PM Modi in Goa : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज गोवा (Goa) दौऱ्यावर आहेत. आज गोवा मुक्ती दिनानिमित्त कार्यक्रमामध्ये ते हजेरी लावणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींकडून विविध विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात सांगण्यात आले आहे की, पंतप्रधान मोदी श्याम प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये गोवा मुक्ती दिन कार्यक्रमाला हजेरी लावतील. 


भारतीय लष्कराने पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त केल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 'गोवा मुक्ती दिन' साजरा केला जातो. पंतप्रधान मोदी गोवा राज्याला पोर्तुगाल शासनापासून मुक्त केल्याबद्दल स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करणार आहेत. यामध्ये भारतीय सशस्त्र सेनेच्या 'ऑपरेशन विजय' मधील स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.


याशिवाय पंतप्रधान नूतनीकरण केलेले अगौडा जेल म्युझियम, गोवा मेडिकल कॉलेजचा सुपर स्पेशालिटी विभाग आणि न्यू साऊथ गोवा जिल्हा रुग्णालय यासह इतर अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच मोदी मोपा विमानतळावरील एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि मडगाव येथील दाबोलिम-नवेलीम येथे गॅस उपकेंद्राचे उद्घाटन करतील, असे पीएमओ कार्यालयाने सांगितले आहे. याशिवाय पंतप्रधान कायदेशीर शिक्षण आणि संशोधनासाठी इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची पायाभरणीही करतील.


गोव्यात पुढील वर्षीच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गोवा दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha