नवी दिल्ली : आज देशभर होळीचा सण साजरा करण्यात येत आहे. या प्रसंगी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळी हा आपापसातले मतभेद विसरून एकत्र येण्याचा सण असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. 


उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी आपल्या ट्वीट्च्या माध्यमातून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्या म्हणाल्या की, "होळीच्या खूप शुभेच्छा, होळी हा रंगांचा सण आहे. हा रंग आपल्या जवळच्या आणि आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना लावला जातो. होळीचा सण हा सकारात्मक विचारांनी भरलेला असतो. या दिवशी आपण सर्वांनी आपापासातले मतभेद विसरून एकत्र यायला हवं."


 






अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर भारतीय वंशाचे लोक राहत आहेत. तसेच जगभरातही अनेक देशात भारतीय वंशाच्या लोकांचे वास्तव्य आहे. ते आज मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा करत आहेत. 


कमला हॅरिस यांच्या सोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीही भारतीयांना आणि ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या भारतीय लोकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


 






महत्वाच्या बातम्या :