Beed : बीड जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं फळबागधारक, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अशाच एका नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत असताना त्याने थेट खासदार बजरंग सोनवणे यांना फोन लावला. यावेळी खासदार सोनवणे यांनी लागेल ती मदत करतो असे आश्वासन दिले. तसेच काही चुकीचे पाऊल उचलू नका अशी विनंती केली होती. लेकराबाळांचा विचार करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन देत या शेतकऱ्याला धीर दिला आहे.

Continues below advertisement


मात्र, खासदार बजरंग सोनावणे यांना फोन लावलेला शेतकरी कोण आहे? याबाबत अद्याप माहिती भेटू शकलेली नाही. दरम्यान खासदार सोनवणे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या संवादाची ही ऑडीओ क्लीप आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


अवकाळी पावसाने नुकसान झालेला शेतकरी आर्थिक अडचणीत


आत्महत्या करण्याचा विचार मनात आलेल्या शेतकऱ्याला खासदार बजरंग सोनवणे यांनी धीर दिला आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेला शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. या शेतकऱ्याला लागेल ती मदत करण्याचे आश्वासन सोनवणे यांनी दिले आहे. शेतकऱ्याशी संवाद साधल्याची खासदार सोनवणे यांची क्लिप झाली व्हायरल झाली आहे. 


अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका 


राज्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. पावसामुळं शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील जवळपास 85 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. 22 हजार 233 हेक्टरील क्षेत्र अवकाळी पावसामुळं बाधित झालं आहे. मका, ज्वारी,भाजीपाला, संत्रा, भात, आंबा, फळपिके या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान अवकाळी पावसामुळं झालं आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा अमरावती, जळगाव, नाशिक, चंद्रपूर आणि जालना या जिल्ह्यांना बसला आहे. तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर या जिल्ह्यांना देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांची उभी पिकं जमिनदोस्त झाली होती. अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, बाजरी, मका, हळद, कांदा, टोमॅटो, वाटाणा, चारा यांसह आंबा, काजू, डाळिंब, द्राक्ष, टरबूज, संत्रा. पपई, पेरू या फळपिकांचे नुकसान झाले आहे. अनेक भागात शेती पिकांबरोबरच घरांचे देखील नुकसान झाले होते. तसेच काही ठिकाणी वीड पडून लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत तसेच वीज पडून जनावरे देखील दगावली आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


राज्यातील 85 तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका, 22 हजार 233 हेक्टरवरील क्षेत्र बाधित