प्रत्येकाला हजार रुपये देऊन तोडफोड करण्यास सांगितल्याचा दावा केला जात आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या खाण्या-पिण्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आल्याचंही म्हटलं जातं.
हरियाणातल्या सिरसा भागातील सीसीटीव्ही दृश्यं समोर आली आहेत. तोडफोड करताना अनेकांनी चेहऱ्याला रुमालही बांधला आहे. गुंडांनी जाणीवपूर्वक हिंसाचार केला असल्यास तो कुणाच्या सांगण्यावरुन केला याचाही तपास सुरु आहे.
बलात्काराच्या आरोपात दोषी ठरलेल्या बाबा राम रहीमला उद्या म्हणजेच सोमवारी शिक्षा सुनावली जाणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे न्यायाधीश ही शिक्षा कोर्टाऐवजी तुरुंगात जाऊन सुनावणार आहेत. त्यामुळे राम रहीमचा फैसला काय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हरियाणात झालेल्या तोडफोड आणि जाळपोळीच्या नुकसानासाठी राम रहीमची संपत्ती जप्त करुन भरपाई करा, असे आदेश पंजाब हरियाणा हायकोर्टानं दिले आहेत.
बाबा राम रहीमला 2002 च्या साध्वी बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं. यानंतर सिरसा, पंचकुला या शहरांसह हरियाणा, पंजाबमध्ये राम रहीमच्या कथित समर्थकांनी धुडगूस घातला. यामध्ये 31 जणांचा मृत्यू झाला तर लाखोंच्या संपत्तीचं नुकसान झालं.