कोलकाता : जगात कुठेही राजकारण एकाद्या घोषणेशिवाय पूर्ण होत नाही. मग 2014 चं 'अब की बार, मोदी सरकार' चा नारा असो किंवा दिल्ली निवडणुकीतील 'लगे रहो केजरीवाल' अथवा विधानसभा निवडणुकीतील 'मी पुन्हा येईन'. सध्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील 'खेला होबे'ची धूम आहे. 


खेला होबे या निवडणूक थीम साँगची पश्चिम बंगालमध्ये चर्चा आहे. पश्चिम बंगालच्या टीएमसीच्या निवडणूक सभा, प्रचार रॅली किंवा काल झालेल्या होळीच्या रंगातही लोकांनी खेला होबेवर ताल धरला. ममता बॅनर्जींपासून ते मोदीपर्यंत प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य आहे खेला होबे. बंगालच्या निवडणुकीत खेला होबेची  सुरुवात  कशी झाली हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे.


WB Elections 2021 | अमित शाहंकडून भाजप विजयाचा दावा; रसगुल्ला मिळेल, ममता बॅनर्जींचा पलटवार


खेला होबेचा मराठीतून अर्थ होतो खेळ होणार. हा नारा बंगलादेशातून आला आहे .सुरुवातीला आवामी लीग पार्टीने खेला होबेचा नारा दिला. बंगालच्या निवडणुकीत 7 जानेवारीला टीएमसीचे युवा नेते देवांगशु भट्टाचार्य देव यांनी हा व्हिडीओ यूट्युबवर अपलोड केला. फेसबुकच्या व्हिडीओमध्ये देवांगशु भट्टाचार्य खेला-खेला-खेला होबेचा नारा देत तरूणांमध्ये उत्साह निर्माण करताना पाहायला मिळाले.


देवांगशु निवडणूक रॅलीत हा नारा देतात आणि गर्दी सोबत म्हणतात खेला होबे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पण आपल्या प्रत्येक सभेत म्हणतात खेला होबे. खेला होबे निवडणुकीचा नारा तर झालाच पण त्याचा ज्वर विरोधकांकर ही चढलेला पाहायला मिळाला. काही दिवसांपूर्वी मंत्री राजनाथ सिंग यांनीही याच नाऱ्याचा वापर केला. राजनाथ म्हणतात दिली बडा खेला होबे विकास का खेला होबे.


WB Election 2021 : सोशल मीडियाच्या युगात मोदी विरुद्ध दिदी लढाई भिंतीचित्रावरही!


आता देवांगशु यांनी या नाऱ्याला रॅपमध्येही सादर केले आहे. हे गाणं निवडणुकीच थीम सॉंग बनलं आहे आणि तितकच प्रसिद्ध झालं आहे. देवांगशु हे सिव्हिल इंजिनिअर आहेत. ते आता पूर्णवेळ राजकारणात सक्रीय आहेत. टीएमसीचे ते स्टार प्रचारक आहेत. खेला होबे बरोबर ममता दीदी फीर एक बार आणि दिल्ली जाबे हवाई चोटी हे गाणं लिहली आहे आणि ते लोकप्रिय ही झाले आहेत. बंगालमध्ये दिवसेंदिवस निवडणूक रंगात येत आहे. ममता बॅनर्जी व्हीलचेअरवर प्रचार करत स्वतःला घायल वाघीण म्हणत आहेत.आता मतदार कोणाचा खेळ करणार हे मात्र येत्या 2 मे रोजी कळेल.