Holi 2022 :  सध्या होळी (Holi) सणाची तयारी अनेक जण करत आहेत. रंगांची उधळण करून सण साजरा केला जातो. पण होळी खेळताना त्वचेची आणि केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेक जण लोकांना रंगामुळे त्वचेची जळजळ होणे, रॅश येणे, त्वचा लाल होणे इत्यादी समस्या जाणवतात.  अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर किरण गोडसे (Kiran Godse) यांनी होळी सणानंतर आणि आधी त्वचेची काळजी घेण्याबाबातच्या काही  सोप्या टिप्स दिल्या आहेत. 
 
रंग खेळण्याआधी  फॉलो करा या टिप्स
1. रंग खेळण्याआधी केसांना तेल लावणे गरजेचे आहे. त्यामुळे कलरमुळे केस खराब होत नाहित. तेलामुळे केसांना लागलेला रंग सहजपणे निघून जातो. 
2. नख कापा- रंग खेळण्याआधी नख कापल्यानं रंग नखांमध्ये अडकत नाही. त्यामुळे नख स्वच्छ राहतात.  
3. रंग खेळण्यासाठी बाहेर जाताना सनस्क्रिन लावा. 
4.अंग पूर्ण झाकले जाईल, असे कपडे घालून बाहेर जावा. 
5. केमिकल असणाऱ्या क्रिम्स लावणे टाळा. या क्रिम्समुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. 


रंग खेळल्यानंतर फॉलो करा या टिप्स
1.रंग खेळल्यानंतर जास्त वेळ न थांबता लगेच आंघोळी करावी. त्यामुळे रंगाचे डाग लगेच जातील. 
2.तुम्ही रंग काढण्यासाठी क्लिन्झरचा वापर करू शकता.  
3. त्वचा घासणे किंवा स्क्रब वापरणे टाळा.  


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha