एक्स्प्लोर

Independence Day 2022 : पहिल्यांदा दिली जाणार स्वदेशी 21 तोफांची सलामी, जाणून घ्या यंदाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत खास गोष्टी

PM Narendra Modi : दिल्लीतील लाल किल्ल्यावर 7 वाजून 30 मिनिटांनी ध्वजवंदन करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांना तिन्ही सैन्य दलाकडून गार्ड ऑफ ऑनर दिला जाईल.

Azadi Ka Amrit Mahotsav : आज 15 ऑगस्ट 2022, भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा केला जात आहे. राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर यंदा 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खास तयारी करण्यात आली आहे. यावर्षी पहिल्यांदाच स्वदेशी 21 तोफांची सलामी देण्यात येणार आहे. तसेच लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करणार असून त्याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलं आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम 'एक भारत, श्रेष्ठ भारत' आहे.

लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचा सोहळा सकाळी 6.55 वाजता सुरू होईल. पहिल्यांदा लष्कराचे दिल्लीचे जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC) यांचं आगमन होईल. यानंतर संरक्षण सचिव पोहोचतील आणि त्यानंतर तिन्ही दलांचे प्रमुख म्हणजे लष्कर, हवाई दल आणि नौदल येतील. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट ठीक 7.08 वाजता पोहोचतील आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 7.11 वाजता पोहोचतील. लाल किल्ल्यावर 7.18 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होतील. लाल किल्ल्यावर पोहोचण्यापूर्वी पंतप्रधान राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण करतील.

पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर 

लाल किल्ल्यावर पोहोचल्यावर पंतप्रधानांना राष्ट्रसेवेसाठी म्हणजेच तिन्ही सैन्य दलाच्या तिन्ही तुकड्यांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल. सकाळी ठीक 7.30 वाजता पंतप्रधान लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. यानंतर राष्ट्रगीत वाजवले जाईल आणि 21 तोफांची सलामी दिली जाईल.

21 तोफांच्या सलामीमध्ये स्वदेशी तोफा

देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर पहिल्यांदाच 21 तोफांच्या सलामीत स्वदेशी तोफांचा समावेश करण्यात येणार आहे. आतापर्यंत दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटिश पाउंडर गनमधून 21 तोफांची सलामी दिली जात होती. या वर्षी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात पंतप्रधानांना 'अटॅग' या स्वदेशी तोफेतून सलामी दिली जाणार आहे. 

स्वदेशी तोफेची वैशिष्ट्ये

या वर्षी लाल किल्ल्यावर 21 तोफांच्या सलामीमध्ये सहा ब्रिटिश पाउंडर तोफांसह देशी अटाग तोफांचा समावेश असेल. DRDO द्वारे टाटा आणि भारत-फोर्ज कंपन्यांच्या सहकार्याने अॅडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम (एटीजीएस किंवा अॅटॅग सिस्टम) विकसित करण्यात आली आहे. 155 x 52 कॅलिबरच्या या ATAGS गनची रेंज सुमारे 48 किमी आहे आणि ती लवकरच भारतीय लष्कराच्या तोफखान्याचा भाग होणार आहे. 2018 मध्ये संरक्षण मंत्रालयाने लष्करासाठी 150 अटाग तोफा खरेदी करण्यास मंजुरी दिली होती. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लाल किल्ल्यावर खऱ्या बंदुकीतून होणारी आग विधीवत असेल. त्यासाठी तोफ आणि कवचाचा आवाज 'कस्टमाइज' करण्यात आला आहे.

पंतप्रधानांचं राष्ट्राला संबोधन

ध्वजारोहण आणि राष्ट्रगीतानंतर म्हणजेच सकाळी 7.33 वाजता पंतप्रधान देशाला संबोधित करतील. गेल्या आठ वर्षांपासून पंतप्रधानांचे सुमारे 90 मिनिटं भाषण करतात. यंदाही तिच परंपरा राहील, असं मानलं जात आहे. यंदा देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा होत असताना सर्वांच्या नजरा पंतप्रधानांच्या संबोधनाकडे लागतील. आपल्या भाषणात पंतप्रधान कृषी, संरक्षण, व्यवसाय, अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय संबंध आणि मुत्सद्देगिरी या  मुद्द्यांवर बोलण्याची शक्यता आहे. 

14 देशांतील एनसीसी कॅडेटही सहभागी होणार 

यंदा 14 देशांतील निवडक NCC कॅडेट समारंभात सहभागी होणार आहेत. या वर्षी लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात 14 देशांतील सुमारे 126 तरुण कॅडेट्स सहभागी होणार आहेत. मॉरिशस, अर्जेंटिना, ब्राझील, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, संयुक्त अरब अमिराती, इंग्लंड, अमेरिका, मालदीव, नायजेरिया, फिजी, इंडोनेशिया, सेशेल्स आणि मोझांबिक या देशांचे कॅडेट भारतात पोहोचले आहेत. या परदेशी कॅडेट्सने आपापल्या देशात आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घेतला असून त्यात निवड झाल्यानंतर हे एनसीसी कॅडेट्स भारतात आले आहेत. कॅडेट कल्चर एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत एनसीसी कॅडेट्सशी संवाद साधण्यासाठी भारतात आले आहेत.

आणखी काय विशेष?

  • भारतीय हवाई दलाच्या स्क्वाड्रन लीडर सुमिता यादव पंतप्रधान नरेंद्र मोदींना ध्वजारोहणासाठी मदत करतील.
  • यावर्षी लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी समन्वय-सेवा भारतीय वायुसेना आहे.
  • गार्ड ऑफ ऑनरमध्ये लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या तीन तुकड्यांमध्ये प्रत्येकी 20 सैनिक आणि एक अधिकारी असेल. गार्ड ऑफ ऑनरमध्ये दिल्ली पोलिसांचा ताफाही असेल. चारही तुकड्यांचे कमांडर असतील आणि वायुसेनेचे विंग कमांडर कुणाल खन्ना यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल.
  • लष्कराचे दिल्ली-क्षेत्र GOC लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा असतील, जे संपूर्ण कार्यक्रमाचे सर्वोच्च लष्करी कमांडर असतील.
  • संरक्षण सचिव, अजय कुमार हे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे आयोजन करण्यासाठी जबाबदार असतील.
  • ध्वजारोहणानंतर लगेचच हवाई दलाची दोन Mi-17 1V हेलिकॉप्टर आकाशातून लाल किल्ल्यावर पुष्पवृष्टी करतील. या Mi-17 हेलिकॉप्टरच्या मागे दोन ध्रुव हेलिकॉप्टर असतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget