Corona Vaccination In India : कोरोना विरोधातील प्रतिबंधक लस तयार करणारी कंपनी भारत बायोटेकनं बुधवारी एक परिपत्रक काढून लस घेतल्यानंतरच्या काही गोष्टी स्पष्ट केल्या. कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर किशोरवयीन मुलांनी पॅरासिटामॉल (Paracetamol) किंवा पेनकिलर घेणं टाळावं, असं या पत्रकातून सांगण्यात आलं आहे. भारत बायोटेकनं म्हटलं आहे की, आम्हाला अभिप्राय मिळाला आहे की, काही लसीकरण केंद्रं मुलांसाठी कोवॅक्सिनसह 3 पॅरासिटामॉल 500 मिलिग्राम गोळ्यांची शिफारस करत आहेत. परंतु, लसीकरणानंतर कोणतीही पॅरासिटामॉल किंवा पेन किलर घेण्याची शिफारस केली जात नाही.
ते म्हणाले की, फर्मने 30,000 व्यक्तींवर क्लिनिकल चाचण्यांचा हवाला देत सांगितले की, सुमारे 10-20 टक्के व्यक्तींनी साइड इफेक्ट्स जाणवल्याचं सांगितलं आहे. यापैकी अनेकांना सौम्य साइड इफेक्ट्स जाणवतात, जे साधारणतः 1-2 दिवसांत नाहिसे होतात आणि त्यांना औषधांची आवश्यकता नसते. कोणत्याही प्रकारची पेन किलर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच घ्यावी, असं कंपनीनेही म्हटलं आहे.
इतर लसी घेतल्यानंतर पॅरासिटामोल घेण्याची शिफारस
कंपनीचं म्हणणं आहे की, इतर काही COVID-19 लसींसोबत पॅरासिटामॉलची शिफारस करण्यात आली होती. परंतु, कोवॅक्सिनसाठी त्याची आवश्यकता नाही. खरं तर, देशभरात 15-18 वर्षे वयोगटातील कोविड-19 चे लसीकरण 3 जानेवारीपासून सुरु झाले. लहान मुलांना कोवॅक्सिनचा पहिला डोस दिला जात आहे. पहिल्या तीन दिवसांत 1.06 कोटीहून अधिक बालकांचे लसीकरण करण्यात आले.
लसीकरणाला वेग
दरम्यान, जगभरात कोरोना आणि ओमायक्रॉनची वाढती प्रकरणं पाहुन देशात लसीकरण मोहीम अधिक वेगानं सुरु झाली आहे. देशात कोरोना लसीकरण मोहीमेत (Corona Vaccination) आणखी एक पाऊल पुढे टाकत 3 जानेवारीपासून 15-18 वयोगटातील मुलांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. अशातच पहिल्याच दिवशी सोमवारी 41 लाखांहून अधिक मुलांना कोरोना लस देण्यात आली. यासह, देशात आतापर्यंत 146.61 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- हलक्यात घेऊ नका, ओमायक्रॉनची सर्दी सामान्य नाही; WHO चा इशारा
- धक्कादायक! 84 वर्षीय आजोबांनी तब्बल 11 वेळा घेतली लस
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह