एक्स्प्लोर

गुजरातमध्ये काँग्रेसचं संख्याबळ वाढलं, अपक्ष आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपच्या विक्रमसिंह दिंडोर यांचा भूपेंद्रसिंह खांट यांनी 4 हजार मतांच्या फरकाने पराभव केला. तर बीटीपीचे अल्पेश दामोर तिसऱ्या स्थानावर राहिले.

गांधीनगर : गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचं वादळ शांत झालं असलं, तरी घडामोडी काही कमी होताना दिसत नाहीत. कारण अपक्ष आमदार भूपेंद्रसिंह खांट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या आता 78 वर पोहोचली आहे. भूपेंद्रसिंह हे मोरवा हदफ मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. ते मूळचे काँग्रेस कार्यकर्तेच होते. मात्र भारतीय ट्रायबल पार्टीसोबत (बीटीपी) काँग्रेसने युती केली होती. मोरवा हदफ विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसने भारतीय ट्रायबल पार्टीला सोडली. मात्र तिथून या पार्टीचा उमेदवार पराभूत झाला आणि अपक्ष म्हणून उभे राहिलेले भूपेंद्रसिंह खांट जिंकले. भाजपच्या विक्रमसिंह दिंडोर यांचा भूपेंद्रसिंह खांट यांनी 4 हजार मतांच्या फरकाने पराभव केला. तर बीटीपीचे अल्पेश दामोर तिसऱ्या स्थानावर राहिले. गुजरातमध्ये सध्याचे पक्षीय बलाबल कसे आहे? भाजप - 99 काँग्रेस - 77 एनसीपी - 1 बीटीपी - 2 अपक्ष - 3 आता अपक्षांपैकी एकजण म्हणजे भूपेंद्रसिंह खांट यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. त्यामुळे फक्त काँग्रेसच्या संख्याबळात एकने भर पडून आमदार संख्या 78 वर गेली आहे. शिवाय, बीटीपीचे दोन आणि अपक्षांमधील आणखी एक असलेला जिग्नेश मेवाणी हा सुद्धा काँग्रेसच्या बाजूनेच आहे. कारण जिग्नेशच्या मतदारसंघातून म्हणजे वडगावमधून काँग्रेसने विरोधी उमेदवार दिला नव्हता. शिवाय जिग्नेशही जाहीरपणे काँग्रेसला समर्थन देतो. त्यामुळे एकंदरीत काँग्रेस आणि काँग्रेस समर्थक आमदारांची संख्या 81 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे, अपक्ष आमदार रतनसिंह राठोड यांनी भाजपला समर्थन दिले आहे. त्यामुळे भाजप आणि भाजप समर्थक आमदारांची संख्या 100 वर पोहोचली आहे. संबंधित बातम्या : 2022 साली काँग्रेस गुजरातमध्ये 135 जागा जिंकेल : राहुल गांधी गुजरातमध्ये भाजपचा 100 चा आकडा अखेर पूर्ण! विजय रुपाणी पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री, आमदारांच्या बैठकीत निर्णय गुजरातमध्ये नोटाबंदीपेक्षाही ‘नोटा’चा फटका 'या' 12 जागांमुळे काँग्रेस सत्तेपासून दूर गुजरात निवडणूक : शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त राष्ट्रपित्याच्या पोरबंदरमधून 'गॉडमदर'चा मुलगा आमदार

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
CWG 2026: 'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Embed widget