Central Bank of India SO Recruitment 2022 : बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) ने HRD विभागात 19 स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 10 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 मार्च 2022 आहे. इच्छुक उमेदवार Centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी 27 मार्च रोजी ऑनलाइन आयोजन करण्यात येणार आहे. ज्यासाठी 17 मार्च 2022 रोजी प्रवेशपत्र जारी केले जातील. निवडलेल्या उमेदवारांना 63,840 रुपये ते 78,230 रुपये पगार दिला जाईल.



  • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : 10 फेब्रुवारी 2022

  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 02 मार्च 2022

  • प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख : 17 मार्च 2022

  • परीक्षेची तारीख : 27 मार्च 2022


येथे रिक्त जागा तपासा
या भरतीअंतर्गत आयटी, वरिष्ठ व्यवस्थापकाची 19 पदे भरण्यात येणार आहेत. त्यापैकी 10 पदे सामान्य उमेदवारांसाठी, पाच पदे ओबीसी, दोन पदे SC, एक पदे ST आणि एक पद EWS उमेदवारांसाठी आहेत.


शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार संगणक विज्ञान / IT / ECE किंवा MCA / MSc मध्ये अभियांत्रिकी पदवीधर असावा. यासोबतच उमेदवाराला सहा वर्षांचा अनुभवही असावा.


वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची वयोमर्यादा 35 वर्षे असावी.


निवड प्रक्रिया
निवड ऑनलाइन चाचणी आणि मुलाखतीवर आधारित असेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha