India Sri Lanka: श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात अडकला आहे. अशातच आता भारताचे आपल्या शेजारील देशासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारत श्रीलंकेला एक अब्ज डॉलर्सचे कर्ज देणार आहे. जेणेकरून श्रीलंकेचे सरकार अन्न, औषध आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करू शकेल.


श्रीलंकेचे अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही देशातील नेत्यांनी परस्पर हितसंबंध आणि आर्थिक सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकीत अन्न, औषध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी श्रीलंकेला एक अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्यासाठी एसबीआय (SBI ) आणि श्रीलंका सरकार यांच्यात करार करण्यात आला. 


याआधी डिसेंबरच्या सुरुवातीला राजपक्षे यांच्या दिल्ली भेटीपासून श्रीलंकेला आपत्कालीन आर्थिक मदत देण्याबाबत चर्चा सुरू होती. त्यावेळी दोन्ही देशातील मंत्र्यांनी श्रीलंकेला मंदीतून बाहेर काढण्यासाठी मदत संबधित काही मुद्द्यांवर आपली सहमती दर्शविली होती. ज्यामध्ये अन्न, औषधे आणि इंधन यासारख्या आवश्यक वस्तूंच्या आयातीसाठी भारतीय क्रेडिट लाइनचा समावेश आहे. तसेच श्रीलंकेच्या परकीय चलनात वाढ होण्यास मदत म्हणून चलन अदलाबदल, त्रिंकोमाली ऑइल टँक फार्म प्रकल्प आणि यासारख्या इतर गोष्टींमध्ये भारताने श्रीलंकेत गुंतवूणक करावी यावर चर्चा झाली होती. दरम्यान, बुधवारी श्रीलंकेचे अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांनी निर्मला सीतारामन यांची भेट घेण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी राजपक्षे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात श्रीलंकेच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा झाली.


इतर महत्वाच्या बातम्या: