एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

India-China Standoff : भारत-चीनमधील तेराव्या फेरीची बैठक अनिर्णीत; शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीननं माघार घ्यावी, भारताचा स्पष्ट इशारा

India-China Standoff : भारत-चीनमधील तेराव्या फेरीची बैठक अनिर्णीत ठरली असून शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीननं माघार घ्यावी, असा स्पष्ट इशारा भारतानं चीनला दिला आहे.

India-China Standoff : पूर्व लडाखमधील वादावर काल (रविवारी) भारत-चीन (India-China) मध्ये तेरावी महत्त्वाची बैठक पार पडली. भारत (India) आणि चीन (China) यांच्यात काल, रविवारी पूर्व लडाखमधील सैन्यमाघारीच्या मुद्द्यावर लष्करी पातळीवर चर्चेची तेरावी फेरी झाली. ही बैठक तब्बल आठ तास चालली. बैठकीनंतर भारताकडून अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलं आहे. भारतीय लष्कराकडून माहिती देण्यात आली आहे की, "बैठकीत एलएसीच्या इतर परिसरांत तणाव दूर करण्याच्या दृष्टीकोनातून चर्चा झाली. परंतु, बैठक निष्फळ ठरली. दरम्यान, भारतीय लष्करानं चीनला स्पष्टपणे सांगितलं आहे की, या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीनने माघार घ्यावी.

चिनी शिष्टमंडळाने प्रस्ताव स्विकारला नाही : भारतीय लष्कर

भारतीय सैन्यानं म्हटलं आहे की, "बैठकीदरम्यान, एलएसीच्या उर्वरित भागातील तणाव संपवण्यासाठी चर्चा झाली. भारताने स्पष्टपणे सांगितलं की, एलएसीमध्ये अशी परिस्थिती चीनच्या एकतर्फी कारवाईमुळे (घुसखोरी) निर्माण झाली आहे. जे दोन्ही देशांमधील कराराचे उल्लंघन आहे. म्हणूनच, चीनने अशी पावले उचलली पाहिजेत (मागे हटण्यासाठी) जेणेकरून एलएसीच्या बाजूने शांतता पूर्ववत होईल." तसेच लष्कराकडून माहिती देण्यात आली की, हा प्रस्ताव चिनी शिष्टमंडळाने स्वीकारला नाही, त्यामुळे बैठक अनिर्णीत राहिली.

भारतीय लष्कराचं म्हणणं आहे की, "दोन्ही बाजूंनी दळणवळण राखण्यासाठी आणि जमिनीच्या पातळीवर स्थिरता राखण्यासाठी सहमती दर्शविली आहे. आम्हाला आशा आहे की, चिन द्विपक्षीय संबंधांचा एकूण दृष्टीकोन विचारात घेईल आणि प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन करून उर्वरित समस्यांचे लवकर निराकरण करण्यासाठी काम करेल." 

भारत-चीन यांच्यातील बैठक तब्बल आठ तासांनी संपली

पूर्व लडाखमधील वादावर काल (रविवारी) भारत-चीन (India-China) मध्ये तेरावी महत्त्वाची बैठक पार पडली. भारत (India) आणि चीन (China) यांच्यात काल, रविवारी पूर्व लडाखमधील सैन्यमाघारीच्या मुद्द्यावर लष्करी पातळीवर चर्चेची तेरावी फेरी झाली. ही बैठक तब्बल आठ तास चालली. दरम्यान, या बैठकीत कोणत्या मुद्द्यावर आणि काय चर्चा झाली, यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि चीन या दोन्ही देशांत लष्करी पातळीवर काल तेराव्या फेरीची बैठक पार पडली. संध्याकाळी 7 वाजता ही बैठक पार पडली. सकाळी 10.30 वाजता चीनमधील पीएलए सेनेच्या मेल्दो गॅरिसनमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूर्व लडाखला लागून असलेल्या एलएसीवरील तणाव संपवण्यासाठी भारत आणि चीनमध्ये लष्करी पातळीवर तेराव्या फेरीची बैठकआयोजित करण्यात आली होती. ही बैठक पीएलए सैन्याच्या मोल्दो येथे पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये पूर्व लडाखच्या गरम पाण्याच्या झऱ्यापासून मागे हटण्यावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. 12 फेऱ्यांच्या बैठकीदरम्यान, पूर्व लडाखला लागून असलेल्या वास्तविक नियंत्रण रेषेच्या (एलएसी) फिंगर एरिया, कैलाश हिल रेंज आणि गोगरा भागात विघटन करण्यात आलं होतं. पण हॉट स्प्रिंग, डेमचोक आणि डेपसांग मैदानावर अजूनही तणाव कायम आहे. याबाबत कालच्या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. 

भारताच्या बाजूने, लेह स्थित 14व्या कोर (फायर अँड फ्युरी कॉर्प्स) चे कमांडर लेफ्टनंट जनरल पी.जी.के मेनन यांनी बैठकीत भाग घेतला होता. तर दक्षिणी झिंजियांग मिलिटरी डिस्ट्रिक्टचे कमांडर चिनच्या बाजूने बैठकीचे प्रतिनिधित्व करत होते.

चीनची नवी कुरापत 

अरुणाचल प्रदेशजवळ असलेल्या एलएसी (LAC) वर चिनी सैनिकांना बंदी केल्याचं वृत्त मिळाल्यानंतर चीनमधील सरकारी पत्रकारांनी गलवान खोऱ्यातील हिंसेत ताब्यात घेतलेल्या भारतीय सैनिकांचे फोटो जारी केले आहेत. या फोटोंमध्ये चिनी सैन्याच्या ताब्यात भारतीय सैनिक आणि त्यांची हत्यारं दिसत आहेत. 

दरम्यान, गेल्या आठवड्यात अरुणाचल प्रदेशातील यांगत्सेमध्ये चीनजवळ 200 सैनिकांनी एसएसीचं उल्लंघन केलं होतं. यादरम्यान, भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये फेसऑफ म्हणजेच, वाद निर्माण झाला होता. या संदर्भात काल म्हणजेच शुक्रवारी, वृत्त आलं की, या दरम्यान भारतीय लष्करानं चिनी सैनिकांना ओलीस ठेवलं आहे. तसेच, दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर्सच्या फ्लॅग मिटिंगनंतरच त्यांची सुटका झाली होती. या घटनेनंतर चिनच्या काही सरकारी पत्रकारांनी गलवान खोऱ्यातील हिंसेच्या तब्बल 16 महिन्यांनंतर फोटो सोशल मीडियावर जारी केले आहेत. तसेच गलवान खोऱ्यातील हिंसाचारानंतर चिनी सैन्यानं त्या युद्धात भारतीय सैनिकांना ओलिस ठेवलं होतं, हे दाखवण्याचा प्रयत्न केला.

गलवान खोऱ्यातील हिंसाचारात दोन्ही देशांच्या सैनिकांनी समोरील देशाच्या सैनिकांना ओलिस ठेवलं होतं. त्यानंतर लष्करी कमांडर्समध्ये झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या सैनिकांना सोडून दिलं होतं. 

दरम्यान, भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही देशांच्या सैनिकांमधील हिंसक झडपेत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनचेही सैनिक यामध्ये मारले गेल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र यामध्ये जीवितहानी झाल्याचे वृत्त चीनकडून सातत्याने नाकारण्यात येत होते. मात्र आता चिनी सरकारने या झटापटीत चार सैनिक मारले गेल्याचे कबूल केले असून त्यांची नावे देखील जाहीर केली आहे.

15 जूनच्या रात्री नेमकं काय घडलं?

भारत आणि चीनमध्ये 6 जून रोजी मेजर जनरल रँक लेव्हलची चर्चा झाली होती. यामध्ये सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती झाली होती. 6 जूनच्या चर्चेनुसार चीनच्या सैनिकांना त्यांच्या सीमेत आणखी मागे जाण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र शांततेत चर्चा करण्याऐवजी चीनने वाद घालण्यास सुरुवात केली.

त्यानंतर भारतीय सैनिक आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली. घटनास्थळी भारतीय जवानांची संख्या चीनच्या सैनिकांच्या तुलनेने कमी होती. यावेळी चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर लाठ्याकाठ्या, दगड आणि टोकदार हत्यारांना भ्याड हल्ला चढवला. या हल्ल्यात 20 जवान जखमी झाले होते. त्यानंतर आज सकाळी भारतीय लष्कराने एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाल्याची माहिती दिली होती. यामध्ये कर्नल संतोष बाबू, हवालदार पालानी आणि कुंदन झा यांचा समावेश होता.

गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट 14 जवळ दोन्ही सैन्यात बातचित सुरु होती. चीनी सैनिकांच्या हल्यानंतर भारतीय सैनिकांनीही प्रत्युत्तर देत हल्ला चढवला. यामध्ये चीनचे 45 सैनिक मारले गेल्याचा दावा भारताने केला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaBJP Vidhan Sabha Winning plan Sanjay Bhende: बुथ टू बुथ मार्किंग;भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यशABP Majha Headlines :  9 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Maharashtra : शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Embed widget