कावड यात्रेकरुंवर फुलांचा वर्षाव करा, पण किमान आमची घरे तोडू नका; ओवेसींची उत्तर प्रदेश सरकारवर टीका
Asaduddin Owaisi News: कावड यात्रेकरूंना विशेष सुविधा देताना इतर धर्मीयांबाबत दुजाभाव का केला जातो, असा सवाल एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले.
एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी ट्वीट करून भाजप सरकारवर टीका केली. त्यांनी म्हटले की, कावड यात्रेकरूंसाठी ठिकठिकाणी फुलं उधळण्यात आली. त्यांच्या पायाला मलम लावण्यात आले. कावड यात्रेकरू नाराज होऊ नयेत यासाठी उत्तर प्रदेश सरकारने यात्रेच्या मार्गावर असणारी मटणाची दुकाने बंद केली आहेत. ही 'रेवडी संस्कृती' नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुस्लिमांनी मोकळ्या जागेवर काही मिनिटांसाठी नमाज अदा केली तरी गदारोळ केला जातो. मुस्लिम असल्याने पोलिसांची गोळी, युएपीए, राष्ट्रीय सुरक्षा कायदा, बुलडोझर कारवाईचा सामना करावा लागत असल्याचे ओवेसी यांनी सांगितले.
यह 'रेवड़ी कल्चर' नहीं है?
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) July 26, 2022
मुसलमान, खुली जगह पर चंद मिनट के लिए के नमाज़ भी अदा करे तो “बवाल” हो जाता है। मुसलमानों को सिर्फ मुसलमान होने की वजह से पुलिस की गोलियों, हिरासती तशद्दुद, NSA, UAPA, लिंचिंग, बुल्डोज़र और तोड़-फोड़ का सामना करना पड़ रहा है। 2/n
कावड यात्रेकरूंना मुस्लिम पोलीस अधिकाऱ्याचे नावही सहन होत नसल्याचा आरोप ओवेसी यांनी केला. कावड यात्रेकरूंच्या भावना इतक्या तीव्र असतात की त्यांना एका मुस्लिम अधिकाऱ्याचे नावही पोलीस ठाण्यातील पाटीवर सहन होत नाही. हा भेदभाव का, एकाचा द्वेष आणि दुसऱ्यावर प्रेम का, असा सवालही ओवेसी यांनी उपस्थित केला.
कांवड़ियों के जज़्बात इतने मुतज़लज़ल हैं कि वे किसी मुसलमान पुलिस अहलकार का नाम भी बर्दाश्त नहीं कर सकते।
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) July 26, 2022
यह भेद-भाव क्यों? यकसानियत नहीं होनी चाहिए? एक से नफ़रत और दूसरों से मोहब्बत क्यों? एक मज़हब के लिए ट्रैफिक डाइवर्ट और दूसरे के लिए बुलडोज़र क्यों? 3/n pic.twitter.com/DPZwC02iNF
सरकारकडून एका समुदायासाठी वाहतूक वळवली जाते. तर, दुसऱ्यांसाठी घरावर बुलडोझर फिरवला जात असल्याचे ओवेसी यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत बोलताना नागरिकांना मोफत योजना देण्याच्या विरोधी पक्षांच्या घोषणेवर टीका केली होती. यावेळी त्यांनी मोफत योजनांना रेवडी संस्कृती वाढत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले होते.