Meal With Mom : भारतात सणांना फार महत्त्व आहे. येथील प्रत्येक सण गुण्यागोविंदाने साजरा केला जातो. होळीच्या (Holi 2022) सणाला देखील तितकंच महत्व आहे. होळीचं औचित्य साधत भारत सरकारने देशातील नागरिकांना आईसोबत जेवण करतानाचा फोटो शेअर करण्याचा आवाहन केले आहे. MyGovIndia च्या ट्विटरवर याबातचे आवाहन करण्यात आले आहे.


होळीचे औचित्य साधत केंद्र सरकारने देशातील नागरिकांना आईसोबत जेवण करताना आनंद घ्या, आणि होळीच्या सण साजरा करा, अशी विनंती केली आहे. आईसोबत जेवण करतानाचा फोटो पोस्ट करण्याची विनंती केंद्र सरकारने नागरिकांना केली आहे. फोटो पोस्ट करताना #MaaKeSangKhana अथवा #MealWithMom या हॅशटॅगचा वापर करा. या हॅशटॅगसह आईसोबत जेवण करातानाचा फोटो पोस्ट करा. निवडक फोटो भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर खात्यावर पोस्ट करण्यात येतील, असे सांगण्यात आले. 






पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच गुजरातच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मातोश्रीसोबत जेवणाचा आस्वाद घेतला होता. पंतप्रधान आणि त्यांच्या मोतोश्रींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. MyGovIndia च्या ट्विटरवर याच फोटोचा वापर करण्यात आला आहे. तसेच होळीच्या सणाला आईसोबत जेवण करत असतानाचा फोटो पोस्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवडण फोटो भारत सरकारच्या अधिकृत ट्विटरवर पोस्ट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


महत्वाच्या बातम्या :


Happy Holi 2022 Wishes : तुमच्या प्रियजनांना 'या' खास शुभेच्छा देऊन होळीचा आनंद द्विगुणित करा


Holi 2022 : होळी आधी आणि नंतर 'अशी' घ्या त्वचेची काळजी; फॉलो करा तज्ज्ञांनी दिलेल्या सोप्या टिप्स


 मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live