नवी दिल्ली: बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये चमकी तापीने 152 मुलांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढतच असल्याने सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि बिहार सरकारला फटकारत येत्या सात दिवसांत उत्तर मागितले आहे.
परिस्थिती आता नियंत्रणात आहे असे उत्तर आज बिहार सरकारने सुनावणीदरम्यान दिले की. हे ऐकून उत्तर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी दर्शवली. ‘‘हे योग्य नाही बिहार सरकारला उत्तर द्यावेच लागेल.’’ अशा शब्दात कोर्टाने सरकारला फटकारले आहे.
आरोग्य सेवा, पोषण आणि स्वच्छता या महत्त्वांच्या तीन मुद्यांवर न्यायालयाने बिहार सरकारला अहवाल देण्यास सांगितला आहे. या सर्व पीडित लोकांना मूलभूत अधिकार आहेत आणि ते त्यांना निश्चितपणे मिळणे आवश्यक असल्याचं कोर्टाने सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर चिंता व्यक्त करत केंद्र आणि राज्य सरकारला 7 दिवसात अहवाल देण्यास सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी दोन याचिका दाखल झाल्या होत्या. ज्यामध्ये न्यायालयाने बिहार सरकारला वैद्यकीय सेवेत सुधारणा करण्याच्या संदर्भात कारवाई करावी असे सांगितले. आजपर्यंत बिहारमधील एक्यूट एन्सेफलायटीस सिंड्रोम (एईएस) मुळे 152 मुले मरण पावले आहेत.
आतापर्यंत 152 मुलांचा मृत्यू
गेल्या एक महिन्यापासून बिहारमध्ये चमकी ताप झाल्याने 152 मुलं मरण पावली आहेत. मुजफ्फरपूरच्या श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 110 मुलांचा मृत्यू झाला असून तिथे अनेक मुलांवर उपचार देखील सुरु आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी या विषयावर अद्याप काही उत्तर दिलेले नाही. तसेच केंद्र सरकार सतत मुलांच्या मृत्यूंबद्दल माहिती देण्यात टाळाटाळ करत आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मुलांच्या मृत्यूंबद्दल बिहार सरकार व केंद्र सरकारला एका आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले.
काय आहेत चमकी तापाची लक्षणे?
एन्सेफलायटीस सिंड्रोम अर्थात चमकी तापाने शरीराच्या मज्जासंस्थावर थेट परिणाम होतो. खूप ताप आल्यानंतर शरीराच्या न्यूरोलॉजिकल सिस्टमवर परिणाम होतो. परिणामी रोग्यांची चिडचिड होतो आणि मानसिक समतोल बिघडतो. हा रोग सामान्यतः पावसाळ्याच्या आरंभीला उद्भवतो. जून ते ऑक्टोबर महिन्यांमध्ये हा ताप डोके वर काढतो. हा ताप मुख्यत: लहान मुलांसाठी अधिक धोकादायक आहे.
'चमकी ताप' प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रासह बिहार सरकारला फटकारले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jun 2019 03:27 PM (IST)
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर चिंता व्यक्त करत केंद्र आणि राज्य सरकारला 7 दिवसात अहवाल देण्यास सांगितले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -