Aurangabad News: प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल भाजपच्या दोन प्रवक्ते-नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये शुक्रवारी काढण्यात करण्यात आलेल्या आंदोलनात काही लोकांकडून दंगल घडवण्याचा प्रयत्न होता, अशी माहिती समोर येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. आंदोलन सुरु असताना दंगल सदृश्य परिस्थीती निर्माण करुन जोर जोराने आरडा-ओरडा करत काही तरुण आंदोलनात घुसल्याचा उल्लेख पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयरमध्ये करण्यात आला आहे.


पोलिसात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार, शुक्रवारी दुपारी 02.45 वाजेच्या सुमारास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर AIMIM पक्षाचे आंदोलन हे सुभेदारी गेटसमोर चालू असतांना अचानकपणे 50 ते 60 कार्यकर्ते मोटरसायकलवर ट्रिपलसीट व काही इसम पायी चालत आले. यावेळी 150 ते 200 लोकांचा बेकायदेशीर जमाव जमला असता त्यांना बेकायदेशीर कृत्य करु नका, असे पोलीस समजावून सांगत होते. मात्र तरी देखील काही लोकांनी दंगल सदृश्य परिस्थीती निर्माण करुन जोर जोराने आरडा-ओरडा करुन घोषणाबाजी केली. तसेच बंदोबस्तावरील पोलिसांशी हुज्जतबाजी व धक्काबुक्की करण्यात आल्याच पोलिसात दाखल करण्यात आलेल्या एफआयरमध्ये म्हटले आहे. 


आंदोलनात टवाळखोर घुसले.. 


एमआयएमचे आंदोलन सुरु असताना अचानकपणे बाहेरील इतर काही टवाळखोर आंदोलनात घुसले. एका माजी नगरसेवकाने दुचाकीवरून या टवाळखोरांना आणून सोडल्याने आंदोलनात गोंधळ सुरु झाला. यावेळी तेथून जाणाऱ्या एका कार चालकाला रोखून धरत त्याला मारहाण सुद्धा करण्यात आली. तर त्याच्या कारच्या काचा सुद्धा फोडण्यात आली. त्यामुळे परिस्थिती पाहता पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी पोलीस बंदोबस्त वाढवला. तसेच शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना तात्काळ आंदोलनास्थळी बोलावून घेतले. त्यांनतर खासदार इम्तियाज जलील यांनी सुद्धा आंदोलनाच्या स्थळी धाव घेत,तरुणांना समजवून सांगत परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले.


'या' कलमाखाली गुन्हे दाखल... 


याप्रकरणी जमाव बंदी आदेशाचे उल्लघंन केले म्हणुन आंदोलकांवर भादवी कलम 141,143,145,147,149,353भादवी सह कलम135 मपोका सह कलम 128/177मोटार वाहन कायदा  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.