Happy Republic Day 2021 | संस्कृतीप्रधान भारताला Google चा सलाम
दरवर्षीप्रमाणं यंदाही भारताच्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत एक खास डूडल गुगलकडून साकारण्यात आलं आहे.
![Happy Republic Day 2021 | संस्कृतीप्रधान भारताला Google चा सलाम Happy Republic Day 2021 google saltutes india with special creative doodle on 26 jauary 2021 Happy Republic Day 2021 | संस्कृतीप्रधान भारताला Google चा सलाम](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26115959/google.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Happy Republic Day 2021 देशाच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असतानाच शक्य त्या सर्व परिंनी या लोकशाही राष्ट्राला या अतिशय महत्त्वाच्या दिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. यामध्ये Google ही मागे राहिलेलं नाही. दरवर्षीप्रमाणं यंदाही भारताच्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत एक खास डूडल गुगलकडून साकारण्यात आलं आहे.
जागतिक पटलावर भारताची जी ओळख आहे, त्याचाच आधार घेत हे डूडल साकारण्यात आलं आहे. विविधतेत एकता जपण्यासोबतच भारत हा एक संस्कृतीप्रधान देश आहे. गरीब असो वा श्रीमंत या देशात जातपात, भेदभाव न करता एकात्मतेच्याच तत्त्वावर चालत देशाभिमान जपण्याला इथं प्राधान्य दिलं जातं. अशाच या बहुरंगी राष्ट्राला गुगल या सर्च इंजिननं अनोख्या अंदाजात सलाम केलं आहे.
गुगल सर्चमध्ये जाताच हे डूडल नजरेस पडतं. ज्यामध्ये पंजाबपासून ते अगदी केरळ, कर्नाटकापर्यंतच्या छटा पाहायला मिळतात. देशातील काही महत्त्वाच्या वास्तूंच्या पार्श्वभूमीवर कला आणि क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणारा भारत, या डूडलमध्ये साकारण्यात आला आहे. शिक्षण आणि शिक्षकांचं महत्त्वं या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवत कुटुंबवत्सलताही यामध्ये अधोरेखित करण्यात आली आहे.
Republic Day 2021: देशाचे संरक्षण करण्यास भारतीय सैन्य सक्षम : राष्ट्रपती रामनाथ कोविंद
देशावर मागील साधारण वर्षभरात अनेक संकटं आली. मानवनिर्मित आणि नैसर्गिक अशा अनेक संकटांच्या वादळातही भारत मोठ्या आत्मविश्वासानं पाय घट्ट रोवून उभा राहिला तो याच जनतेच्या आणि त्यांच्या आत्मियतेच्या बळावर. अशा या राष्ट्राला प्रजासत्ताक दिनी फक्त देशातील नागरिकच नव्हे, तर संपूर्ण जगातील राष्ट्रांकडून 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. 'एबीपी माझा'कडूनही प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)