एक्स्प्लोर

डॉ होमी जहांगीर भाभा जयंती | भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम आणि 'न्युक्लिअर पॉवर'चे जनक

डॉ. होमी भाभांनी भारताच्या अणु विकास कार्यक्रमाचा पाया घातला. त्याच आधारावर भारताने 1974 साली पोखरण अणुचाचणी केली. डॉ. होमी भाभांचे नाव जगातील अशा काही शास्त्रंज्ञात नाव घेतले जात होतो ज्यांची अमेरिकेने धास्ती घेतली होती.

मुंबई: भारतीय अणु कार्यक्रमाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांची आज जयंती. डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 साली मुंबईतील एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील हे टाटा समुहाचे सल्लागार होते. लहानपणापासूनच त्यांना विज्ञानावरील पुस्तकांच्या वाचनाची आवड निर्माण झाली त्यामुळे सहाजिकच त्यांचा विज्ञान शाखेकडे कल वाढला. 1930 साली त्यांनी केंब्रीज विद्यापीठातून इंजिनीअरची पदवी घेतली. 1933 साली त्यांचे 'अॅबसॉर्बशन ऑफ कॉस्मिक रेडीएशन' हे पहिले संशोधन प्रसिध्द झाले आणि पुढे त्यांच्या संशोधन कार्याला वेग आला.

1940 साली डॉ. भाभा भारतात परतले आणि काही काळ त्यांनी बेंगलोर येथील भारतीय विज्ञान संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यानंतर त्यांनी काही शास्त्रज्ञांच्या मदतीने भारतात अणु ऊर्जा संशोधनावर काम सुरु केले. अणुशक्तीचा वापर हा शांततामय मार्गाने अणुऊर्जेसाठी व्हायला हवा या मतावर ते ठाम होते. अणुऊर्जेसाठी लागणारे युरेनियम भारतात मिळत नाही पण भारतात मुबलक प्रमाणात असलेल्या थोरियमचे रूपांतर युरेनियमध्ये करता येते हे भाभांना माहित होते. त्यांनी यावर काम करायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी जे.आर.डी. टाटांशी संधान साधून मुंबईत टाटा फंडामेंटल रिसर्च सेंटरची स्थापना केली.

अणुऊर्जा आयोगाची स्थापना

भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1948 साली त्यांनी पंतप्रधान नेहरुंच्या सहकार्याने अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. डॉ. भाभांचे अणुऊर्जेमधील संशोधन लक्षात घेता 1955 साली त्यांना आंतरराष्ट्रीय अणुशक्ती परिषदेचे अध्य़क्षपद देण्यात आले.

डॉ. भाभांच्या प्रयत्नामुळेच 1956 साली ट्रॉम्बे येथे भारतातलीच नव्हे तर आशियातील पहिली अणुभट्टी 'अप्सरा' उभारण्यात आली. त्यानंतर 'सायरस' आणि 'झर्लीना' या अणुभट्ट्याही उभारण्यात आल्या. या गोष्टी भारताच्या अणुऊर्जा विकासातील एक मैलाचा दगड ठरल्या. भारतात विकसित होणाऱ्या अणुउर्जेचा वापर शांततामय मार्गासाठीच व्हावा असे त्यांचे ठाम मत होते आणि या संकल्पनेवरच ते भारतातील अणुउर्जा विकास कार्यक्रम विकसित करत होते.

त्यांनी अणुऊर्जा संशोधनाव्यतिरिक्त स्पेस सायन्स, रेडिओ अॅस्ट्रॉनॉमी, इलेक्ट्रॉनिक्स आणि मायक्रोबायोलॉजी अशा प्रकारच्या अनेक संशोधनांना पाठिंबा दिला. डॉ. भाभा हे 1950 पासून 1966 पर्यंत भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. त्याचवेळी ते भारत सरकारचे अणुऊर्जा सचिव म्हणूनही काम करायचे.

नोबेलसाठी तब्बल पाच वेळा नामांकन

नोबेल पुरस्कार विजेते सर सी.व्ही.रमण हे डॉ. भाभा यांना 'भारताचा लियोनार्डो द विन्सी' म्हणायचे. विज्ञानाव्यतिरिक्त त्यांना संगीत, चित्रकला आणि नृत्य अशा अनेक विषयात रुची होती. डॉ. भाभा यांना तब्बल पाच वेळा भौतिकशास्त्राच्य़ा नोबेलसाठी नामांकन मिळाले होते पण दुर्दैवाने त्यांना या पुरस्कारापासून वंचित रहावे लागल. त्यांना भारताचा पद्मभूषण हा पुरस्कार प्राप्त झाला. डॉ. भाभांनी भारताच्या रचलेल्या अणुऊर्जेच्या पायावरच भारताने 18 मे 1974 साली पोखरण येथे पहिली अणुचाचणी पार पाडली.

केवळ 18 महिन्यात अणुबॉम्ब तयार करण्याचा दावा

1965 साली ऑल इंडिया रेडियोला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की भारत सरकारची जर परवानगी मिळाली तर केवळ 18 महिन्यात आपण अणुबॉम्ब तयार करु शकतो. त्यांच्या या वक्तव्यान् जगभर खळबळ माजली होती. खासकरुन अमेरिकेच्या पायाखालची वाळू सरकली होती. ऊर्जा, कृषी आणि मेडिसीन क्षेत्रात अणुऊर्जा कार्यक्रमाचा उपयोग व्हावा असे डॉ. भाभांनी सांगितले होते.

व्हिएन्ना येथे एका अणुऊर्जा परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जाताना 24  जानेवारी 1966  रोजी फ्रान्सच्या माउंट ब्लॅकच्या परिसरात त्यांचे विमान क्रॅश झाले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. असे म्हटले जाते की यामागे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचा हात होता.

होमी भाभा यांचा विमान अपघातात झालेला मृत्यु हा भारताच्या अणु विकास कार्यक्रमास बसलेला एक मोठा धक्का होता. भाभांच्या मृत्यूनंतर विक्रम साराभाई हे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष झाले. डॉ. भाभा यांचे भारताच्या अणुऊर्जा विकासातील योगदान लक्षात घेता १२ जानेवारी १९६७ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मुंबईतील अणूशक्तीनगर येथील अणु संशोधन केंद्राचे नावल बदलून ते 'भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर' असं केलं.

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget