Harvinder Singh Rinda: दहशतवादी वाधवा सिंह उर्फ ​​चाचा भारतातील मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हरविंदर सिंह रिंदासोबत काम करत असल्याची माहिती समोर आलीय. ज्यामुळं भारतीय एजन्सींची चिंता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र पोलिसांचा तपास पुढच्या दिशेनं जात असताना लॉरेन्स बिश्नोईसह महाराष्ट्रातील नांदेड येथील रहिवासी असलेला आणि सध्या पाकिस्तानात आयएसआयच्या आश्रयाला बसलेला बब्बर खालसा दहशतवादी हरविंदर सिंह रिंदा यांच्याशी संबंधित माहिती समोर येत आहे. 


आयएसआयमध्ये चाचा या नावानं ओळखल्या जाणाऱ्या वाधवा सिंह पाकिस्तानातील बब्बर खालसाचंं संपूर्ण काम सांभाळत असताना हरविंदर सिंह पाकिस्तानात पळून गेला. या काळात चाचा वाधवा सिंह आणि आयएसआयचे संबंध चांगले नव्हते. त्यामुळेच आयएसआयनं चाचा वाधवा सिंह यांना पूर्णपणे बाजूला केलं होतं, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या सूत्रांकडून प्राप्त झाली. 


हरविंदर सिंह रिंदाचे नेटवर्क मजबूत
हरविंदर सिंह रिंदा यांच्याकडे ही जबाबदार देण्यात आली. कारण वाधवा सिंह यांच्याऐवजी रिंदाचे नांदेड ते पंजाबपर्यंत नेटवर्क मजबूत आहे. सिद्धू मुसेवाला यांची हत्या करणाऱ्या रिंदाच्या नेटवर्कमधील काही शुटरचा पंजाब इंटेलिजन्स हेड क्वार्टरवरील हल्ल्यातही सहभाग असू शकतो, असा संशयही एजन्सींना आहे,  अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.


महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई
महाराष्ट्र पोलिसांनी आतापर्यंत रिंदाच्या नेटवर्कमधील 14 जणांना अटक केलीय. तर नांदेड, राजस्थान आणि पंजाबच्या पंजाब सीमेवर रिंदाच्या नेटवर्कचा भाग असलेले 54 जण आता महाराष्ट्र पोलिसांच्या रडारखाली आहेत.अलीकडेच आयएसआय आणि चाचा वाधवा सिंह यांच्यातील संबंध पुन्हा एकदा सुधारले आहेत. यामुळं बब्बर खालसाचे काम चाचा वाधवा सिंह आणि रिंदा एकत्र पाहत आहेत, अशीही माहिती समोर येत आहे. 


हे देखील वाचा-