बंगळुरु : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची आव्हान पंतप्रधान मोदींनी पूर्ण केलं. मोदींनी ट्विटरवर  योग करतानाचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करुन कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी, टेबल टेनिसपटू मानिक बत्रा आणि 40 वर्षांवरील आयपीएस अधिकाऱ्यांना फिटनेस चॅलेंज दिलं.


पंतप्रधानांच्या या फिटनेस चॅलेंजला मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी उत्तर दिलं आहे. आपल्या आरोग्याविषयी काळजी दाखवल्याबद्दल कुमारस्वामींनी मोदींचे आभार मानले. पण याचवेळी आपल्याला राज्याच्या आरोग्याची जास्त चिंता असल्याचं ते मोदींना म्हणाले. शिवाय कुमारस्वामींनी राज्याचं आरोग्य सुधारण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून समर्थनही मागितलं.

मोदींच्या फिटनेस चॅलेंजनंतर कुमारस्वामींनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन तातडीने उत्तर दिलं. "प्रिय, नरेंद्र मोदीजी, माझ्या आरोग्याविषयी काळजी व्यक्त केल्याबद्दल आभार मानतो. सगळ्यांसाठी शारीरिक आरोग्य महत्त्वाचं आहे आणि मी त्याचं समर्थनही करतो. योगा-ट्रेडमिल माझ्या नेहमीच्या व्यायामाचा भाग आहेत. तरीही मी माझ्या राज्याच्या आरोग्याबाबत चिंतेत आहे आणि यासाठी मला तुमचं समर्थन हवं आहे."


संबंधित बातम्या

कोण आहे मनिका बत्रा, ज्यांना पंतप्रधान मोदींनी फिटनेस चॅलेंज दिलं?

कोहलीचं चॅलेंज मोदींकडून पूर्ण, आता मोदींचं चॅलेंज....