Corona Vaccine Drive Live Updates | देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

Corona Vaccination Drive : भारतात आजपासून जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. देशात आज कोविड लसीकरणाचा शुभारंभ होत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Jan 2021 08:17 PM

गोंदिया :- जिल्ह्यात पहिल्याच दिवशी तिन केंद्रांवर आज 213 डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोवॅक्सीन लस दिली गेली,
तिन्ही केंद्रांवर कुणालाही कुठलाही एलर्जी किंवा रिएक्शन झाली नाही.
लातूर जिल्ह्यात लसीकरणाचे उद्दिष्ट्य 63 टक्के पूर्ण,
आज 600 लसीकरण करण्याचे उद्दिष्ट होते मात्र प्रत्यक्षात 379 आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे
सोलापूर जिल्ह्यात लसीकरणाचे 91.9 टक्के उद्दिष्ट पूर्ण... पहिल्या दिवशी 1011 जणांनी घेतली लस, 1100 जणांचे होते उद्दिष्ट
आजपासून सुरू झालेल्या देशव्यापी लसीकरण मोहिमेत बहुतांश ठिकाणी सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोव्हीशील्ड लस वापरली जातेय. मात्र महाराष्ट्रतील अठ्ठावीसशे लसीकरण केंद्रांपैकी फक्त सहा केंद्रं अशी आहेत ज्या ठिकाणी भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली कोव्हॅक्सीन लस दिली जातेय. खरं तर भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सीन लशीच्या दोनच ट्रायल पूर्ण झालेल्या असताना आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल बाकी असताना या लसीला केंद्र सरकारने परवानगी दिली होती. त्यामुळे आज या लसीद्वारे होणाऱ्या लसीकरणाला तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल म्हणूनही पाहिलं जातंय. परंतु आनंदाची बाब पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयात ही लस घेणाऱ्या कोणालाही कसलाही त्रास झालेला नाही.

इतिहासात कधीही अशाप्रकारचं आणि एवढ्या मोठ्या स्तरावर लसीकरण अभियान कधी झालेलं नाही. तीन कोटींपेक्षा कमी लोकसंख्या असलेले 100 पेक्षा जास्त देशत जगात आहेत. तर भारतात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच 3 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ही संख्या 30 कोटींवर नेण्याचा केंद्राचा मानस आहे.

सोलापूर जिल्ह्यात आज 1100 पैकी 992 जणांना लस देण्यात आली.
राजधानी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये देशातील कोरोनाची पहिली लस एका आरोग्य कर्मचाऱ्याला टोचली गेली. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन उपस्थित होते. सफाई कामगार असलेल्या मनीष यांनी लस घेतल्यानंतर सांगितलं की, माझा अनुभव खूप चांगला होता. लस घेताना मला काहीही अडचण आली नाही. लोकांनी घाबरुन जाऊ नये. माझ्या मनात जी भीती होती ती देखील निघून गेली आहे. सर्वांनी लस घ्यावी, असं मनीष कुमार यांनी म्हटलं.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत कोरोना लसीकरण सुरु


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या उपस्थितीत डॉ. मधुरा पाटील यांना मुंबईतील कोरोनाची पहिली लस
आपण क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत. संकटाच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी साथ दिली : मुख्यमंत्री
लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होतो, लस घेतल्यानंतर कोणालाही त्रास झाला नाही : राजेश टोपे
इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतिहासात कधीच अशी घटना घडली नव्हती- पंतप्रधान मोदी

विदेशी लसीपेक्षा भारतीय लस स्वस्त


भारतीय लस, विदेशी लसींच्या तुलनेत अतिशय स्वस्त असल्याचं सांगत त्यांचा वापरही तितकाच सोपा असल्याची बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. यावेळी त्यांनी परदेशी आणि भारतीय लसींच्या बनावटीची तुलना केली. साठवणीपासून लसीच्या वाहतुकीपर्यंत देशातील भौगोलिक परिस्थितीलाही लक्षात घेण्यात आल्याचा मुद्दा यावेळी त्यांनी मांडला.
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक, लसीकरणानंतरही काळजी घेणं गरजेचं : पंतप्रधान मोदी

लसीनंतरही मास्क, सोशल डिस्टन्स गरजेचं : मोदी


लसीची दुसरी मात्रा मिळाल्यानंतरही मास्क न वापरणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करण्याचं धाडस करु नका, मी तुम्हा सर्वांनाच ही विनंती करतो. कारण, लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर दोन आठवड्यांच्या कालावधीनंतर तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीत आवश्यक बदल होणार आहेत, पंतप्रधानांची महत्त्वाची माहिती.
पहिल्या टप्प्यात 3 कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे, दुसऱ्या टप्प्यात ही संख्या 30 कोटींवर नेण्याचा केंद्राचा मानस.

आज होणाऱ्या देशव्यापी कोरोना लसवाटप मोहिमेची चंद्रपूर जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 20 हजार कोविशील्ड लसींचे होणार वाटप प्रशासनाने या लसींच्या वाटपासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील 6 केंद्रांवर आज या लसीकरण मोहिमेला सुरुवात होईल ज्यामध्ये चंद्रपूर शहरातील 3 आणि ग्रामीण भागातील 3 लसीकरण केंद्रांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वैद्यकीय सेवेत असलेल्या 16 हजार 524 कोरोना योद्ध्यांना सर्वप्रथम ही लस दिली जाणार असून पहिल्या टप्प्यात 9 हजार जणांना ही लस देण्यात येणार आहे.
कोरोनावरील लस केव्हा येणार, असा प्रश्न विचारणाऱ्या सर्वांनाच मी हे सांगू इच्छितो की, लस आता आपल्यापर्यंत पोहोचली आहे. या प्रसंगी मी देशातील नागरिकांचं अभिनंदन करतो- पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कोरोना लसीचे 12 हजार डोस 14 जानेवारीला पोहोचले. आज गडचिरोलीतील चार तालुक्यांमध्ये ही लस देण्यात येणार आहे ज्यात गडचिरोली, अहेरी, चामोर्शी, आरमोरी तालुक्यांचा समावेश आहे. आज 400 लस देण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात 100 लसीकरणं करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 6 हजार कर्मचाऱ्यांना आणि दुसऱ्या 28 दिवसानंतरच्या दोन्ही डोजसाठी 12 हजार डोसचा साठा उपलब्ध झाला. यानंतर उर्वरीत कर्मचाऱ्यांसाठी पुढील आठवडयात साठा उपलब्ध होणार आहे. 14 तारखेला आलेल्या कोरोना लसीचे 12 हजार डोस आवश्यक तापमानात ठेवण्यात आले आहेत.
कोरोना लसीकरण मोहिमेसाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. केंद्र आणि राज्य शासन आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार आज जिल्ह्यातील एकूण १२ केंद्रांवर पहिल्या टप्प्यात ही मोहीम राबवण्यात येणार असून यात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्ह्यातील आठ ग्रामीण रुग्णालये आणि महानगरपालिका क्षेत्रातील चार नागरी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी, उपजिल्हा रुग्णालय कर्जत, शेवगाव ग्रामीण रुग्णालय, श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय, राहाता ग्रामीण रुग्णालय, संगमनेर ग्रामीण रुग्णालय, अकोले ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. याचबरोबर, महानगरपालिका क्षेत्रातील तोफखाना नागरी आरोग्य केंद्र, जिजामाता नागरी आरोग्य केंद्र, केडगाव नागरी आरोग्य केंद्र आणि नागापूर नागरी आरोग्य केंद्र येथे ही मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ३१ हजार १९६ आरोग्य कर्मचार्‍यांची नोंद पोर्टलवर करण्यात आली आहे. त्यात सुरुवातीच्या टप्प्यात या 12 केंद्रांतर्गत येणार्‍या आरोगय कर्मचार्‍यांचे लसीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यासाठी लसीचे 39 हजार डोस प्राप्त झाले आहेत. 100 जणांना प्रत्येक केंद्रांवर लस दिली जाणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यात आज 7 ठिकाणी प्रत्यक्ष लसीकरणाला सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे. लसीकरणासाठी लागणारे 19 हजार वायल्स जिल्ह्यात पोहोचले आहेत. जिल्ह्यात 16 हजार लाभार्थी नोंदणीकृत आहेत. सुरुवातीला फ्रण्टलाईन कर्मचारी, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, वार्ड बॉय इत्यादी लाभार्थ्यांना लस देण्यात येईल. जिल्ह्यात सात लसीकरण केंद्रात प्रत्येकी 75 ते 100 लाभार्थ्यांना लस देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात शेगाव, खामगाव, मलकापूर, बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा आणि मेहकर इथल्या शासकीय रुग्णालयात ही लस देण्यात येणार आहे.
नागपुरात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा, नागपूर जिल्ह्यात 12 केंद्रांवर लसीकरण, नागपूर शहरात पाच तर ग्रामीण क्षेत्रातील सात केंद्रांवर लसीकरण, नागपुरात डागा, एम्स, मेडीकल, मेयो, पाचपावली मनपा रुग्णालयात लसीकरण, तर ग्रामीणमध्ये रामटेक, कामठी, उमरेड, हिंगणा, काटोल, सावनेर, गोंडखैरीत लसीकरण, लसीकरणासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण

पार्श्वभूमी

मुंबई : भारतात आजपासून जगातील सर्वात मोठ्या कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी देशभरातील तीन लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड-19 लस दिली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडेदहा वाजता पहिल्या टप्प्यातील लसीकरण अभियानाची सुरुवात करतील.


 


पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं की, हे जगातील सर्वात मोठ लसीकरण अभियान आहे, ज्यात संपूर्ण देशाचा समावेश आहे. लोकसहभागाच्या माध्यमातून या अभियानाच्या सुरुवातीची तयारी झाली आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसीकरणासाठी एकूण 3006 केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.


 


1.65 कोटी डोस
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन म्हणाले की, सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या 'कोविशील्ड' आणि भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन' या दोन्ही लसींना सरकारने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली. दोन्ही लसींचे 1.65 कोटी डोस सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना डेटाबेसमध्ये असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार वितरित केले आहेत. कोविड-19 महामारी, लसीकरण आणि CoWin अॅप संदर्भात प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी कॉल सेंटर्सचीही स्थापना करण्यात आली आहे.


 


सर्वात आधी लस कोणाला?
सरकारच्या माहितीनुसार, सर्वात आधी एक कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रण्ट लाईनवर काम करणाऱ्या सुमारे दोन कोटी कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लस दिली जाईल. त्यानंतर 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेले परंतु गंभीर आजार असलेल्या लोकांचं लसीकरण होईल. सर्व आरोग्य कर्मचारी आणि फ्रण्ट लाईनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च सरकार करणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.