H3N2 Influenza Virus Cases in India : सध्या देशात H3N2 विषाणूचा (H3N2 Virus) संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात H3N2 मुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. व्हायरल इन्फ्लूएंझा (Influenza) म्हणजेच H3N2 विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. आत्तापर्यंत, केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये H3N2 इन्फ्लूएंझाच्या 79 रुग्णांची नोंद झाली आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने आरोग्य अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना काळजी घेण्याचा आणि मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.


Use Mask in Crowded Place : गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा


भारतात नव्या H3N2 इन्फ्लूएंझा (H3N2 Influenza) विषाणूच्या संसर्गाने चिंता वाढवली आहे. H3N2 इन्फ्लूएंझामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क (Mask) वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे. सध्या देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. H3N2 इन्फ्लूएंझा हा नवा विषाणूचा (H3N2 Virus) वेगाने पसरत आहे. सर्दी, ताप आणि खोकला ही H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत. 


H3N2 विषाणूचा वाढता धोका


अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (CDC) म्हणजेच यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, H3N2 हा एक गैर-मानवी इन्फ्लूएंझा विषाणू आहे. हा विषाणू सामान्यतः डुकरांमध्ये पसरतो आणि मानवांमध्ये संक्रमित होतो. त्याची लक्षणे हंगामी फ्लूसारखीच असतात. H3N2 विषाणूची लागण झाल्यावर ताप आणि श्वसन संसर्गाची लक्षणे दिसतात.  खोकला किंवा नाक वाहणे तसेच अंगदुखी, मळमळ, उलट्या किंवा अतिसार यांसारखी लक्षणे देखील दिसू शकतात.


H3N2 Influenza Death in India : H3N2 इन्फ्लुएंझा विषाणूमुळे दोन जणांचा मृत्यू


देशात व्हायरल H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गामुळे हरियाणा आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव पाहता सरकार अलर्ट मोडमध्ये आलं आहे. त्यामुळे कोरोना विषाणू (Coronavirus) नंतर आता H3N2 विषाणूचा धोका आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचं सल्ला देत मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.


H3N2 Virus Symtoms : H3N2 विषाणू संसर्गाची लक्षणं


H3N2 इन्फ्लूएंझा हा व्हायरल फ्लू आहे. याची लक्षणे कोरोना प्रमाणेच आहेत. ताप, खोकला आणि वाहणारं नाक तसेच शरीरदुखी, मळमळ, उलट्या किंवा जुलाब ही H3N2 विषाणूची काही प्रमुख लक्षणे आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


H3N2 Virus : कोरोनानंतर आता H3N2 चं तांडव? दोन जणांचा मृत्यू, केंद्र सरकारने बोलावली महत्त्वाची बैठक