नवी दिल्ली : कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. पुढील दोन ते तीन महिन्यात कोरोना संसर्गावर एकदोन औषधं उपलब्ध होतील, अशी माहिती कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँन्ड इंडस्ट्रीयल रिसर्चचे (CSRI) महासंचालक शेखर मांडे यांनी दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधाचे प्रयोग करण्यास परवानगी दिली आहे. ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. लॅन्सेट नावाच्या जर्नलमध्ये एक पेपर छापून आला होता. त्याच्या आधारावर डब्लूएचओने या औषधाचा प्रयोग करण्यास निर्बंध लावल्याचे डॉ. मांडे यांनी सांगितले.




जागतिक आरोग्य संघटनेने हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधाची कोरोना संसर्गावर क्लिनिकल ट्रायल थांबवण्यास सांगितले होते. मात्र, आता पुन्हा हे प्रयोग करण्यास परवानगी दिली आहे. हायड्रोक्सीक्लोरोक्विनबाबत जागतिक आरोग्य संघटनेचा यु टर्न नेमका कशामुळे असे विचारल्यानंतर डॉ. मांडे म्हणाले की, लॅन्सेट नावाच्या जर्नलमध्ये एक पेपर छापून आला होता. ऑब्झर्वेशनल स्टडी होती, त्याचं निरीक्षण त्यात छापले होते. त्यानंतर आम्ही डब्ल्यूएचओ आणि लॅन्सेट या दोघांना पत्रे लिहिली. या पेपरमध्ये गडबड असल्याचं सांगितलं. त्याचं स्टॅटिस्टिक्स का चुकीचं आहे हे आम्ही समजावून सांगितल. केवळ भारतच नव्हे तर इतर ठिकाणीही या पेपरच्या विरोधात आवाज उठवला गेला.


Corona Updates | राज्यात आज 1352 रुग्ण कोरोनामुक्त, 123 जणांचा मृत्यू तर 41 हजार 393 रुग्णांवर उपचार सुरू


अनेक देशांमध्ये हायड्रोक्सीक्लोरोक्विनचे प्रयोग थांबवले


लँसेटच्या पेपर नंतर फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यासारख्या अनेक देशांनी ट्रायल थांबवले होते. आमच्या मते हा निर्णय अत्यंत चुकीचा होता. हायड्रोक्सीक्लोरोक्वविन बाबत जे आरोप केले ते वैज्ञानिक दृष्ट्या चुकीचे होते. लॅन्सेटमध्ये विरोधातला हा पेपर लवकरच मागे घेतला जाईल हे तुम्ही बघाल, असा विश्वास शेखर मांडे यांनी व्यक्त केला. आयसीएमआरच्या मते हायड्रोक्लोरिकनचा चांगला उपयोग होतो आहे. रेमडीसीवीर बाबतही आपल्याकडे प्रयोग सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.


दोन ते तीन महिन्यात एकदोन औषधं हातात असतील
हायड्रोक्सीक्लोरोक्वविन हे औषध सेफच आहे, पण डॉक्टरला विचारल्याशिवाय ते घेऊ नये, असाही महत्वाचा सल्ला त्यांनी दिला आहे. टेस्टिंग किटबाबत टाटा आणि रिलायन्स या दोन कंपन्यांच्या सहकार्याने दोन नवे मॉडेल डेव्हलप केले आहेत. ते लवकरच बाजारात उपलब्ध होतील. शिवाय यामुळे कोरोना चाचणीचा खर्च कमी होईल, असेही ते म्हणाले. सोबतचं येत्या दोन ते तीन महिन्यात एक किंवा दोन औषध आपल्या हातात आलेली असतील अशीही माहिती डॉ. शेखर मांडे यांनी दिली.


Shekhar Mande | दोन ते तीन महिन्यात कोरोना संसर्गावर औषधं येतील; CSRI महासंचालक शेखर मांडे यांची माहिती