Holika Dahan 2021: देशभरात उद्या होलिका दहन; जाणून घ्या उपासनेचा शुभ मुहूर्त
होळीचा सण उद्या आहे आणि तुम्ही यासाठी तयारी पूर्ण केली असावी. परंतु, या होलिका दहनचा शुभमुहूर्त तुम्हाला जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

देशभरात 29 मार्चला होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल. या खास उत्सवासाठी लोक जोरदार तयारी करत आहे. 28 मार्चला होलिका दहन होणार आहे. असे म्हणतात की या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झाला. या दिवशी सूर्यास्तापासून मध्यरात्री 12 वाजून 40 मिनिटापर्यंत होलिका दहन शुभ मानले जाते. त्याच वेळी, पौर्णिमेची तिथी रात्री 2 वाजून 38 मिनिटांसाठी असेल.
होळीबाबत लोकांमध्ये खूप आनंद आणि उत्साह आहे. सगळीकडे होळीची तयारी होताना दिसत आहे. दरम्यान, या कोरोना महामारीमुळे लोकही अधिक जागरुक असल्याचे दिसून येत आहे. देशाच्या अनेक भागात होलिका दहनची तयारी सुरू झाली आहे. मात्र, यावेळी होलिका दहनच्या निमित्ताने लोकांची जास्त गर्दी होणार नाही.
शाही स्नान आणि पुण्यदान योग
28 मार्चला शाही स्नान आणि दान योगही आहे. या दिवशी सकाळी आंघोळ केल्याने यशाची प्राप्ती मिळते अशी धारणा आहे. यावेळी दान केलं तर पुण्यही मिळेल. असे म्हटले जाते की या दिवशी होलिका दहनच्या धुरामुळे शुभ परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, वाईट गोष्टीही मनातून दूर केल्या जातात. असे मानले जाते की या दिवशी गरिबांना अन्नदान केल्याने समृद्धी आणि आनंद मिळतो. दरवर्षी होळीच्या एक दिवस आधी होलिकाची पूजा केली जाते. यावेळी सुख, शांती आणि यशासाठी प्रार्थना केली जाते. यावेळी 28 मार्चला विशेष योग येत आहे. या दिवशी कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करत येईल. तसेच रखडलेले कामही पुन्हा सुरू करता येईल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
