मुंबई: आंतरराष्ट्रीय मंचावर इंडिया ऐवजी भारत हे नाव वापरण्यास केंद्र सरकारनं सुरूवात केली आहे, असंच म्हटलं पाहिजे. कारण राष्ट्रपती भवनाकडून प्रेसिडेंट ऑफ इंडिया  ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत (President Of Bharat)असा उल्लेख करण्यात आला आहे. जी 20 बैठकीसाठी दिलेल्या आमंत्रणात 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा उल्लेख आहे. त्यामुळे भारत हे नाव जी- 20 च्या निमंत्रण पत्रिकेवर लिहिण्यास गैर काहीच नाही. तरीही, कदाचित अचानक बदल केल्यानं काही विरोधक यावर टीका करत आहेत. यामुळेच, विशेष अधिवेशनात नेमकं काय होणार याच्याबद्दल तर्कवितर्क सुरू असताना त्यातली एक शक्यता या नामबदलाची पण आहे का याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 


देशात इतिहासाची पुर्नलेखन होत असल्याची प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, देशात अचनाक  असे काय घडले की आता इंडियाऐवजी भारत वापरायचे आहे. लहानपणापासून आपल्याला इंडिया म्हणजे भारत हे माहिती आहे. परंतु आंतररष्ट्रीय स्तरावर देशाची ओळख इंडिया ही आहे. 






विरोधी पक्षाच्या आघाडीने इंडिया हे नाव बदलून जर भारत केले तर भाजप भारत नावाऐवजी दुसरे नाव वापरणार का? असा सवाल  अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे. 






 इंडिया (I.N.D.I.A) नाव काढण्याबाबत आम्हाला माहिती नाही, मात्र इंडिया हे नाव हटविण्याचा कोणाला अधिकार नाही. तसेच हे नाव कोणीही हटवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. 


तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केंद्राने गेल्या आठवड्यात या संदर्भात सूचना केल्या आहे.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी लोकांना ‘इंडिया’ हा शब्द न वापरता ‘भारत’ वापरण्यास सांगितले आहे. भागवत म्हणाले, 'आपण इंडिया हा शब्द वापरणे थांबवले पाहिजे आणि भारत वापरण्यास सुरुवात केली पाहिजे. काही वेळा आपण इंडियाचा वापर इंग्रजी बोलणाऱ्यांना समजण्यासाठी करतो. पण, आपण हे वापरणे थांबवले पाहिजे. जगात कुठेही विशेष नावे बदलत नाहीत. आमच्याकडे अनेक शहरे आहेत ज्यांची नावे अनेक वर्षांपासून आहेत."


विशेष अधिवेशनाची चर्चा जेव्हापासून सुरू आहे तेव्हापासून वेगवगेळ्या गोष्टी चर्चेत आहे. सर्वात पहिल्यांदा वन नेशन वन इलेक्शन संदर्भात घडमोडी घडत होत्या. आता आज सकाळपासून नामबदलाची चर्चा रंगली आहे. राष्ट्रपतींच्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेत पहिल्यांदाच  'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा उल्लेख करण्यात आला आहे. विरोधकांच्या आघाडीचे नाव इंडिया जाहीर केल्यापासून त्यासंदर्भात चर्चा रंगल्या होत्या. मात्र आजच्या निमंत्रण पत्रिकेवरून याला  आणखी पाठबळ मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशनात नेमके काय होणार याच्या चर्चा रंगल्या आहेत. 


हे ही वाचा :


Amitabh Bachchan : भारत माता की जय! G-20 निमंत्रण पत्रिकेवरील नाम बदलावर अमिताभ बच्चन यांचं सूचक ट्वीट