Himachal Pradesh Election : हिमाचलमध्ये भाजपचे विद्यमान सहा मंत्री पराभवाच्या छायेत, 'या' मतदारसंघात काँग्रेसची आघाडी
Himachal Pradesh Election : हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्तेच्या दिशेनं वाटचाल सुरु आहे. दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश सरकारमधील भाजपचे विद्यमान सहा मंत्री पिछाडीवर आहेत.
Himachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे (Himachal Pradesh Election 2022) कल आता हाती येत आहेत. हिमाचलमध्ये काँग्रेसनं (Congress) बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेसनं 40 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप (BJP) 25 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्तेच्या दिशेनं वाटचाल सुरु आहे. दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश सरकारमधील भाजपचे विद्यमान सहा मंत्री पिछाडीवर आहेत. त्यांना पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस हिमाचलमध्ये आघाडीवर आहे. सत्ता स्थापन करण्याइतपत बहुमत काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. कारण सध्या 40 जागांवर काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. भाजपच्या विद्यमान सहा मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण विद्यमान सहा मंत्री पिछाडीवर आहेत.
उच्च तंत्र शिक्षणमंत्री रामलाल मकरंद
उच्च तंत्र शिक्षणमंत्री रामलाल मकरंद लाहौल और स्पीती मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून रामलाल मकरंद हे जवळपास आठ हजाहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून रवी ठाकूर हे निवडणूक लढवत आहेत ठाकूर हे 9 हजार 734 मतांनी आघाडीवर आहेत.
शिक्षण मंत्री गोविंद सिंह ठाकूर
हिमाचल प्रदेशचे शिक्षण मंत्री गोविंद सिंह ठाकूर हे देखील पिछाडीवर आहेत. गोविंद सिंह ठाकूर हे मनाली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे विनोद सुलतानपुरी निवडणूक लढवत आहेत.
आरोग्य मंत्री राजीव सैजल
हिमाचल प्रदेश सरकारमध्ये आरोग्य मंत्री असलेले राजीव सैजल हे देखील पिछाडीवर आहेत. ते कसौली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना आत्तापर्यंत फक्त 13 हजार 656 मते मिळाली आहे. तर त्यांच्या विरोधी उमेदवाराला त्यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली आहेत.
सामाजिक न्यायमंत्री सरवीन चौधरी
सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री असलेले सरवीन चौधरी हे पिछाडीवर आहेत. सरवीन चौधरी हे शाहपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना 23 हजार 931 मते मिळाली आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून केवल सिंह हे निवडणूक लढवत आहेत. त्यांना आत्तापर्यंत 35 हजार 862 मते मिळाली आहेत.
ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री वीरेन्द्र कंवर
ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री वीरेन्द्र कंवर हे कुटलेहड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते देखील पिछाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे दविंदर कुमार निवडणूक लढवत आहेत. ते सध्या आघाडीवर आहेत.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री राजिंदर गर्ग
अन्न व प्रशासन मंत्री राजिंदर गर्ग हे घुमारवीं मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते देखील पिछाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून राजेश धर्मानी निवडणूक लढवत आहेत. धर्मानी आघाडीवर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: