Hijab Controversy : दक्षिण दिल्ली दिल्ली नगर निगमच्या (SDMC) शिक्षण समितीने एक मोठा निर्णय घेतला आहे, शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना सांगfतले की, 'धार्मिक पोशाख' घातलेला कोणताही विद्यार्थी शाळांमध्ये येणार नाही याची खात्री करण्यास सांगितले आहे. एसडीएमसीच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा नितिका शर्मा यांनी यासंदर्भात शिक्षण संचालकांना पत्र लिहिले आहे.


'धार्मिक पोशाख' परिधान करून शाळेत प्रवेश नाही
या पत्रात शर्मा यांनी शिक्षण संचालकांना सर्व विभागीय अधिकाऱ्यांना एसडीएमसीच्या प्राथमिक शाळांमध्ये 'धार्मिक पोशाख' परिधान करून शाळेत प्रवेश देण्यास परवानगी न देण्याच्या सूचना द्याव्यात आणि त्यांना ठरलेल्या ड्रेस कोडमध्ये शाळेत प्रवेश देण्यास सांगितले आहे. ईशान्य दिल्लीच्या तुखमीरपूर भागातील एका पालकाने आरोप केला होता, सरकारी शाळेतील शिक्षकाने त्यांच्या मुलीला डोक्यावर बांधलेला 'स्कार्फ' काढायला सांगितले होते. त्यानंतर एसडीएमसीचा हा निर्णय काही दिवसांनी आला आहे. शर्मा यांनी सांगितले की, 'धार्मिक पोशाख' घालून वर्गात उपस्थित राहिल्याने विद्यार्थ्यांमध्ये 'विषमता' निर्माण होईल. तसेच त्यांनी सांगितले की, “मी SDMC च्या शिक्षण संचालकांना झोनल ऑफिसरला सूचना देत विद्यार्थी धार्मिक पोशाखात शाळांमध्ये येऊ नयेत, कारण यामुळे त्यांच्यात फरक आणि असमानतेची भावना निर्माण होते. "


योग्य ड्रेस कोड


शर्मा म्हणाले, “SDMC च्या शाळांसाठी एक योग्य ड्रेस कोड निर्धारित करण्यात आला आहे आणि विद्यार्थ्यांनी त्याचे पालन केले पाहिजे. आम्ही दरवर्षी मुलांना शाळेचा ड्रेस मोफत देतो, जेणेकरून ते शाळेत येताना धार्मिक पोशाखाऐवजी ते परिधान करतात.” मात्र, शाळांमधील फॅन्सी ड्रेस स्पर्धा किंवा उत्सवादरम्यान विद्यार्थी 'धार्मिक ड्रेस' घालू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. एसडीएमसी इयत्ता पाचवीपर्यंत सुमारे 568 शाळा चालवते. या शाळांमध्ये सुमारे अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. पत्रात शर्मा यांनी लिहिले की, "अलीकडे असे दिसून आले आहे की काही पालक आपल्या मुलांना धार्मिक पोशाखात शाळेत पाठवत आहेत, जे योग्य नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असमानतेची भावना निर्माण होऊ शकते, जी त्यांच्या भविष्यासाठी अजिबात चांगली नाही.”


गणवेश परिधान करण्यास सूट
शर्मा म्हणाले, “या गोष्टी लक्षात घेऊन, सर्व प्रादेशिक अधिकार्‍यांना स्पर्धा किंवा उत्सवादरम्यानच विद्यार्थ्यांनी शालेय गणवेश सोडून इतर कपडे घालावेत याची काळजी घेण्याचे निर्देश दिले पाहिजेत. सामान्य दिवशी त्यांनी शाळेच्या गणवेशातच शाळेत हजर राहावे.पत्रात असं म्हटलंय की, एसडीएमसी आवश्यकतेनुसार ड्रेसचा रंग बदलत राहते, जेणेकरून गरीब आणि श्रीमंत मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ नये.


संबंधित बातम्या :