशी संघ सहमत असल्याचंही मोहन भागवत म्हणाले आहेत. दहशतवाद्यांचे पाकमधले अड्डे उडवणं गरजेचं, अटळ होतं, असंही ते म्हणाले आहेत. सद्यस्थितीत सारा देश मोदी, सरकार आणि लष्करासोबत आहे, अशा विश्वासही सरसंघचालकांनी दिला आहे.
India Pakistan War LIVE: भारत आणि पाकिस्तानमधील ताज्या परिस्थिती लक्षात घेता, इंडिगो एअरलाइन्सनं श्रीनगर, जम्मू, लेह, अमृतसर, चंदीगड, धर्मशाला, बिकानेर, जोधपूर, किशनगड, राजकोट येथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमान सेवा 10 मेपर्यंत रद्द केल्या आहेत.
India Pakistan War LIVE: आयपीएलचे सामने स्थगित अनिश्चित काळासाठी स्थगिती आयपीएलचे 16 सामने शिल्लक
पाकिस्तानचे 7 दहशतवादी ठार घुसखोरी करताना बीएसएफनं उडवलं पाकच्या धांधार पोस्टही उडवली
इस्लामाबाद,कराची,लाहोरवर भारताचे हल्ले पाकची 45 क्षेपणास्त्रे जमीनदोस्त 50 हून अधिक ड्रोन हवेतच उडवले
Ind Pak Tension LIVE Updates: शाहबाज शरिफ यांना पाकिस्तानी खासदारांचा घरचा आहेर दिलाय. भारताचे पंतप्रधान मोदींचं नाव घ्यायलाही शरीफ घाबरतात, असं पााकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे खासदार शाहबाज अहमद यांनी म्हटलंय.
India Pakistan War LIVE: भारतानं पहलगाम हल्यानंतर राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'बाबत आक्षेपार्ह पोस्ट आणि अकाऊंट महाराष्ट्र पोलिसांकडून डिलीट करण्यात आल्या आहेत. 'ऑपरेशन सिंदूर'बाबत चुकीच्या आणि अफवा पसरवणाऱ्या पोस्टवर महाराष्ट्र पोलिसांची नजर आहे. दोन दिवसांत ऑपरेशन 'सिंदूर' 250 हून अधिक पोस्ट आणि लिंक महाराष्ट्र पोलिसांकडून डिलीट करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Ind Pak Tension LIVE Updates: भारतानं सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान इतका घाबरला की, दहशतवादाचा आश्रय असलेल्या पाकिस्ताननं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, त्याचा खास साथीदार छोटा शकील आणि मुन्ना झिंग्रा यांना लपवलं. सूत्रांनी दावा केला आहे की, हे तिघेही सध्या पाकिस्तान सोडून दुसऱ्या देशात पळून गेले आहेत.
भारताच्या हवाई हल्ल्यामुळे घाबरलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावत असल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे.
एजन्सीच्या सूत्रांनी असेही सांगितले की ते या इनपुटवर लक्ष ठेवून आहेत आणि ते असेही गृहीत धरत आहेत की कदाचित तो आणि त्याचे साथीदार पाकिस्तानात कुठेतरी असतील आणि एजन्सींची दिशाभूल करण्यासाठी असे इनपुट पसरवले जात आहेत.
एजन्सी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या विविध स्त्रोतांकडून मिळालेल्या सर्व माहितीची पडताळणी करत आहे.
India Pakistan War LIVE: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना भेटण्यासाठी एनएसए अजित डोभाल आणि आयबी प्रमुख पोहोचले. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाबाबत ते दोघेही गृहमंत्र्यांशी चर्चा करतील.
Ind Pak tension LIVE Updates: भारताने पाकिस्तानला आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं आहे. यामुळे पाकिस्तानला खूप नुकसान सहन करावं लागलं आहे. एक्स हँडल कराची पोर्ट ट्रस्टनं एक पोस्ट शेअर केली. त्यानुसार, भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत कराची बंदराचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
India Pakistan War LIVE: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरचं उड्डाण रद्द करण्यात आल्या आहेत. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हेलिकॉप्टर उड्डाणाला परवानगी नाकारली गेली आहे. हेलिकॉप्टर उड्डाणला परवानगी नसल्यानं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा नाशिक दौरा रद्द करण्यात आला आहे. पंकजा मुंडे शिरूरहुन हेलिकॉप्टरनं नाशिकला येणार होत्या. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आणि उद्योजकांसोबत बैठक होणार होती, पण आता ती रद्द करण्यात आली आहे.
India-Pakistan Tensions LIVE Updates: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस आणि तिन्ही लष्कर प्रमुखांसोबतची बैठक 2 तास चालली. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानसोबतच्या ताज्या परिस्थितीची माहिती दिली. त्याचवेळी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी हवाई दलानं केलेल्या कारवाईची माहिती दिली.
India Pakistan Attack News LIVE: दहशतवादाच्या बाबतीत भारताला इराणचा पाठिंबा मिळाला आहे. इराणनं दहशतवादाचा तीव्र निषेध केला आहे. एस. जयशंकर यांनी भारत-इराण संयुक्त बैठकीतही भाग घेतला.
India Pakistan War LIVE: भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित: बीसीसीआय अधिकारी
India Pakistan War: भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंडियन ऑईल कंपनीनं महत्त्वाची माहिती दिली आहे. देशभरात इंडियन ऑईलनं इंधनाचा पुरेसा साठा केला आहे. त्यामुळे पेट्रोलटंचाईची कुठलीही शक्यता नाही, त्यामुळे भीतीपोटी पेट्रोल पंपांवर रांगा लावू नका असं आवाहन इंडियन ऑईलनं केलं आहे.
India Pakistan War LIVE: भारत आणि पाकिस्तानातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील किनारपट्टी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. त्या अंतर्गत मुंबई पोलिसांनी भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने समुद्रकिनारे, बंदरे, गोदी आणि समुद्रमार्ग यांसह सर्व किनारपट्टी भागांमध्ये गस्त वाढवली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ‘सागरी कवच’ ही व्यापक तटरक्षक मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमाअंतर्गत सागरी गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच, मच्छीमारांना सतर्क राहण्यास आणि बोटींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही अनधिकृत व्यक्ती समुद्रामार्गे प्रवेश करू नये, यासाठी मच्छीमार बोटींच्या सर्व प्रवेश आणि जाण्याच्या मार्गांवर तपासणी वाढवण्यात आली आहे. या सर्व उपाययोजना सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येत आहेत.
Ind Pak tension LIVE: संपूर्ण भारतीय बनावटीच्या आकाश क्षेपणास्त्राचा पाकिस्तानला दणका
पाकिस्तानी हल्ला आकाश क्षेपणास्त्रांनी केला संपूर्ण निष्प्रभ
लष्कर आणि वायुदलाने पाकिस्तानविरोधात मारा केला 'आकाश'चा
भारताच्या सरफेस टू एअर आकाश सिस्टीमचा पराक्रम
India Pakistan War LIVE: भारत पाकिस्तान एलओसीवर उरीमध्ये चिनी क्षेपणास्त्र आढळून आलंय. भारतीय विमानांवर डागलेलं हे क्षेपणास्त्र फुटलेलं नाही. पाकिस्तानला चीनने दिलेल्या एअर डिफेन्स सिस्टीममधील हे क्षेपणास्त्र आहे.
India Pakistan War LIVE: भारत पाकिस्तान एलओसीवर उरीमध्ये चिनी क्षेपणास्त्र आढळून आलंय. भारतीय विमानांवर डागलेलं हे क्षेपणास्त्र फुटलेलं नाही. पाकिस्तानला चीनने दिलेल्या एअर डिफेन्स सिस्टीममधील हे क्षेपणास्त्र आहे.
Ind Pak Tension LIVE: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दुपारी साडेबारा वाजता बैठक बोलावली आहे. बीएसएफ आणि सीआयएसएफ महासंचालकांसोबत अमित शाहांची बैठक होणार आहे. भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.
India Pakistan War: भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंडियन ऑईल कंपनीनं महत्त्वाची माहिती दिली आहे. देशभरात इंडियन ऑईलनं इंधनाचा पुरेसा साठा केला आहे. त्यामुळे पेट्रोलटंचाईची कुठलीही शक्यता नाही, त्यामुळे भीतीपोटी पेट्रोल पंपांवर रांगा लावू नका, असं आवाहन इंडियन ऑईलनं केलं आहे.
India Pakistan War LIVE: सध्या आयपीएलचा अठरावा सीझन खेळवला जात आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता आयपीएलबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल स्थगित केली जाण्याची शक्यता आहे. केंद्र आणि सर्व फ्रँचायझी, भागधारकांच्या सल्ल्यानुसार आयपीएल स्थगित केली जाण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या हवाल्यानं मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून कोणतेही सामने खेळवले जाणार नाहीत, अशी माहिती मिळाली आहे.
मुंबईतील टाटा रुग्णालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे त्याशिवाय महाराष्ट्र सुरक्षा बलाची जवान सुद्धा मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत
जी माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे त्यामध्ये टाटा रुग्णालय प्रशासनाला धमकी चा मेसेज आला होता आणि त्यानंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे
रुग्णांच्या नातेवाईकांची ओळख पटवूनच रुग्णांच्या नातेवाईकाला रुग्णालयाच्या आतमध्ये सोडलं जातय काही वेळासाठी काही रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेर पोलिसांनी काढलं होतं आणि त्यानंतर पूर्ण इमारतीची तपासणी केल्यानंतर आता पुन्हा परिस्थिती पूर्ववत केली जात आहे
सध्याच्या स्थितीच्या अनुषंगाने एक मॉक ड्रिल सुद्धा मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाकडून करण्यात येत आहे
जम्मू काश्मिरमधील सीमेजवळच्या सांबा भागात बीएसएफच्या जवानांची मोठी कारवाई, जंगलात लपलेल्या ७ दहशतवाद्यांचा खात्मा, भारतात घुसण्याच्या तयारीत असताना यमसदनी धाडलं
Ind Pak tension LIVE: राजस्थानातील जैसलमेरमध्ये जिवंत बॉम्ब सापडला. सुरक्षा दल घटनास्थळी तपास करत आहेत. बॉम्ब स्क्वॉड टीमही घटनास्थळी उपस्थित आहे.
India Pakistan War Updates: मुंबईतील टाटा कॅन्सर हाॅस्पिटल इथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. टाटा हाॅस्पिटलला धमकीचा मेल आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. बाॅम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालं असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
India Pakistan War: हरियाणातील पंचकुला येथे सायरन वाजला आहे. सर्व लोकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, काल रात्री अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आले.
Ind Pak tension LIVE Updates: सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता, भारतीय रेल्वे जम्मू आणि उधमपूर ते दिल्लीपर्यंत तीन विशेष गाड्या चालवण्याची योजना आखत आहे, असं भारतीय रेल्वेनं म्हटलं आहे. सीमा तणावामुळे जम्मू आणि काश्मीर आणि शेजारील राज्यांमधील सर्व विमानतळ सर्व वाहतुकीसाठी बंद आहेत.
India Pakistan War Situation LIVE Updates: साउथ ब्लॉकमध्ये एक उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. ज्यामध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संरक्षण प्रमुख (सीडीएस), लष्कर, नौदल आणि हवाई दल प्रमुख आणि लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) यांच्यासोबत सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
Ind Pak tension LIVE: भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर पोलिसांचा बंदोबस्ता वाढवण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथकही मंदिर परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे. तसेच भाविकांना जास्त वेळ मंदिरात थांबू दिल जात नाहीये. सुरक्षेच्या कारणास्तव रात्रीपासूनच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरा बाहेर पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.
India Pakistan War Situation LIVE Updates: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केलाय. ते म्हणाले की, "पाकिस्तान आता आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करताना दिसेल, भारत विजयी आहे आणि कायम राहील."
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, 22 एप्रिल रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दुष्कर्म घडवले, ज्याला पंतप्रधान मोदींच्या दृढनिश्चयानं आणि सैनिकांच्या शौर्यानं योग्य उत्तर देण्यात आलंय.
पाकिस्तान हा एक निर्लज्ज देश आहे जिथे त्याचा दहशतवादी कारवायांमध्ये थेट सहभाग आहे.
पाकिस्तान जगासमोर ओरडत आहे. पाकिस्तानी लष्कराचे उच्च अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहतात.
सैन्यासोबत उभे राहणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे.
India Pakistan War: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षात घेता, मुंबई पोलिसांनी समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षा वाढवली. समुद्रकिनाऱ्यावर भेट देण्यासाठी आलेल्या आणि तिथे बसलेल्या लोकांना ताबडतोब समुद्रकिनाऱ्यापासून दूर जाण्यास सांगितलं जात आहे. हे छायाचित्र मुंबईतील दादर चौपाटीचे आहे जिथे पोलिस समुद्रकिनाऱ्यावरील दगडांवर बसलेल्या लोकांना दूर जाण्यास सांगत आहेत. सुरक्षेची खबरदारी म्हणून सर्वांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर जाण्यास सांगितले जात आहे.
India Pakistan War: भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर गुजरात सतर्क आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्त्वाची बैठक होत आहे. ही बैठक सकाळी 10.30 वाजता राज्य आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटर येथे होईल. यामध्ये राज्य सरकारचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Ind Pak tension LIVE: पाकिस्तानची परिस्थिती बिकट होताना दिसत आहे. त्यानं जागतिक बँकेकडून कर्ज मागितलंय. त्यानं इन्स्टाग्रामवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केलीय.
India Pakistan Attack News LIVE: खबरदारीचा उपाय म्हणून, नागरिकांना सतर्क राहण्याची आठवण करून देण्यासाठी चंदीगडमध्ये हवाई सायरन वाजवण्यात आले. पंजाब, राजस्थान आणि दिल्लीसह अनेक राज्ये हाय अलर्टवर आहेत.
India Pakistan War Situation LIVE Updates: युद्धाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात मासेमारीसाठी बोटी घेऊन जाताना मच्छिमारांनी दक्षता ठेवण्याची सूचना सुरक्षा यंत्रणांकडून मत्स्यव्यवसाय विभागाला देण्यात आल्या आहेत.
- भारतीय नौसेनेकडून समुद्रात ODA (ऑफशोअर डिफेन्स एरिया) या क्षेत्रात मच्छिमारांना मासेमारी करता येणार नाही. या क्षेत्राल बोटी आढळ्यास शूट-टू-किल चे आदेश देण्यात आले आहेत. ऑईल-रिग सारख्या क्षेत्रात मासेमारीला जाऊ नये अथवा वादळा पासून वाचण्याकरिता त्या क्षेत्राचा आश्रय घेऊ नये.
