एक्स्प्लोर

Gold Silver Price | सोन्या-चांदीचे भाव उतरले, सोन्याच्या किंमतीत 800 रुपयांनी घसरण

आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर्सच्या किंमतीत वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीत (Gold Price) घट झाल्याचं पहायला मिळतंय. मुंबईत आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 43,000 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 44,000 इतका आहे.

मुंबई : गेल्या दहा दिवसात देशात सोन्याचे भाव कमालीचे उतरले आहे. मंगळवारी मुंबईच्या बाजारात सोन्याचा भाव 800 रुपयांनी घसरल्याचं पहायला मिळालंय. मुंबईत बुधवारी सकाळी  22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 43,000 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 44,000 इतका आहे. 

चांदीच्या दराचा विचार करता एक किलो चांदीचा भाव 66,000 हजार इतका झाला आहे. अमेरिकन बाजारात सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळालंय. सोन्याच्या भावात 12.24 डॉलर अर्थात 0.70 टक्के घसरण झाल्याचं पहायला मिळालंय तर चांदीच्या भावात 0.97 डॉलर अर्थात 3.69 टक्के घसरण झाली आहे. 

मागील वर्षी भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दरांनी 56 हजार रुपये प्रती तोळा अशी विक्रमी किंमत गाठली होती. आता मात्र अनेक देशांचा किंबहुना भारताचाही आर्थिक गाडा वेग धरु लागलेला असताना दर कमी होणं, ही बाब अनेकांना थक्क करणारी आहे. सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याने केवळ मुंबईतच नव्हे तर देशभरात सोन्याच्या खरेदीत वाढ होताना दिसत आहे. 

कोरोना लसीकरणाच्या सत्राला सुरुवात झालेली असतानाच सोन्याचे दर मात्र कमीच होत आहेत. अमेरिकन बॉण्ड यील्डमध्ये झालेली वाढ हेसुद्धा यामागचं एक कारण ठरत आहे. जगभरातील गुंतवणुकदार अमेरिकन बॉण्डमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या गुंतवणुकीचं प्रमाण कमी झालं आहे, परिणामी याचे पडडसाद दरांवर उमटले आहेत.

सोन्याच्या दरांत कपात झाल्यामुळं गेल्या काही काळापासून यामध्ये गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढलं आहे. मुख्य म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर आणखी कमी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दरांनी प्रती 10 ग्रामसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता.

अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित आणि हमी देणारा असा गुंतवणुकीचा पर्याय. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्यानं होणारी घसरण पाहता गुंतवणुकदारांचा कल या पर्यायाकडे वाढला आहे. सोन्याच्या दरात झालेली तब्बल 12 हजार रुपयांची घसरण पाहता येत्या काळातही थोड्याफार प्रमाणात दर घटण्याचं हे सत्र असंच सुरु राहणार असल्याची माहिती तज्ज्ञांकडून मिळत आहे. 

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

NCP Sharad Pawar On Delimitation Bill 2026: बहुतांश जिल्हाध्यक्षांचा विधेयकाच्या बाजूने कल, शरद पवारांची राष्ट्रवादी Delimitation बिलाला पाठिंबा देणार?, बैठकीत Inside Story
बहुतांश जिल्हाध्यक्षांचा विधेयकाच्या बाजूने कल, शरद पवारांची राष्ट्रवादी Delimitation बिलाला पाठिंबा देणार?, बैठकीतील Inside Story
Maharashtra Live News Updates: शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत मतदारसंघ फेररचना विधेयकावर चर्चा
Maharashtra Live News Updates: शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत मतदारसंघ फेररचना विधेयकावर चर्चा
सोनं खरेदी करावं की नको? महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 22 हजारांची घसरण, सध्या काय आहेत दर? 
सोनं खरेदी करावं की नको? महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 22 हजारांची घसरण, सध्या काय आहेत दर? 
317 धावा करुनही भारताचा दारुण पराभव, विजयासह श्रीलंकेची अंतिम फेरीत धडक, भारतीय गोलंदाजांची सुमार कामगिरी  
317 धावा करुनही भारताचा दारुण पराभव, विजयासह श्रीलंकेची अंतिम फेरीत धडक, भारतीय गोलंदाजांची सुमार कामगिरी  

व्हिडीओ

No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mandar Kiwale Case: 'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
IND vs NZ 2nd Test Day-1 : 110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Chhatrapati Sambhajinagar : वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
IND vs SL : पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! आशिया कप स्पर्धेतून बाहेर, रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
Embed widget