चंदीगड : पंजाबमध्ये आता यापुढे भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिला आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांसोबत आपण आहोत, त्यामुळे आता भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हप्ता वसुली बंद होणार असल्याचंही ते म्हणाले. पंजाबमध्ये शहीद दिन म्हणजे 23 मार्च रोजी अॅन्टी करप्शन हेल्पलाईन नंबर जारी करण्यात येणार आहे. 


पर्सनल व्हॉट्सअॅप नंबर शेअर केला
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये त्यांनी आपला व्हॉट्सअॅप नंबर शेअर केला आहे. ते म्हणाले की, "हा माझा व्हॉट्सअॅप नंबर असून जर कोणी लाच मागितली तर त्याचा व्हिडीओ किंवा ऑडिओ मला पाठवून द्या. भ्रष्ट अधिकाऱ्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल."


 






भगवंत मान म्हणाले की, येत्या 23 तारखेला भगतसिंह शहीद दिनानिमित्ताने अॅन्टी करप्शन हेल्पलाईन नंबर शेअर करण्यात येईल. 99 टक्के अधिकारी इमानदार आहेत. केवळ एक टक्का भ्रष्टाचारी लोकांमुळे सर्व सिस्टम बिघडते. पंजाबमध्ये आता हप्ता वसुली बंद होईल. हप्त्यासाठी आता कोणताही नेता किंवा अधिकारी सामान्यांना त्रास देणार नाही. 


दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पंजाब सरकारचा हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं सांगितलं आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत 117 जागांपैकी आपने 92 जागा जिंकल्या आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या :