- मत्स्यवयसाय विभागातील LO ह्यांना सहकार्य करावे, कारण देशाची सागरी सुरक्षेची जबाबदारी मच्छिमारांवर सुद्धा असल्याने या कठीण परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांना आणि प्रशासनांना सहकार्य करावे, ही विनंती.
India Pakistan War LIVE: एकीकडे भारताला भिडण्याचा प्रयत्न करणारा पाकिस्तान अराजकतेच्या वाटेवर आहे. पहलगामचा मास्टरमाईंड असलेला पाकिस्तानचा लष्करप्रमुख आसिम मुनीर याचं काऊंटडाऊन सुरू झालंय. त्याची पदावरून उचलबांगडी करण्याची तयारी सुरू आहे. त्याला ताब्यात घेण्यात आल्याचं समजंतय. शमशाद मिर्झा पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख होण्याची शक्यता आहे. आसिम मुनारवर देशद्रोहाचा खटला चालवला जाऊ शकतो. त्यामुळे पहलगामचा कट रचणाऱ्या मुनीरचे दिवस आता भरलेत. आसिम मुनीरला तुर्कीला पाठवण्यात आलं आहे.
India Pakistan War Situation LIVE Updates: पाकिस्तान आणि भारत यांच्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसा ढवळ्या चंदिगडमध्ये पुन्हा हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले आहेत. अशातच नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
India Pakistan War Situation LIVE: भारत-पाकिस्तान तणावाचा शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. मुंबई शेअर मार्केटमध्ये बीएसई घसरणीसह उघडला.
तो सुमारे 400 अंकांच्या घसरणीसह उघडला. एनएसईमध्येही घसरण दिसून आली. युद्धाचा बाजारातील भावनेवर परिणाम. युद्ध किती काळ चालेल? युद्धामुळे व्यवसायांवर परिणाम होईल या गोंधळात बाजार घसरणीसह उघडला.
India Pakistan War Situation LIVE: भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कोकण किनारपट्टीवर देखील अलर्ट मोडवर दिसत आहे. किनारपट्टी भागात गस्त वाढवण्यात आली आहे. रात्री पोलिसांकडून तपासणी करण्यात आली, तर अचानक नाकाबंदी देखील करण्यात आली होती. सिंधुदुर्गात समुद्रकिनाऱ्या लगत 92 लँडिंग पॉइंट असल्याने त्या ठिकाणी पोलिसांची गस्त पाहायला मिळाली. तर रेडी बंदर, विजयदुर्ग बंदर ,मालवण बंदर, देवगड बंदर, निवती बंदर, आचरा बंदर, वेंगुर्ला बंदर, या सर्वच ठिकाणी सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सागर सुरक्षा सदस्यांना देखील सतर्क राहून संशयित बोटी दिसल्यास पोलिसांना कळविण्याचा आव्हान केले आहे. सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने सागरी सुरक्षादल वाढ केली असून अतिरिक्त पोलीस देखील तैनात करण्यात आले. एखादी अनोळखी इसम किंवा संशयित वस्तू आढळल्यास 112 किंवा सिंधुदुर्ग पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात येत आहे.
India Pakistan War: भारताने पाकिस्तानला (India vs Pakistan War) रात्रभर मोठा दणका दिला. थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत धडक मारत जोरदार ड्रोन आणि हवाई हल्ले केले. त्यामुळे इस्लामाबादेत एकच हाहाकार माजलाय. कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांच्या आवाजांनी इस्लामाबाद हादरून गेलं. केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरचीही भारतीय सैन्यांनी झोप उडवली. पाकिस्तानातल्या 16 शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला. अनेक शहरांमध्ये ब्लॅक आऊट ठेवण्याची वेळ पाकड्यांवर आली.
सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा
वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तानातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वॅन्स यांनी आम्ही युद्धात पडणार नसल्याचं म्हटलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अतंर्गत प्रश्न आहे. वॅन्स यांनी यावेळेची अणू युद्ध होणार नाही हे देखील स्पष्ट केलं. मात्र, त्यापूर्वी अमेरिकेनं भारत आणि पाकिस्तानला तणाव कमी करण्याचं आणि चर्चा सुरु ठेवण्याचं आवाहन केलं होतं. याशिवाय तुर्कीनं देखील भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या संघर्षासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. तुर्कीच्या राष्ट्रपतींनी आम्ही तणाव कमी करण्याचे प्रयत्न करत असल्याचं म्हटलं.
India Pakistan War LIVE: मुंबईच्या साकिनाका परिसरात संशयास्पद ड्रोनमुळे खळबळ माजली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सहार विमानतळ येथून हा फोन आला होता. हजरत तय्यद जलाल मस्जिदच्या वरती ड्रोन आला होता. हा ड्रोन पुढे साकिनाका झोपडपट्टी परिसरात गेला. या प्रकरणी साकिनाका परिसरात पोलिसांकडून काॅंबिग ऑपरेशन राबवून ड्रोनचा शोध सुरू आहे.
India Pakistan War LIVE: मुंबईच्या साकिनाका परिसरात संशयास्पद ड्रोनमुळे खळबळ माजली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सहार विमानतळ येथून हा फोन आला होता. हजरत तय्यद जलाल मस्जिदच्या वरती ड्रोन आला होता. हा ड्रोन पुढे साकिनाका झोपडपट्टी परिसरात गेला. या प्रकरणी साकिनाका परिसरात पोलिसांकडून काॅंबिग ऑपरेशन राबवून ड्रोनचा शोध सुरू आहे.
India Pakistan Attack News LIVE: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशातील उना इथे आज शाळा बंद राहतील. देशातील इतर जिल्ह्यांमध्येही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
India Pakistan War LIVE: राजस्थानातील जैसलमेरमधील रामगड येथील बीएसएफ कॅम्पवर पहाटे 4.30 ते 5.30 वाजेपर्यंत ड्रोननं हल्ला करण्याचा आणखी एक प्रयत्न झाला, जो हवाई संरक्षण यंत्रणेनं हाणून पाडला.
India Pakistan War Situation LIVE Updates: भारतीय लष्करानं सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की, 8 आणि 9 मे च्या रात्री पाकिस्तानी सैन्यानं भारताच्या संपूर्ण पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रांचा वापर करून अनेक हल्ले केले. पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेवरही युद्धबंदीचं उल्लंघन केलंय. पण भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले आणि आणि त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. भारतीय सैन्य देशाच्या सार्वभौमत्वाचं आणि प्रादेशिक अखंडतेचं रक्षण करत राहील.
India Pakistan War Situation LIVE Updates: तुर्की (Turcky) आणि अझरबायजाननं पाकिस्तानला पाठिंबा देण्याच्या घोषणेवर शिवसेना नेत्या शायना एनसी म्हणाल्या की, "भारतानं नेहमीच तुर्कीचा आदर केलाय, परंतु तुर्कीनं ज्या पद्धतीनं पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे, त्यावरून ते दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचं दिसून येतं, आता तुर्कीवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याची वेळ आली आहे. तुर्कीसारखे देश दहशतवादाला आश्रय देत आहेत. भारतानं कधीही तुर्कीच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केलेला नाही, पण तुर्की दहशतवादाला पाठिंबा देत आहे, तुर्कीसारख्या देशावर बहिष्कार टाकला पाहिजे. भारतातून बरेच लोक तुर्कीयेला जातात, ज्यामुळे त्यांना महसूल मिळतो, आता तुर्की आणि अझरबैजान सारख्या देशांवर पूर्णपणे बहिष्कार टाकला पाहिजे."
Ind Pak Tension LIVE Updates: सांबा सेक्टरमध्ये जैश ए मोहम्मदच्या सात दहशतवाद्यांचा भारतीय लष्करानं केला खात्मा करण्यात आला आहे. 10 ते 12 दहशतवादी सांबा सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत होते. अशातच भारतीय लष्करानं अलर्ट राहत दहशतवाद्यांचा डाव मोडीत काढला आहे.
India Pakistan War Situation LIVE: युद्धजन्य पार्श्वभूमीवर सर्व वैद्यकीय सेवा अलर्ट मोडवर आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं आवाहन केलं आहे. सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय संस्थांना आवाहन करण्यात आलं आहे. तसेच, स्थानिक यंत्रणांसोबत समन्वय ठेवण्याचे आदेशही देण्यात आलेत. औषधे, खाटा आणि अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरेसा साठा ठेवा, असेही निर्देश दिले गेले आहेत. अधिकाधिक रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्ताचा साठा करा नागरिकांनी ही मदत करण्याचं आवाहन फेडरेशननं केलं आहे.
India Pakistan War Situation LIVE Updates: भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या बट्टल, मदारपूर, टेट्री नॉट आणि हाजिरा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तराची कारवाई सुरू केली. यामध्ये पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. भारतीय सैन्याने त्यांचे अनेक बंकर उद्ध्वस्त केले आहेत.
नवी दिल्ली : भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं जम्मू, राजस्थान, पंजाबच्या काही भागांमध्ये ड्रोन हल्ले केले. ड्रोन हल्ल्यांशिवाय पाकिस्ताननं भारतातील विविध भागात मिसाईल आणि लढाऊ विमानांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र भारताच्या एअर डिफेन्स यंत्रणेनं ते हल्ले परतवले. भारतानं पाकिस्तानच्या F-16 या लढाऊ विमानाचा पाडाव केला. याशिवाय याच्या पायलटला देखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्ताननं पाठवलेले F-16 हे विमान जगभरातील अधिक विश्वसनीय अन् अत्याधुनिक, लोकप्रिय लढाऊ विमान समजलं जातं.
India Pakistan War Situation LIVE: भारताशी वाकड्यात जाऊन, पाकिस्तानने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारलीय. एकीकडे भारत पाकिस्तानात घुसून कारवाई करत असताना, दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याला बलोच लिबरेशन आर्मीने घेरलंय. बलोच आर्मीने जवळपास पाकिस्तानच्या एक तृतीयांश भागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केलाय. केच, मस्टंग आणि कच्छीमधून बलोच आर्मीने पाकिस्तानला पळवलंय. बहुतांश भागात पाकचे झेंडे काढून बलोच आर्मीने त्यांचे झेंडे फडकावले आहेत. कालच सकाळी बलोच आर्मीने आयईडी ब्लास्ट करून, पाकिस्तानच्या 14 सैनिकांना यमसदनी पाठवलं होतं. याआधी याचवर्षी मार्च महिन्यात याच बलोच आर्मीने जाफर एक्स्प्रेसचं अपहरण करून पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले होते.
मुंबई :भारतानं ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर हल्ले करत ते उद्धवस्त केले. केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठकीत माहिती देत म्हटलं की ऑपरेशन सिंदूर द्वारे केलेल्या हल्ल्यात 100 जणांचा मृत्यू झाला. यानंतर पाकिस्ताननं भारताच्या 15 लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र एस-400 एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानच्या एच क्यू -9 या एअर डिफेन्स सिस्टीमला उद्धवस्त केलं. यानंतर देखील पाकिस्तानची वळवळ थांबलेली नाही. पाकिस्ताननं भारतावर ड्रोन, मिसाईल आणि हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला. राजस्थानमध्ये भारतानं पाकिस्तानचं एफ-16 हे विमान पाडलं. भारतानं पाकिस्तानच्या विमानाच्या पायलटला देखील ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.
सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा
नवी दिल्ली : भारताच्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानचे तुकडे पडणार हे निश्चित झालं आहे. कारण बलुचिस्तानच्या बलोच लिबरेशन आर्मीने (Balochistan Liberation Army BLA) पाकिस्तानच्या एक तृतीयांश भागावर कब्जा मिळवला आहे. बलोच आर्मीच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले. ही घटना म्हणजे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याकडे एक पाऊल असल्याची चर्चा आहे. पाकिस्तानच्या कुरापतीला उत्तर देताना भारताने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानवर हल्ला केला. लष्कर, नौदल आणि वायूदलाने संयुक्त कारवाई करत पाकिस्तानला पुरत नामोहरम केलं. त्यामुळे पाकिस्तान कोंडीत सापडला असताना बलुचिस्तामध्येही बंडखोरांनी तोंड वर काढलं.
India Pakistan War : भारत पाकिस्तान युद्धाला (India Pakistan War) सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्तानचे सगळे हल्ल्याचे प्रयत्न उधळून लावले आहेत. पाकिस्तानच्या महत्वाच्या शहरांवर भारताने हल्ले चढवले आहेत. त्यामुळं पाकिस्तानची स्थिती बिकट झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या युद्धाच्या मुद्यावर भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (External Affairs Minister S Jaishankar ) यांनी गेल्या 48 तासात 10 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी साधला संवाद साधला आहे. एस जयशंकर हे पाकच्या कुरघोड्यांविरोधात आक्रमक झाले आहेत.
India Pakistan War : भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी पाकिस्तानवर हल्ले सुरु केले आहे. महत्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्राचा हल्ला करण्यात आल्यानं पाकिस्तानची पळापळ सुरु झाली आहे. अशातच दहशतवादाच्या मुद्यावरुन अमेरिकेनं पाकिस्तानच्या पंतप्रधानांना चांगलच खडसावलं आहे. पाकिस्ताननं दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे. परिस्थिती आणखी बिघडू देऊ नका असे मत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी व्यक्त केले आहे.
India Pakistan Attack News LIVE: पाकिस्तानकडून होणाऱ्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, राजस्थानातील 5 जिल्ह्यांमधील सर्व शाळा आणि कोचिंग संस्था, जैसलमेर, बारमेर, बिकानेर, जोधपूर आणि श्री गंगानगर पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
India Pakistan War Situation LIVE Updates: पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात एक बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सीडीएस आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. गृहमंत्र्यांनी बीएसएफच्या महासंचालकांची भेट घेतली.
India Pakistan War LIVE: भारतानं पाकिस्तानला सर्वात मोठा दणका दिला तो म्हणजे कराचीत. ऑपरेशन सिंदूरपासून वायुदल आणि लष्कर पाकिस्तानला जाळून मारत असतानाच आता नौदलानंही अरबी समुद्रातून आघाडी उघडली. पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या आणि आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या कराचीवर भारतीय नौदलाने हल्ला केला. कराची बंदर भारतीय नौदलाने बेचिराख करून टाकलं. भारताची आयएनएस विक्रांत आणि आयएनएस कोलकाता यांनी कराची बंदर बेचिराख करून टाकलं. 14 पेक्षा अधिक स्फोटांनी कराची बंदर हादरून गेलं. भारतीय नौदलाच्या धडक कारवाईनंतर घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्ताननं कराची बंदरात ब्लॅकआऊट केलं. 1971 नंतर पहिल्यांदाच भारतीय नौसेनेनं पाकिस्तानच्या कराची बंदराला टार्गेट केलं.
Ind Pak tension LIVE Updates: भारतानं थेट पाकिस्तानात खोलवर घुसून पाकिस्तानला दणका द्यायला सुरूवात केलीय. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत धडक मारत जोरदार भारतीय फौजांनी ड्रोन आणि हवाई हल्ले केले. त्यामुळे इस्लामाबादेत एकच हाहाकार माजलाय. कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांच्या आवाजांनी इस्लामाबाद हादरून गेलं. केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरचीही भारतीय सैन्यांनी झोप उडवली. पाकिस्तानातल्या 16 शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला. अनेक शहरांमध्ये ब्लॅक आऊट ठेवण्याची वेळ पाकड्यांवर आली.
IND PAK War Updates: भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमिवर मुंबईतील मच्छिमारांसोबत नौदलाची झाली महत्वाची बैठक
नौदल ठिकाणं संवेदनशील ठिकाणी मच्छिमरांना मच्छिमारीसाठी न जाण्याच्या सूचना
नौदलाने आखून दिलेल्या परिसरात आल्यास 'शूट टू किल'च्या सूचना
लवकरच मुंबईतील मच्छिमार बोटींचं सर्वेक्षण करून एका अॅपच्या मदतीने त्यांचा डाटा गोळा केला जाणार
पकिस्तानकडून गुजराती मच्छिमारांचया काही बोटी ताब्यात घेतल्या असून मच्छिमारांना सोडून बोटी जप्त केल्याची सूत्रांची माहिती
२६/११ प्रमाणे या बोटींचा वापर पाकिस्तानकडून केला जाण्याची शक्यता असल्याने नेव्हीकडून अलर्ट जारी
India Pakistan War News Live: सांबा सेक्टरमध्ये बीएसएफ जवानांनी 7 दहशतवाद्यांना ठार मारले. हे दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरू आहे. त्यांना याचा फायदा घेऊन भारतात घुसखोरी करायची होती.
India Pakistan Attack News LIVE: काल रात्री, जेव्हा पाकिस्ताननं नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमा (IB) वर अनेक ठिकाणी ड्रोन पाठवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, तेव्हा उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नागरोटा आणि पठाणकोट सेक्टरमध्ये भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण युनिट्सनी केलेल्या मोठ्या प्रमाणात ड्रोन-प्रति-कारवाई दरम्यान 50 हून अधिक ड्रोन यशस्वीरित्या पाडण्यात आलं.
India Pakistan Attack News LIVE: भारतानं चिनाब नदीवरील सलाल धरणाचे अनेक दरवाजे उघडले आहेत. यामुळे पाकिस्तानमध्येही पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. भारतानं आधी सर्व दरवाजे बंद केले होते आणि आता अचानक ते उघडले आहेत.
India Pakistan War LIVE Updates: गुरुवारी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी भागात सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात एक महिला ठार झाली आणि एक महिला जखमी झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजरवाणीहून बारामुल्लाला जाणाऱ्या एका वाहनावर मोहुराजवळ गोळीबार झाला. या घटनेत नर्गिस बेगम या महिलेचा मृत्यू झाला, तर रजिक अहमद खान यांची पत्नी हाफिजा जखमी झाली. त्याला ताबडतोब उपचारासाठी जीएमसी बारामुल्ला येथे नेण्यात आले.
Indian Army Attack On Pakistan LIVE Updates: भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, पीएसएल दुबईला हलवण्यात आले आहे. गुरुवारी होणारा झल्मी आणि किंग्ज यांच्यातील सामना पुढे ढकलण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या तणावामुळे, पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) चे उर्वरित सामने दुबईमध्ये होतील."
IND PAK Tension LIVE: पाकिस्तानच्या पंजाबमधील बहावलनगर छावणीजवळ मोठ्या प्रमाणात स्फोट आणि गोळीबाराचे आवाज ऐकू आले. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, मोठा स्फोट आणि गोळीबाराच्या आवाजामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. दरम्यान, लोकांना त्यांच्या घरातील वीज बंद करण्यास सांगण्यात आले.
India Pakistan War LIVE Updates: इंडिगो एअरलाइननं एक अधिसूचना जारी केली आहे की, ज्यांनी 8 मे रोजी किंवा त्यापूर्वी श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह, चंदीगड, धर्मशाळा, बिकानेर, जोधपूर, किशनगड आणि राजकोट येथे प्रवासासाठी तिकिटे बुक केली आहेत, जर त्यांनी 22 मे पर्यंत तिकिटे रद्द केली किंवा प्रवासाचे वेळापत्रक बदलले तर अशा परिस्थितीत कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही.
India Pakistan War LIVE: भारत आणि पाकिस्ताननं अरबी समुद्रातील विविध ठिकाणी नौदल गोळीबार सरावासाठी अधिसूचना जारी केली आहे. उदाहरणार्थ, 8 ते 13 मे दरम्यान, भारतीय नौदल अरबी समुद्राच्या विविध भागात गोळीबार सराव करेल. त्याच वेळी, पाकिस्तानी नौदलाने 9 ते 12 मे दरम्यान गोळीबार सरावाचे नियोजन देखील केले आहे.
India Pakistan War Tension LIVE: भारतीय नौदलानं समुद्री हल्ल्यात कराची बंदर उद्ध्वस्त केलं आहे. 1999 नंतर भारताने पाकिस्तानवर समुद्री हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
India Pakistan Tension LIVE: देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, संरक्षण संस्थांच्या सुरक्षेबाबत आता कठोर पावले उचलली जात आहेत. या संदर्भात, पूर्व रेंजचे उपमहानिरीक्षक (DIG) डॉ. सत्यजित नायक यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. ही बैठक दुपारी 2 वाजता चांदीपूर येथील संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (DRDO) कार्यालयात होणार आहे. बैठकीत, चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणी आणि प्रूफ अँड एक्सपेरिमेंटल एस्टॅब्लिशमेंट (PXE) च्या सुरक्षा व्यवस्थेचा विशेष आढावा घेतला जाईल. ही बैठक PXE कॅम्पसमध्ये देखील होऊ शकते.
India Attack On Pakistan LIVE: अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी म्हटलंय की, ही संपूर्ण परिस्थितीत आणखी चिघळू नये ही अमेरिकेची मुख्य प्राथमिकता आहे. ते म्हणाले की, हा मुद्दा अनेक दशकांपासून सुरू आहे आणि अलिकडच्या आठवड्यात घडलेल्या घटना, विशेषतः दहशतवादी हल्ल्यानंतर, आश्चर्यकारक नसतील, परंतु निश्चितच अत्यंत निराशाजनक होत्या. परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी शांतता नव्हे तर संवाद आवश्यक आहे, असं अमेरिकेचं मत आहे, यावर ब्रूस यांनी भर दिला. गेल्या दोन दिवसांत अमेरिका दोन्ही देशांच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहे आणि संवाद घडवून आणण्यासाठी प्रमुख भूमिका बजावत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Indian Navy Attack on Pakistan LIVE: मुंबईहून कार्यरत असलेला भारतीय नौदलाचा पश्चिमी ताफा पूर्णपणे तैनात आहे आणि कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला किंवा चिथावणीला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. पश्चिम सागरी सीमेवर तैनात असलेला हा ताफा युद्धनौका, पाणबुड्या आणि पाळत ठेवणाऱ्या विमानांनी सुसज्ज आहे, जो कोणत्याही आव्हानाला योग्य उत्तर देण्यास सक्षम आहे.
Indian Navy Attacked Karachi LIVE: भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईचा एक भाग म्हणून, नौदलानंही आता जबाबदारी घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलानं पाकिस्तानच्या कराची बंदरावर आणि त्याच्याशी संबंधित मोक्याच्या ठिकाणांवर अचूक हल्ला केला आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांना आणि सीमेपलीकडून होणाऱ्या कारवायांना प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला आहे. नौदलाच्या या कारवाईमुळे कराचीमध्ये खळबळ उडाली आहे आणि पाकिस्तानच्या सागरी सुरक्षेला मोठा धक्का बसला आहे. भारतानं स्पष्ट केलंय की, ते प्रत्येक आघाडीवर जोरदार प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे तयार आहेत.
India Pakistan War LIVE: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये ड्रोन हल्ला सुमारे 35 मिनिटं चालला, रात्री 8.45 वाजता सुरू झाला आणि रात्री 9.15 ते 9.20 पर्यंत चालला. भारत सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचं वृत्त नाही. तसेच, कोणत्याही लष्करी किंवा नागरी वस्त्यांचं नुकसान झालेलं नाही. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून, अनेक भागांत अजूनही वीजपुरवठा खंडित आहे आणि सुरक्षा संस्था परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत.
India-Pakistan War Situation LIVE:. गुरुवारी पाकिस्ताननं जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथे हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. पाकिस्तानकडून अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागण्यात आली, जी भारताच्या एस-400 संरक्षण यंत्रणेनं प्रभावीपणे रोखली.
भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्रे डागल्यानंतर आणि दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने हे हल्ले केले. पाकिस्तान सरकार आणि त्यांचे सैन्य दहशतवादाला झालेला हा धक्का सहन करू शकले नाही आणि त्यांनी भारताविरुद्ध प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला, ज्याला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटल्याप्रमाणे, योग्य उत्तर दिले जात आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- भारत
- India Pakistan War Situation LIVE Updates: पाकिस्तानने युद्धबंदीचा केला भंग, श्रीनगरमध्ये स्फोटाची माहिती; जम्मू-काश्मीर अन् गुजरातमध्ये दिसले अनेक ड्रोन