एक्स्प्लोर

यूपीएससीचे नियम बदलणार?

परीक्षेच्या निकालानंतर होणाऱ्या प्रशिक्षणाच्या आधारवर ते कोणत्या सेवेत जाण्यासाठी पात्र आहे, हे ठरवंल जाईल.

नवी दिल्ली : मोदी सरकारकडून देशभरात होणाऱ्या लोकसेवा परीक्षांच्या नियमांमध्ये अमूलाग्र बदल केला जाण्याची शक्यता आहे. या अंतर्गत नोकरी आणि केडर निवडण्यासाठी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचं पुस्तकी ज्ञानासह व्यवहारिक ज्ञानही तपासलं जाणार आहे. परीक्षेच्या निकालानंतर होणाऱ्या प्रशिक्षणाच्या आधारवर ते कोणत्या सेवेत जाण्यासाठी पात्र आहे, हे ठरवंल जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानंतर हे नवे बदल याच वर्षी लागू होतील, असं म्हटलं जात आहे. या नव्या सिस्टमनुसार अशी शक्यताही आहे की, ट्रेनिंगमधील सुमार कामगिरीमुळे परीक्षेतील टॉपरला आयएएस केडर मिळू शकणार नाही, तर त्याच्यापेक्षा कमी रँक असलेल्या उमेदवाराने  ट्रेनिंगमध्ये चांगली कामगिरी केली तर तो आयएएस बनू शकतो. कसा ठरणार रँक? पंतप्रधान कार्यालयाच्या निर्देशानुसार, कर्मचारी प्रशिक्षण विभागाने ही नवी यंत्रणा लागू करण्यासंदर्भात अनेकांकडून सल्ले मागितले आहेत. या प्रस्तावानुसार, उत्तीर्ण उमेदवारांना फाऊंडेशन कोर्स पूर्ण केल्यानंतर आणि त्यात मिळालेल्या गुणांवरच केडर आणि नोकरीचं ठिकाण दिलं जाईल. जर नवे नियम लागू झाले तर ट्रेनिंगनंतरच कोणाला कोणती सेवा आणि कोणत्या राज्याचं केडर मिळणार हे ठरणार आहे. ट्रेनिंगमध्ये मिळालेले गुण यूपीएससीच्या अंतिम निकालात जमा होतील, त्यानंतर त्यांचा रँक ठरणार आहे. सध्याच्या पद्धतीनुसार सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराला आयएएस, आयपीएस, आयएफएस या सेवा निवडण्याची मुभा होती. तसंच केंद्रीय सेवेतील 'अ' श्रेणीच्या नोकरीसाठी याच परीक्षेतून उमेदवार निवडले जातात. नवे बदल का? देशाच्या नव्या आयएएस अधिकाऱ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा ट्रेनिंगमध्ये व्यवहारिक ज्ञानही मिळावं. राजकीय यंत्रणा आणि त्याचा प्रशासनावरील प्रभाव समजावा, असा मानस मोदी सरकारचा आहे.सध्याच्या प्रशिक्षण यंत्रणेमधील बदलाबाबत अग्रवाल समितीच्या अहवाच्या बहुतांश शिफारसी सरकारने मान्य केल्या आहेत. मोदी सरकार आल्यावर प्रशिक्षणात बदल सत्तेत आल्यावर मोदी सरकारने या सेवांच्या प्रशिक्षणात महत्त्वाचे बदल केले.  2015 मध्ये नव्या आयएएस अधिकाऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान केंद्रात तीन महिने सहाय्यक सचिव म्हणून ट्रेनिंग देणं अनिवार्य केलं होतं. यादरम्यान त्यांना केंद्रीय योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीबाबत सखोल माहिती दिली जाते. अग्रवाल समितीने प्रशिक्षणातील बदलाआधी 180 आयएएस अधिकाऱ्यांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत चर्चा केली होती. यामध्ये 127 पुरुष आणि 27 महिला आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश होता. सध्या कसं होतं प्रशिक्षण? - जिह्यात : 54 आठवडे ट्रेनिंग - मंत्रालयात : 13 आठवडे ट्रेनिंग - संस्थेत : 15 आठवडे ट्रेनिंग - फाऊंडेशन कोर्स : 21 आठवडे ट्रेनिंग - एकूण : 103 आठवडे ट्रेनिंग अग्रवाल समितीच्या शिफारशी यंदाच लागू होणार! - प्रशिक्षणाचा कमाल कालावधी एक वर्ष करावा - गावांमध्ये जास्त काळ राहण्यासाठी अधिकाऱ्यांना जास्त वेळ मिळावा - प्रशिक्षणासाठी परदेशात पाठवण्याच्या पर्यायावरही विचार व्हावा - फाऊंडेशन कोर्सचा अभ्यासक्रम बदलावा, सध्याच्या घडामोडींवर जास्त भर द्यावा - ट्रेनिंगदरम्यान कमीत कमी परीक्षा व्हाव्यात, सध्याची यंत्रणेनुसार 300 गुणांची परीक्षा व्हावी

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
INDIA Aghadi Protest: INDIA आघाडीच्या आंदोलनाला महाराष्ट्र काँग्रेसच्या खासदारांची दांडी, हायकमांड प्रचंड नाराज, प्रभारींनी फोन करून सुनावले खडेबोल; नेमकं काय घडलं?
INDIA आघाडीच्या आंदोलनाला महाराष्ट्र काँग्रेसच्या खासदारांची दांडी, हायकमांड प्रचंड नाराज, प्रभारींनी फोन करून सुनावले खडेबोल; नेमकं काय घडलं?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Nana Patekar Demise Tanushree Dutta Reaction Viral: 'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
Accident In Kolhapur: भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
Embed widget