एक्स्प्लोर

नोटांबाबत तुमच्या मनातील 26 प्रश्नांची उत्तरं !

मुंबई : काळ्या पैशाविरोधातील लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठं शस्त्र उगारलं आहे. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. मंगळवार (8 नोव्हेंबर 2016) च्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्दबातल करण्यात आल्या आहेत. मात्र या निर्णयानंतर प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा निर्णय का घेतला, एवढी गुप्तता का बाळगली, आपल्याकडील नोटांचं काय होणार, अशा अनेक प्रश्नांचं संभ्रम सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात निर्माण झाला आहे. www.abpmajha.in रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकात सामान्य व्यक्तीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं आहे.
  1. या योजनेची गरज का पडली?
उ. काळा पैसा, बनावट नोटा आण दहशतवाद्यांना पुरवला जाणारा पैसा रोखण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्याची गरज पडली. बनावट नोटा चलनात मिसळल्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. या नोटा हद्दपार करण्यासाठी हे महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं.
  1. काय आहे योजना?
उ. चलनातून 500, 1000 च्या नोटा रद्दबातल करण्यात आल्या आहेत. कसल्याही व्यवहारासाठी या नोटांचा वापर करता येणार नाही. केवळ 11 नोव्हेंबरपर्यंत रुग्णालये, पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन, विमानतळ या ठिकाणी या नोटांचा वापर करता येणार आहे. तुमच्याकडील 500, 1000 च्या नोटा आरबीआयचे देशातील 19 कार्यालये, कोणतीही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करता येणार आहेत. www.abpmajha.in
  1. नोटांच्या बदल्यात काय मिळणार?
उ. जमा केलेल्या रक्कमेच्या मोबदल्यात तुम्हाला सर्व रक्कम जशास तशी मिळणार आहे. यामध्ये कुणालाही तोटा होणार नाही.
  1. जुन्या नोटांच्या बदल्यात पैसे लगेच मिळणार का?
उ. नाही, प्रति व्यक्ती केवळ 4 हजार रुपये मिळतील. बाकी रक्कम तुमच्या खात्यात जमा राहिल.
  1. सर्व नोटा जमा केल्या तरी तातडीने बदलून का मिळणार नाहीत?
उ. या योजनेत अशी सुविधा देण्यात आलेली नाही. कारण 100 च्या नोटांचा तुटवडा निर्माण होईल म्हणून टप्प्याटप्प्याने नोटा बदलून मिळतील. www.abpmajha.in
  1. 4 हजार रुपये माझ्या गरजेसाठी कमी आहेत, मग काय करु?
. इतर गरजांसाठी तुम्ही मोबाईल बँकिंग, फंड ट्रान्सफर, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यांचा वापर करु शकता.
  1. माझं कोणत्याही बँकेत खातं नसेल तर काय करायचं?
उ. कागदपत्र जमा करुन कोणत्याही बँकेत खाते उघडू शकता.
  1. माझ्याकडे फक्त जनधन योजनेंतर्गत उघडलेलं खातं आहे, तर काय करावं?
उ. जनधन योजनेंतर्गत खाते असणाऱ्या खातेधारकांना जुन्या नोटा जमा करुन त्याबदल्यात बदल्यात नव्या नोटा मिळतील. www.abpmajha.in
  1. माझ्याकडील नोटा कुठे-कुठे बदलून मिळतील?
. तुमच्याकडच्या 500, 1000 च्या नोटा रिझर्व्ह बँकेची सर्व कार्यालये, बँक शाखा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बदलून मिळतील.
  1. मला फक्त माझं खातं असलेल्या बँकेतच जावं लागेल का?
उ. 4 हजार रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी आवश्यक कागदपत्र घेऊन तुम्ही कुठल्याही बँकेत जाऊ शकता. मात्र त्यापेक्षा अधिक रक्कम जमा करण्यासाठी तुमचं खातं असलेल्या बँकेतच जावं लागेल. जर तुमचं कोणत्याच बँकेत खातं नसेल तर आरबीआयने जारी केलेला नोटा बदली फॉर्म भरुन सोबत पॅन कार्ड, आधार कार्ड अशा आवश्यक कागदपत्रांसह बँकेत तुमची माहिती द्यावी लागेल. मग तिथे तुम्हाला नोटा बदलून मिळतील.
  1. मी माझ्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊ शकतो का?
. होय
  1. माझ्या बँकेशिवाय कोणत्याही बँकेतून नोटा बदलून मिळतील का?
उ. होय. आवश्यक कागदपत्रांसह 4000 रुपयांपर्यंतची रक्कम कोणत्याही बँकेतून बदलून घेऊ शकता. www.abpmajha.in
  1. माझं बँकेत खातं नाही. मात्र माझ्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या खात्यामार्फत पैसे बदलून घेऊ शकतो का?
उ. जर तुम्हाला तुमचे नातेवाईक किंवा मित्र लेखी परवानगी देत असतील तर तुम्ही त्यांच्या खात्यामार्फत नोटा बदलून घेऊ शकता.
  1. मला स्वतःलाच बँकेत जावं लागेल, की इतर कोणाला पाठवलं तर चालेल?
उ. जर तुम्ही स्वतः बँकेत गेलात तर उत्तमच आहे. मात्र तुम्हाला वेळ नसेल तर तुमच्या प्रतिनिधीला परवानगी पत्र देऊन पाठवू शकता. प्रतिनिधीजवळ तुमचं एखादं ओळखपत्र असणंही गरजेचं आहे.
  1. मी एटीएममधून पैसे काढू शकतो का?
उ. यासाठी काही वेळ लागणार आहे. बँकांनी एटीएममध्ये 100 च्या नोटा भरल्यानंतर तुम्हाला पैसे काढता येतील. 18 नोव्हेंबरपर्यंत दररोज केवळ 2 हजार रुपये एटीएममधून काढता येतील. 19 नोव्हेंबर नंतर ही मर्यादा 4 हजार रुपयांपर्यंत वाढवली जाईल. www.abpmajha.in
  1. मी चेकने पैसे काढू शकतो का?
. चेकने पैसे काढता येतील. चेकने पैसे काढण्याची कमाल मर्यादा 10 हजार दररोज आणि आठवड्याला 20 हजार रुपये एवढीच आहे. म्हणजे तुम्ही आठवड्यातून दोनदाच पैसे काढू शकता. 24 नोव्हेंबरपर्यंत ही मर्यादा लागू आहे.
  1. एटीएम, कॅश डिपॉझीट मशिन यांच्यामार्फत पैसे जमा करु शकतो का?
उ. होय
  1. मी मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, ऑनलाईन फंड ट्रान्सफर या सुविधांचा वापर करु शकतो का?
उ. होय
  1. माझ्याकडच्या नोटा कधीपर्यंत बदलून घेऊ शकतो?
उ. ही योजना 30 डिंसेबरला बंद होणार आहे. त्यामुळे दिलेल्या कालावधीतच नोटा जमा कराव्या लागतील. मात्र या कालावधीत ज्यांना नोटा जमा करणं शक्य नाही, त्यांनाही पुन्हा जुन्या नोटा बदलून घेण्याची संधी मिळणार आहे. आरबीआयच्या ठराविक कार्यालयांमध्ये प्रतिज्ञापत्रासह या नोटा जमा करता येतील. या प्रतिज्ञापत्रात तुम्ही तुमच्याकडील पैशाचा स्रोत सांगणं गरजेचं आहे. www.abpmajha.in
  1. मी सध्या भारताबाहेर आहे, तर काय करावं?
उ. तुम्ही तुमच्या कोणत्याही नातेवाईकामार्फत पैसे जमा करु शकता. त्यासाठी नातेवाईकाकडे तुमचा अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, मतदान कार्ड यापैकी कोणतेही अधिकृत ओळखपत्र जवळ असणं गरजेचं आहे.
  1. मी अनिवासी भारतीय आहे, माझं बँक खातंही एनआरओ असेल तर काय पर्याय आहे?
उ. तुम्ही तुमच्या याच खात्यात पैसे जमा करु शकता
  1. मी परदेशी पर्यटक आहे, माझ्याकडच्या नोटांचं काय करावं?
उ. एअरपोर्ट एक्स्चेंज काऊंटवर जाऊन तुम्ही तुमच्या नोटा बदलून घेऊ शकता.     23. मला (रुग्णालय, औषध खरेदी, प्रवास) यांसाठी पैशांची गरज असेल तर काय करावं? उ. रेल्वे स्थानक, रुग्णालये, बस स्थानक, एअरपोर्ट अशा ठिकाणी 11 नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र औषध खरेदीसाठी डॉक्टरांची चिठ्ठी गरजेची आहे. www.abpmajha.in     24. यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती? उ. आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, मतदान कार्ड अशी कागदपत्र जवळ असणं गरजेचं आहे.     25. या योजनेविषयी अधिक माहिती मला कुठे मिळेल? उ. तुम्ही www.rbi.org.in या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.     26. मला काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर मी काय करावं? उ. तुम्ही कधीही आरबीआयच्या publicquery@rbi.org.in या ईमेल वर तुमची समस्या पाठवू शकता. किंवा 022 22602201/022 22602944 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. संबंधित बातम्या :

नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत : पवार

शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1000 अंकांनी गडगडला

500,1000च्या नोटांसंबंधी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर!

नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सोन्याचा दर वधारला

एकच फाईट, वातावरण ताईट, सोशल मीडियावर विनोदांची त्सुनामी

टोलनाका, एटीएम, पेट्रोल पंपावर गर्दी, सामान्यांना मनस्ताप

आरबीआयकडून 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांची झलक

देशभरातील सर्व एटीएम आज बंद, बँकांचे व्यवहारही ठप्प

कधीपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार?

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कुठे जमा करता येणार?

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Election Results 2026: कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Election Results 2026: कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
Thane Mahangarpalika Election results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Election Results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Dhule DMC Election Result : उत्तर महाराष्ट्रात भाजपनं खातं उघडलं, धुळे महापालिकेत चार उमेदवार विजयी, मतमोजणीपूर्वीच विजयाचा चौकार
उत्तर महाराष्ट्रात भाजपनं खातं उघडलं, धुळे महापालिकेत चार उमेदवार विजयी, बिनविरोध विजयाचा चौकार
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Embed widget