एक्स्प्लोर

ICICI बँक 100 गावं कॅशलेस करणार!

मुंबई : केंद्र सरकारने सर्व देशाला कॅशलेस बनवण्याचा निर्धार केला आहे. देशात कॅशलेस व्यवहाराचं प्रमाण वाढावं यासाठी बँकांना नवी 10 लाख कार्ड स्वाईप मशिन्स विकत घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. देशातली सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक त्यातील तब्बल सहा लाख मशिन खरेदी करणार आहे. तर एसबीआय पाठोपाठ खाजगी क्षेत्रातली एक बलाढ्य बँक असलेल्या आयसीआयसीआयने तब्बल 100 गावं कॅशलेस बनवण्याचा विडा उचलला आहे. दररोज एक गाव कॅशलेस होणार आयसीआयसीआय बँक देशातली तब्बल शंभर गावं कॅशलेस बनवणार आहे. तेही फक्त 100 दिवसात, म्हणजेच आगामी तीन महिन्यात आयसीआयसीआय बँक दररोज एक या प्रमाणे 100 गावे कॅशलेस करणार आहे. आयसीआयसीआय त्यासाठी सध्या ग्रामीण भागात सर्वाधिक वापरात असलेल्या बेसिक फोनच्या माध्यमातून वापरता येईल अशी अॅप्लिकेशन विकसित करत आहे. अशा बेसिक फोनमार्फत एसएमएस बँकिंगच्या साहाय्याने कॅशलेस व्यवहार पूर्ण करता येतील, अशी माहिती आयसीआयसीआय बँकेच्या एमडी आणि सीईओ चंदा कोचर यांनी दिली. दत्तक गावांचं कॅशलेस व्यवहारांसाठी खातं या कॅशलेस मोहीमेची सुरूवात म्हणून बँक दत्तक घेणार असलेल्या गावांमधील सर्वांचं बँक खातं उघडणार असून हे खातं फक्त कॅशलेस व्यवहारांसाठीच वापरता येणार आहे. बेसिक फोनमधील एसएमएसवर आधारीत कॅशलेस व्यवहारांसाठी आवश्यक ट्रेनिंगही बँक त्या त्या गावातील गावकऱ्यांना देणार आहे. कॅशलेस व्यवहारासाठी बँकेचा पायलट प्रोजेक्ट असलेल्या गुजरातमधील अकोदरा गावातील अनुभवांवरून नव्या 100 गावांसाठी मार्गदर्शक सूचना बनवण्यात येणार आहेत. आयसीआयसीआय बँकेने साबरकांठा जिल्ह्यातील अकोदरा हे गाव डिजीटल व्हिलेज म्हणून दत्तक घेतलं आहे, या गावातच सर्वात आधी ते कॅशलेस गावाची संकल्पना वापरणार आहेत. कॅशलेस बँकिंगसाठी बँक नव्याने दत्तक घेणार असलेली शंभर गावे नेमकी कोणती, हे मात्र जाहीर करण्यात आलेलं नाही. या प्रकल्पासाठी आयसीआयसीआय बँक टॅबलेट आधारीत अकाऊंट ओपनिंग आणि आधार केवायसी यांचा वापर करणार आहे. यामुळे कमीत कमी खर्चात तसंच वेळेत आणि कागदपत्रांशिवाय बचत खातं उघडता येईल. या सर्व खातेधारकांना रूपे डेबिट कार्ड देण्यात येणार आहे. जिथे आवश्यकता असेल तिथे पीओएस म्हणजे कार्ड स्वाईप मशिन्स बसवण्यात येतील आणि जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहित केलं जाईल, असं आयसीआयसीआय बँकेने म्हटलंय.

संबंधित बातमी : येत्या तीन महिन्यात 10 लाख स्वाईप मशिन बाजारात येणार

महत्त्वाच्या बातम्या

AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
CJP : कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?  सौरव दास, आशुतोष रांका यांच्यावर कोणती जबाबदारी?
कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?
PM Modi Instagram Reel :'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
Mohan Bhagwat On LGBTQ Marriage : समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget