Tina Dabi Wedding : आयएएस (IAS) टीना दाबी आणि आयएएस (IAS) प्रदीप गावंडे (IAS Dr. Pradeep Gawande) यांचा विवाह संपन्न झाला आहे. जयपूरमधील एका हॉटेलमध्ये यांचा विवाह सोहळा पार पडला. टीना आणि प्रदीप यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. लग्नाच्या दिवशीच्या फोटोंमध्ये टीना दाबी आणि प्रदीप गावंडे यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसतोय. टीना दाबी आणि प्रदीप गावंडे यांचे रिसेप्शन शुक्रवारी राजधानी जयपूरमधील बाइस गोडाऊन येथील प्रसिद्ध हॉटेल हॉलिडे इनमध्ये पार पडलं. रिसेप्शनमध्ये अनेक बडे अधिकारी आणि राजकारणी लोकांनी हजेरी लावली होती. अनेक आयएएस, आयपीएस आणि राज्य सेवेतील अधिकारी या या कार्यक्रमाला उपस्थित होते. यासाठी हॉटेलमध्ये राजस्थानी पद्धतीची खास सजावट करण्यात आली होती.


टीना दाबी या सध्या वित्त विभागात सहसचिव आहेत. तर, प्रदीप गावंडे हे उच्च शिक्षण विभागात सहसचिव आहेत. दोघांनी अलिकडेच सोशल मीडियावर त्यांच्या नात्याचा खुलासा केला. टीना दाबी यांच्यासोबच लग्नाच्या बातमीनंतर प्रदीप गावंडे यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्येही झपाट्याने वाढ झाली.


कोण आहेत टीना दाबी?
सर्वात प्रसिद्ध IAS अधिकाऱ्यांच्या यादीत टीना दाबी यांचा समावेश आहे. सोशल मीडिया असो की मीडिया, त्या नेहमीच माध्यमांत चर्चेत असतात. टीना यांचे इन्स्टाग्रामवर 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. ऑल इंडिया सर्व्हिसेस टॉपर टीना दाबी यांची त्याच वर्षी दुसरे टॉपर बनलेल्या अतहर यांच्याशी ओळख झाली. काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी 2018मध्ये लग्न केले होते. त्यावेळी या लग्नाची खूप चर्चा झाली होती. मात्र, त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि काही कारणास्तव दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.


कोण आहेत प्रदीप गावंडे?
प्रदीप गावंडे यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्रात झाला. ते चुरू जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. प्रदीप यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी एमबीबीएस झाले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha