Tina Dabi Wedding : 2016च्या बॅचच्या UPSC राजस्थान कॅडरच्या टॉपर IAS टीना दाबी (Tina Dabi) पुन्हा लग्नगाठ बांधणार आहेत. टीना दाबी 2013च्या बॅचचे आयएएस प्रदीप गावंडे (IAS Dr. Pradeep Gawande) यांच्याशी लग्न करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोघेही 22 एप्रिलला जयपूरमधील एका खासगी हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत. टीना दाबी यांनी 2018मध्ये आयएएस अतहर खान यांच्याशी लग्न केले होते, पण हे लग्न दोन वर्षांपेक्षा जास्त टिकू शकले नाही. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता.
टीना दाबी आणि प्रदीप गावंडे या दोघांनीही इंस्टाग्रामवर आपले एकत्र फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्ही जे हास्य मला दिलंय, ते मी परिधान केलंय’. या फोटोत दोघांनीही लाल रंगाचे कपडे घातले आहेत आणि हातात हात घालून ते हसत आहेत.
दोघांचेही दुसरे लग्न
आयएएस टीना दाबी आणि प्रदीप गावंडे यांचे लग्नही खूप चर्चेत आहे. कारण, या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. टीना दाबी यांनी पहिले पती अतहर खान यांच्यापासून घटस्फोट घेतला आहे. त्याचबरोबर आयएएस प्रदीप गावंडे यांचेही हे दुसरे लग्न आहे. UPSC मध्ये टॉप केलेल्या टीना दाबी यांनी 2016मध्ये टॉप केल्यानंतर दर दोन वर्षांनी तीन मोठे निर्णय घेतले. आधी 2018 मध्ये अतहर यांच्याशी लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षांनी 2020मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. त्यानंतर पुन्हा दोन वर्षांनी म्हणजे 2022मध्ये प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
कोण आहेत प्रदीप गावंडे?
प्रदीप गावंडे यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्रात झाला. ते चुरू जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. प्रदीप यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी एमबीबीएस झाले आहेत.
कोण आहेत टीना दाबी?
सर्वात प्रसिद्ध IAS अधिकाऱ्यांच्या यादीत टीना दाबी यांचा समावेश आहे. सोशल मीडिया असो की मीडिया, त्या नेहमीच माध्यमांत चर्चेत असतात. टीना यांचे इन्स्टाग्रामवर 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. ऑल इंडिया सर्व्हिसेस टॉपर टीना दाबी यांची त्याच वर्षी दुसरे टॉपर बनलेल्या अतहर यांच्याशी ओळख झाली. काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी 2018मध्ये लग्न केले होते. त्यावेळी या लग्नाची खूप चर्चा झाली होती. मात्र, त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि काही कारणास्तव दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.
हेही वाचा :
- Viral Video : रिल्स बनवणारी 'ही' सुंदर तरुणी आहे IAS अधिकारी, रील्स बनवण्याचं वेड, पाहा व्हिडिओ
- Jammu Kashmir Temperature : जम्मू काश्मीरमध्ये तापमान वाढलं, 76 वर्षांचा रेकॉर्ड मोडला
- Bharat Bandh : भारत बंदचा दुसरा दिवस, पहिल्या दिवशी काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत; आरोग्य सेवांवर परिणाम नाही
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha