एक्स्प्लोर

Monsoon 2026 : शेतकऱ्यांची चिंता वाढणार! यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, भारतीय हवामान विभागाकडून पहिला अंदाज जाहीर  

भारतीय हवामान विभागाकडून (IMD) आज नैऋत्य मान्सून 2026 चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला आहे. यावर्षी देशात सरासरीच्या 92 टक्के पर्जन्य अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

Monsoon Forecast 2026 :  भारतीय हवामान विभागाकडून (IMD) आज नैऋत्य मान्सून 2026 चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला आहे. यावर्षी देशात सरासरीच्या 92 टक्के पर्जन्य अंदाज जाहीर करण्यात आला आहे. सामान्य पेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम रविचंद्रन यांनी यावर्षीच्या मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. 

आज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्या उपस्थित नवी दिल्लीत आज पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये  नैऋत्य मान्सून 2026 चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये सामान्य पेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात  आला आहे. जेव्हा पावसाचे प्रमाण 90 टक्के ते 95 टक्के असते त्यावेळी सामान्य पेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो. दरम्यान, संपूर्ण देशभरात दीर्घावधी सरासरी (LPA ) 87 सेंटीमीटर राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.

जून जुलै ऑगस्ट पर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्या माहितीनुसार, जून जुलै ऑगस्ट पर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार आहे. जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात  एल निनो परिस्थिती असणार आहे. तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये भारतीय समुद्रात सकारात्मक परिस्थिती असल्याची माहिती डॉ. एम. मोहापात्रा यांनी दिली आहे. त्यामुळं एल निनो च्या नकारात्मक परिणामाला भारतीय समुद्रातील सकारात्मक परिस्थिती अनुकूल करेल. त्यामुळं एल निनोचा परिणाम जाणवणार नाही असे डॉ. एम. मोहापात्रा यांनी सांगितले आहे. 

पाऊस कसा मोजतात? 

भारतीय हवामान विभागाने पाऊस मोजण्याच्या पाच श्रेणी ठरवल्या आहेत. सरासरीच्या 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुसऱ्या श्रेणीत 90 ते 95 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसऱ्या श्रेणीत 96 ते 104 टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 105 ते 110 टक्के आणि 110 टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो.

शेतकऱ्यांची चिंता वाढणार

काही खाजगी वेधशाळांनी यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमकुवत राहण्याची शक्यता वर्तवली होती. या पार्श्वभूमीवर, अधिकृत सरकारी यंत्रणा म्हणजे भारतीय हवामान विभाग काय अंदाज मांडणार याकडे देशातील बळीराजा आणि सर्वसामान्यांचे डोळे लागले होते. अखेर आज भारतीय हवामान विभागानं मान्सून 2026 चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Monsoon Forecast 2026: मोठी बातमी: यंदा पाऊस किती पडणार? भारतीय हवामान विभाग जाहीर करणार मान्सूनचा अंदाज, महत्त्वाची पत्रकार परिषद

महत्त्वाच्या बातम्या

Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
Embed widget