नवी दिल्ली : इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) द्वारे करण्यात आलेल्या एका सामुदायिक नॅशनल सीरो सर्व्हे (sero-survey) मधून समोर आलेल्या माहितीनुसार, देशात कंटन्मेंट झोनमधील 15 ते 30 टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे. एवढचं नाहीतर या व्यक्ती आपोआप कोणत्याही उपचारांशिवाय ठिक झाल्याचंही समोर आलं आहे. न्यू इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालावरून ही माहिती देण्यात आली आहे.


देशात सतत वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये ICMR ने केलेला हा खुलासा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ICMRच्या रिपोर्टमध्ये मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, कोलकत्ता, चेन्नई, सुरत, जयपूर आणि इंदोर यांसारख्या शहरांच्या हॉटस्पॉट आणि कन्टेन्मेंट झोनमधून मिळणाऱ्या आकड्यांच्या हवाल्याने हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.


पाहा व्हिडीओ : जून 2019 पासूनच चीनमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव; हॉवर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासाचा धक्कादायक निष्कर्ष



ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गाचा दर अत्यंत जास्त आहे. येथे इतर हॉटस्पॉटच्या तुलनेत 100 पटींनी जास्त संसर्ग झाल्याचं निदर्शनास आलं आहे. हा ICMR द्वारे करण्यात आलेला पहिला नॅशनल वाइड सीरो सर्व्हे आहे. या सर्व्हेच्या प्राथमिक निष्कर्षांच्या आधारावर हा दावा करण्यात आला आहे. हा अहवाल युनियन कॅबिनेट सेक्रेटरी आणि पीएमओलाही पाठवण्यात आलं आहे.


ICMR च्या अहवालात असं सांगण्यात आलं आहे की, हा सर्वे रुग्णांकडून घेण्यात आलेल्या रक्तांच्या नमुन्यांमध्ये SARS-CoV-2 (कोरोना व्हायरस) च्या विरोधात तयार होणाऱ्या IgG अॅन्टीबॉडिजचा शोध घेण्यासाठी करण्यात आला होता.


दरम्यान, IgG अॅन्टीबॉडिज रुग्णांच्या शरीरात कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी तयार होतात. हे शरीरामध्ये संसर्ग झाल्यानंतर 14 दिवसांनी दिसतात आणि संसंर्ग संपल्यानंतरही अनेक महिन्यांपर्यंत रुग्णांच्या रक्तात सीरममध्ये राहतात. हा सीरो सर्व्हे नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल (NCDC), डब्ल्यूएचओ इंडिया आणि राज्य सरकारच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आला आहे. यामध्ये देशाच्या 70 जिल्ह्यांमधून जवळपास 24000 नमूने घेण्यात आले होते.


संबंधित बातम्या : 


'लांसेट'ने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनबाबत अभ्यास मागे घेतला, 200 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं!


नॉन कंटेन्मेंट झोनमध्ये आजपासून धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट सुरु होणार


पुढील दोनतीन महिन्यात कोरोना संसर्गावर औषध उपलब्ध होईल; CSRI चे डॉ. शेखर मांडे यांची माहिती