मुंबई : आयकर विभागाकडून (Income Tax Department) विविधी कारवायांच्या पार्श्वभूमीवर ओडिशा (Odisha) , झारखंड(jharkhand), पश्चिम बंगालमध्ये (West Bangal)  मोठी कारवाई करण्यात आलीये. या कारवाईमध्ये आयकर विभागाने आतापर्यंत 350 कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे. मद्यविक्री, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था चालविण्याऱ्या तसेच विक्री व्यवसायांशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर ही कारवाई करण्यात आलीये. 


या मोहिमेत ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील 10 जिल्ह्यांमध्ये ही कारवाई झाली. दरम्यान या कंपन्यांवर झारखंड राज्यातील रांची येथील एका कुटुंबाचा समावेश आहे. दरम्यान या कुटुंबातील एका व्यक्तीचा राजकीय वर्तुळाशी फार जवळचा संबंध असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे आयकर विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईवर सध्या सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 


मोठ्या प्रमाणात पुरावे हाती


आयकर विभागाच्या या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे आणि डिजिटल डेटाच्या स्वरुपात काही पुरावे सापडले आहेत. दरम्यान हे पुरावे आयकर विभागाने ताब्यात घेतलं आहे. जप्त केलेल्या पुराव्यांमध्ये  देशी दारूच्या बेहिशेबी विक्रीच्या नोंदी, अघोषित रक्कम तसेच बेहिशेबी रोख रक्कम देखील मोठ्या प्रमाणावर सापडलीये. 


रक्कम बेहिशोबी असल्याची माहिती


आयकर विभागाने ज्या समूहावर ही कारवाी केली त्या समूहाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी ही रोख रक्कम बेहिशोबी असल्याचं कबूल देखील केलं आहे. तसेच ही रक्कम विविध व्यावसायिक संस्थांद्वारे निर्माण झाली असल्याचं या अधिकाऱ्यांनी म्हटलं. ज्या कंपन्यांवर ही कारवाई करण्यात आली त्यामध्ये सक्रिय असलेल्या कुटुंबातील सदस्याांची देखील चौकशी करण्यात आल्याचं समोर आलंय. दरम्यान मद्य विक्री व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावरील ही बेहिशोबी रक्कम असल्याचं समोर आलं आहे. 


350 कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त


आयकर विभागाच्या या कारवाईमध्ये 351 कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आलीये. तसेच 2.80 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे बेहिशेबी दागिने जप्त करण्यात आले आहेत. ओडिशाच्या बोलंगीर जिल्ह्यातील सुदापाडा आणि तितलागढ आणि संबलपूर जिल्ह्यातील खेतराजपूर या छोट्या शहरांमध्येज्ञात निवासस्थानांच्या मोडकळीस आलेल्या इमारतींमधील 329 कोटी रुपयांच्या या रोख रकमेचा मोठा हिस्सा जप्त करण्यात आला.






हेही वाचा : 


Nana Patole on BJP : नरेंद्र मोदींच्या रुपात देशात तानाशाही चाललीय; अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण देणारे भाजपवाले कोण?; नाना पटोलेंची भाजपवर टीका