Gujarat Gas Leak : गुजरातमध्ये (Gujarat) मोठी दुर्घटना घडली आहे. सुरतमध्ये केमिकलने (Gujarat Chemical Leak) भरलेल्या टँकरला (Tanker) गळती लागल्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 25 हून अधिक जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरतच्या (Surat) सचिन जीआयडीसी एक्स्टेंशन (Sachin GDIC Extension) परिसरात केमिकल गळती (Chemical Leak) झाल्यामुळे हा अपघात झाला.


सचिन जीआयडीसी (Sachin GDIC Extension) हा औद्योगिक परिसर (Industrial Area) आहे. टँकरमधून विषारी रसायनाची गळती झाली. रसायन हवेत पसरल्यानंतर लोक बेशुद्ध झाले. सर्व मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गळती झालेल्या टँकरमध्ये जेरी केमिकल (Jerry Chemical) असल्याचे बोलले जात आहे.


केमिकलने भरलेला टँकर सुरतच्या जीआयडीसी भागातील एका कारखान्यात पोहोचला. परंतु, रसायन काढताना गळती झाल्याने हे रसायन हवेच्या संपर्कात आले. यानंतर ही मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील जखमींवर सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलीस अजूनही या भागात मदत आणि बचाव कार्य करत आहेत. टँकर चालक प्रिंटिंग मिलजवळील नाल्यात रसायन टाकत असताना अपघाती गॅस गळती झाली. काय घडत आहे हे आजूबाजूच्या लोकांना समजेपर्यंत, विषारी वायू आधीच उघड्या आउटलेटमधून पसरला आणि त्यानंतरच्या काही क्षणांत तब्बल सहा लोकांचा जीव बळी गेला.</p >






संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha