एक्स्प्लोर

Gujarat Air India Plane Crash: उड्डानानंतर 3 सेकंदात इंधनपुरवठा ठप्प; गुजरातमधील विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर

Gujarat Air India Plane Crash: गुजरातमधील एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Gujarat Air India Plane Crash: गुजरातच्या अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने (Gujarat Air India Plane Crash) संपूर्ण देश हादरला. लंडनला जाणाऱ्या विमानाला अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यावर काही मिनिटांमध्येच भीषण अपघात झाला, यात 275 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहमदाबाद येथील विमानतळावरून उड्डाण केल्यावर विमानाच्या इंजिनांना होणाऱ्या इंधनाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारे स्विच बंद केले गेले होते. त्यामुळे उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच इंजिनामधील थ्रस्ट संपुष्टात आलं आणि विमान खाली कोसळल्याचं समोर आलं आहे.

एअर इंडियाच्या विमानाची दुर्घटना इंधनपुरवठा ठप्प झाल्यानं झाल्याचं प्राथमिक चौकशी अहवालात म्हटलं आहे. उड्डाणानंतर तीन सेकंदांतच दोन्ही इंजिनचा इंधनपुरवठा ठप्प झाला. तसेच इंधनपुरवठा ठप्प झाल्यानंतर पायलट आणि सह पायलटचा ऑडिओ संवादही समोर आला आहे.  इंधन पुरवठा का बंद केला? असा पायलटनं सह पायलटला प्रश्न विचारला. यावर मी काहीच केलं नाही असं सह पायलटनं प्रत्युत्तर दिले. इंधन पुरवठा ठप्प झाल्यानंतर 29 व्या सेकंदांस एअर इंडियाचे विमान कोसळले. त्यामुळे 2018 च्या एफएएच्या मार्गदर्शिकांकडे एअर इंडियाचं दुर्लक्ष झाल्याचं समोर येत आहे. 

डीजीसीएने एअर इंडियाच्या 3 अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे दिले आदेश-

21 जून रोजी डीजीसीएने एअर इंडियाला 3 अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश दिले. यामध्ये विभागीय उपाध्यक्ष चुडा सिंग, क्रू शेड्युलिंग करणारी मुख्य व्यवस्थापक पिंकी मित्तल आणि क्रू शेड्युलिंगच्या नियोजनात सहभागी असलेली पायल अरोरा यांचा समावेश होता. विमान सुरक्षा प्रोटोकॉलचे गंभीर उल्लंघन केल्याबद्दल तिन्ही अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. डीजीसीएने एअर इंडियाला क्रू शेड्युलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित भूमिकांमधून तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले होते.

नेमकी घटना काय?

अहमदाबाद विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये राज्यातील 9 जणांचा समावेश आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन झालं आहे. दरम्यान, विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना टाटा समूहाकडून 1 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. जखमींचा उपचाराचा खर्चही टाटा समूहच करणार आहे. डॉक्टरांचं हॉस्टेलही नव्यानं बांधून देणार असल्याचं टाटा समुहाने जाहीर केलं आहे. टाटा समूह हॉस्टेलही बांधून देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

गुजरातमधील विमान दुर्घटनेनं संपूर्ण देश हादरला, VIDEO:

संबंधित बातमी:

Gujarat Air India Plane Crash: आयुष्यात पहिल्यांदाच विमान बघितलं, व्हिडीओ काढला तो थेट अहमदाबाद विमान अपघाताचा, शूट करणाऱ्या आर्यनची कहाणी!

Air India Plane Crash In Ahmedabad: दोन एअर होस्टेस, काका-काकी जळत होते; मी विमानातून सीटसह बाहेर फेकला गेलो, बचावलेल्या प्रवाशाने थरार सांगितला!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
Nanded Crime Love Story: नांदेडच्या प्रेमप्रकरणाचा जातीय विखारामुळे भयंकर शेवट, सक्षम ताटेची केस प्रकाश आंबेडकर लढवणार का? अंजली आंबेडकर म्हणाल्या...
सक्षम-आचलला न्याय देण्यासाठी प्रकाश आंबेडकर कोर्टात युक्तिवाद करणार? अंजली आंबेडकर म्हणाल्या...
Weakest Currency 2025 : डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन कोणते? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन कोणते? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट
Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
Nanded Crime Love Story: नांदेडच्या प्रेमप्रकरणाचा जातीय विखारामुळे भयंकर शेवट, सक्षम ताटेची केस प्रकाश आंबेडकर लढवणार का? अंजली आंबेडकर म्हणाल्या...
सक्षम-आचलला न्याय देण्यासाठी प्रकाश आंबेडकर कोर्टात युक्तिवाद करणार? अंजली आंबेडकर म्हणाल्या...
Weakest Currency 2025 : डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन कोणते? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन कोणते? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
बेळगावात अग्निवीरांचा शानदार दीक्षांत समारंभ; 31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण
बेळगावात अग्निवीरांचा शानदार दीक्षांत समारंभ; 31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं गाठला उच्चांक, सोनं 957 रुपयांनी महागलं, 24 कॅरेट, 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या 
चांदी 4034 रुपयांनी महागली, नवा उच्चांक गाठला, सोनं 957 रुपयांनी महागलं, सोन्याचा दर किती? जाणून घ्या
Nagarparishad Election EVM: नगरपरिषद निवडणुकीचं मतदान संपताच EVM मशीनचं सील तोडलं? गोंदियातील स्ट्राँग रुममध्ये नक्की काय घडलं?
मोठी बातमी: नगरपरिषद निवडणुकीचं मतदान संपताच EVM मशीनचं सील तोडलं? गोंदियातील स्ट्राँग रुममध्ये नक्की काय घडलं?
सांगलीत राडा; स्ट्र्राँग रुमबाहेर मोठ्या संख्येनं जमले लोकं; नगरपालिकेसाठी झालेल्या मतदानात 2900 मतांचा फरक
सांगलीत राडा; स्ट्र्राँग रुमबाहेर मोठ्या संख्येनं जमले लोकं; नगरपालिकेसाठी झालेल्या मतदानात 2900 मतांचा फरक
Embed widget