Corona Deaths : कोरोनामुळे भारतात 47 लाख रुग्णांचा मृत्यू झाल्याचा WHO चा दावा, या कारणांमुळे रिपोर्टवर उपस्थित होतायत प्रश्न
Corona Deaths In India : एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी WHO च्या रिपोर्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, भारताकडे कोरोना रुग्णांची आणि मृत्यूंची योग्य आकडेवारी आहे.

Coronavirus Deaths In India : कोरोना विषाणूमुळे भारतात 47 लाख रुग्णांचा मृत्यू झाल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे. WHOने दिलेला हा अहवाल केंद्र सरकारने फेटाळला आहे. WHOने गुरुवारी जारी केलेल्या अगवाला म्हटलं आहे की, जानेवारी 2022 पासून डिसेंबर 2021 पर्यंत भारतात सुमारे 47 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र हा आकडा भारतातील मूळ आकडेवारीपेक्षा 10 पटीने जास्त आहे.
WHOच्या आकडेवारीवर का उपस्थित होत आहेत प्रश्न?
देशातील आरोग्य तज्ज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा अंदाज लावण्यासाठी वापरल्या जाणार्या 'मॉडेलिंग' पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला आहे. देशातील आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे की, WHOने प्रत्येकासाठी समान धोरण स्वीकारले आहे, हे योग्य नाही.
आयसीएमआर (ICMR) म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक (आयसीएमआर) बलराम भार्गव, नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल आणि एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया आरोग्य तज्ज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेचा अहवालात फेटाळून लावला आहे. त्यांन म्हटलं आहे की, भारताने जागतिक पातळीवर योग्य प्रकारे कोरोनाची आकेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे WHOने जारी केलेल्या आकडेवारीशी भारत सहमत नाही.
गुलेरिया यांनी अहवालावर आक्षेप नोंदवला
नीति आयओगचे सदस्य व्ही. के. पॉल म्हणाले की, 'भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यू योग्य आकडेवारी उपलब्ध असताना केवळ मॉडेलिंगच्या अंदाजावर आकडेवारी जाहिर करणे हे चुकीचं आहे. पॉल यांनी पुढे म्हढलं आहे की, 'दुर्दैवाने आम्ही वारंवार पत्रव्यवहार आणि मंत्र्यांच्या बैठकीनंतरही WHO ने मॉडेलिंगवर आधारित आकडेवारीचा पर्याय निवडला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
