एक्स्प्लोर

Google GOOF-UP! गुगल सांगतय अनुष्का शर्मा ही अफगानिस्तानचा क्रिकेटपट्टू रशिद

अफगानिस्तानचा फिरकी बॉलर रशिद खानने एका कार्यक्रमात सांगितले की अनुष्का शर्मा त्याची आवडती अभिनेत्री आहे. त्यावरुन 'गुगल गुफ अप',बॉलिवूडच्या चाहत्यात नाराजी.

आजच्या काळात माहिती मिळवण्याचा पक्का स्त्रौत म्हणजे गुगल. त्यावर जगातली कोणतीही माहिती मिळू शकते. पण गुगलही कधी कधी स्वत: गोंधळात पडते.

असाच एक प्रकार नुकताच घडलाय. या गुगलने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला चक्क रशिद खानची पत्नी म्हणून दाखवलंय.यावर अनेक घटकातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. बॉलिवूडच्या फॅन्सना आश्चर्याचा धक्का बसलाय आणि सोशल मीडियावर गमतीशीर कमेंट येत आहेत. गुगलवर क्रिकेटपट्टू रशिद खानची पत्नी असे सर्च केल्यास अनुष्का शर्माचा फोटो येतोय. पण हा असा गोंधळ होण्यामागे एक घटना कारणीभूत आहे.

कोण आहे रशिद खान? अफगानिस्तान क्रिकेट संघाचा बावीस वर्षीय फिरकीपट्टू आणि उपकर्णधार असलेला रशिद खान हा त्या देशाने भारताविरोधातील खेळलेल्या पहिल्या कसोटी सामनातील अकरा जनांच्या संघाचा सदस्य आहे.

गोंधळ नेमका कसा घडला? अफगानिस्तान क्रिकेट संघाचा बावीस वर्षीय फिरकीपट्टू आणि उपकर्णधार रशिद खानला इन्साग्रामच्या एका 'क्यु अँड ए' कार्यक्रमात त्याची आवडती अभिनेत्री कोण असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्याने अनुष्का शर्मा आणि प्रिती झिंटाचे नाव घेतले होते. मग ही माहिती इंटरनेटवर वणव्यासारखी पसरली. यावर गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च केले जाऊ लागले. त्यामुळे गुगल सर्च इंजिनचाही गोंधळ उडाला. ज्यावेळी 'रशिद खानची बायको' असे गुगलवर सर्च केले जाऊ लागले त्यावर अनुष्काचे नाव येऊ लागले. रशिदच्या विवाह विषयक माहितीमध्ये 'विवाहित' अशी नोंद करण्यात आली आहे, त्या माहिती खाली लगेच त्याची पत्नी म्हणून अनुष्का शर्माचे नाव येत होते आणि विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाची तारीख ही विराट कोहली आणि अनुष्काच्या लग्नाची तारीख म्हणजे 11 डिसेंबर 2017 ही दिसत होती.

सत्य काय आहे? बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही भारतीय क्रिकेट स्टार आणि कर्णधार विराट कोहलीची पत्नी आहे. काही महिन्यांपूर्वी विराटने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर अनुष्का प्रेगनंट असल्याची माहिती दिली होती. रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुध्द चेन्नई सुपर किंगच्या मॅच वेळी अनुष्का उपस्थित होती.

नुकतेच माजी क्रिकेटपट्टू सुनिल गावस्कर यांनी एका सामन्यादरम्यान विराट कोहली आणि अनुष्का शर्मावर आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर अनुष्कानेही सडेतोड उत्तर दिले होते. अफगानिस्तानचा फिरकी बॉलर रशिद खान हा अविवाहीत आहे. त्याने या कार्यक्रमादरम्यान अफगानिस्तान विश्व चषक जिंकल्य़ानंतर लग्न करणार असल्याचे सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Independence Day 2026: स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? 2026 पर्यंत लोकसंख्येत किती वाढ? 
स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? देशाच्या लोकसंख्येत 2026 पर्यंत किती वाढ?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Embed widget