Corona Third Wave : कोरोना व्हायरसची दुसरी लाट भयंकर होती. दुसऱ्या लाटेदरम्यान उद्भवलेली परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान झालेल्या जखमा कधीही विसरल्या जाणार नाहीत. त्यात आता तिसऱ्या लाटेचा धोकाही आहेच. दरम्यान, आयआयटी कानपूरच्या प्राध्यापकांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. आयआयटीचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी गणिताच्या विश्लेषणाच्या 'फॉर्म्युला'च्या आधारे दावा केला आहे की तिसरी लाट दुसर्‍या लाटेपेक्षा कमी प्राणघातक असेल. ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.


आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल म्हणाले की, तिसर्‍या लाटाचे मूल्यांकन करण्यासाठी आम्ही गेल्या एका महिन्यात आमच्या मॉडेलच्या माध्यमातून बरीच गणना केली आहे. यात असे दिसून आले आहे की तिसरी लाट दुसर्‍या लाटेप्रमाणे इतकी प्रभावशाली नसेल. यात आम्ही तीन शक्यता वर्तवल्या आहेत. ऑगस्टच्या अखेरीस एखादा नवीन व्हेरिएंट आला, जो डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगवान पसरेल, तर ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान तिसरी लाट येईल. त्यानुसार तिसरी लाट पहिल्या लाटेप्रमाणे असेल. 


Corona Third Wave : कोरोनाची तिसरी लाट सुरुवातीच्या टप्प्यात; संक्रमण वाढण्याचा WHO चा इशारा


प्रोफेसर अग्रवाल यांनी सांगितले की डेल्टा व्हेरिएंटमुळे तिसरी लाट भारतात येईल, अशी शक्यता कमी वाटते. डेल्टा व्हेरिएंटपेक्षा वेगाने पसरणारा एखादा नवीन प्रकार भारतात आला तर काही प्रमाणात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. आम्ही दोन गोष्टी विचारात घेतल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना संसर्ग झाला आहे ते बरे झाले. त्यांच्यातील काही लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. हे गेल्या वर्षाच्या अनेक अभ्यासात समोर आले आहे. 5 ते 20 टक्के लोकांची प्रतिकारशक्ती कोरोनाचा सामना करण्यासाठी संपली आहे. ज्यामुळे त्यांना पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता आहे.


Coronavirus : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोना निर्बंध पुन्हा लागू करण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सूचना


काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुखांनी जगभरातील कोरोना  संक्रमण आणि मृत्यूची संख्या पुन्हा वाढली असून कोरोनाची तिसरी लाट सुरुवातीच्या टप्प्यात असल्याचं म्हटलं होतं. कोविड  19 संकटाला तोंड देण्यासाठी नेमलेल्या आपत्कालीन समितीच्या बैठकीला संबोधित करताना त्यांनी म्हटलं की, दुर्दैवाने आपण आता तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत. डेल्टा वेरिएंट आता 111 हून अधिक देशांमध्ये पोहोचला आहे. कोरोना विषाणूचा विषाणू सतत आपले स्वरुप बदल आहे, परिणामी आणखी संसर्गजन्य वेरिएंट उदयास येत आहेत.