पणजी : आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत पिता विरुद्ध पुत्र अशी ऐतिहासिक लढत पहायला मिळणार आहे. काँग्रेसचे दिग्गज नेता आणि सहा वेळचे गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना आवाहन दिलं आहे ते त्यांचेच चिरंजीव राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी. 


आगामी निवडणुकीसाठी गोव्यात आता काँग्रेसकडे उमेदवार उरला नाही अशी परिस्थिती झालीय. ज्यांना तिकीट दिलं ते देखील आता ऐनवेळी पक्ष सोडून जायला लागले आहेत. असं असताना देखील काँग्रेसने भाजपला शह देण्यासाठी चांगलीच कंबर कसल्याचं पाहिला मिळत आहे. प्रतापसिंग राणे हे आगामी विधानसभेची निवडणूक ही पोरियम मतदारसंघातून लढणार आहेत. 


कोण आहेत प्रतापसिंह राणे? 


1. गोव्याचे सहा वेळा मुख्यमंत्री पद भूषवलं.
2. पोरियम मतदारसंघाचे विद्यमान आमदार.
3. 1972 च्या सरकारात कायदा खात्याचे मंत्री
4. आगामी निवडणुकीत काँग्रेसकडून आपल्या मुलाच्याच विरोधातील उमेदवार.


आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी आपल्याच मुलाच्या विरोधात शड्डू ठोकलाय. आगामी काळात जर काँग्रेसचे उमेदवार निवडून आणायचे असतील तर त्यासाठी त्याच तोडीचा उमेदवार देण्याचं आव्हान काँग्रेस समोर आहे आणि यासाठीचाच आपला पहिला पत्ता काँग्रेसने प्रतापसिंग राणे यांच्या माध्यमातून खोलला आहे


प्रतापसिंग राणे म्हणाले  ‘कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची बैठक झाली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे’. नुकतीच काँग्रेसने आपल्या पहिल्या 8 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या यादीत कुर्तीरिम येथून गोवा काँग्रेसचे कार्याध्यक्ष करअलेक्सो ल्यूरेन्को यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र त्यांनी नुकताचं काँग्रेसचा हात सोडून तृणमूल काँग्रेसची वाट धरलीय. त्यामुळे आता काँग्रेसने देखील आपले डाव खेळण्यास सुरुवात केलीय. 


आपल्याचं वडिलांनी आपल्या विरोधात निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी नाराजी व्यक्त केलीय. शिवाय वडिलांनी वयाच्या 83 व्या वर्षी निवडणूक न लढता मुलाला पाठींबा द्यायला हवा होता असं देखील म्हंटलय.‘वडिलांचं वय झालं आहे आता त्यांनी तरुणांना संधी द्यायला हवी होती. त्यांनी तसं केलं नाही म्हणून मी हा निर्णय घेतोय’ असं विश्वजीत राणे म्हणाले 


गोव्यात भाजप, तृणमूल काँग्रेस, आप यांनी जोरदार तयारी केलीय. सध्या एकमेकांच्या पक्षातील उमेदवार आपल्या पक्षात घेण्यासाठी जोरदार रस्सीखेच देखील सुरु आहे. आशा परिस्थितीत प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने देखील सत्ता पुन्हा एकदा काबीज करण्यासाठी वेगवेगळे डावपेच खेळण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे सत्तासंघर्षाच्या या लढाईत नेमकं कोण बाजी मारणार हे पुढील वर्षीच स्पष्ट होईल.



महत्त्वाच्या बातम्या :